• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /नाशिक
  • /झोपलेल्या महिलेवर पेट्रोल टाकून पेटवणाऱ्या आरोपीचाच होरपळून मृत्यू; मालेगाव तालुक्यातील घटना; महिलेची मृत्यूशी झुंज

झोपलेल्या महिलेवर पेट्रोल टाकून पेटवणाऱ्या आरोपीचाच होरपळून मृत्यू; मालेगाव तालुक्यातील घटना; महिलेची मृत्यूशी झुंज

झोपलेल्या महिलेवर पेट्रोल टाकून पेटवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Reported ByShivraj Yadav
Published: Oct 09, 2026, 01:32 PM IST|Updated: Oct 09, 2026, 01:40 PM IST
joinshare
झोपलेल्या महिलेवर पेट्रोल टाकून पेटवणाऱ्या आरोपीचाच होरपळून मृत्यू; मालेगाव तालुक्यातील घटना; महिलेची मृत्यूशी झुंज

About the Author

Shivraj Yadav

Shivraj Yadav

शिवराज यादव झी 24 तास डिजिटलमध्ये सीनिअर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. राज्यासह देश, विदेशातील चालू घडामोडींसह राजकीय, गुन्हेगारी विषयांवरील लिखाण ते करतात. हे लिखाण करताना ते सखोल पद्धतीने करण्याकडे कल असतो. वाचकाला बातमी अत्यंत सहजपणे समजावी यासाठी ती समजेल अशा पद्धतीने लिहितात. याशिवाय क्रीडा, मनोरंजन यांचीही आवड असल्याने त्या क्षेत्राशी संबंधित घडामोडींवरही लिखाण करतात.करिअरशिवराज यांनी 2009 मध्ये आपल्या पत्रकारितेतील करिअरला सुरुवात केली. सर्वात आधी Fotocorp संस्थेत कॅप्शन रायटर म्हणून काम केल्यानंतर पुढील 7 वर्ष त्यांनी टीव्हीमध्ये प्रदीर्घ अनुभव घेतला. लोकमतमधून ऑनलाइन पत्रकारितेला त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर लोकसत्ता आणि सध्या झी 24 तास अशाप्रकारे त्यांच्याकडे 9 वर्षांचा अनुभव आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशिवराज यादव यांनी मुंबईतच आपलं शिक्षण पूर्ण केलं. मुंबई विद्यापीठ मान्यताप्राप्त एमडी कॉलेजमध्ये त्यांनी आर्टसमधून 12 वी उत्तीर्ण केली. यानंतर पुढील 3 वर्षं BMM मधून शिक्षण घेत पत्रकारितेत पदवी घेतली. यादरम्यान बातम्यांचं जग, त्याची समाजाला असणारी गरज आणि त्याचं महत्व याबद्दल चांगली समज निर्माण झाली.लेखन शैली आणि दृष्टीकोणशिवराज यांचं म्हणणं आहे की, प्रत्येक व्यक्तीला आपल्या आजुबाजूला तसंच देश, विदेशात नेमक्या कोणत्या घडामोडी घडत आहेत हे माहिती असलं पाहिजे. ही जबाबदारी माध्यमांवर जास्त असून, त्यांनी ती अवितरपणे पार पडली पाहिजे. प्रत्येक माहिती जशीच्या तशी वाचकांपर्यंत पोहोचवताना माध्यमांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असते.कोणत्या विषयांची सखोल जाणराजकीय घडामोडीचालू घडामोडीमनोरंजनक्रीडा
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

2

भूगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

3

₹100 च्या नोटांचे बंडल, आधी 'लंच ब्रेक'चं कारण अन् नंतर...; SBI मध्ये ग्राहकाने शूट केलेला धक्कादायक Video पहिला का?

4

'...तर तुम्ही ठाण्यातून परत जाणार नाही'; आदित्य ठाकरेंच्या उद्याच्या दौऱ्याआधीच शिंदेंच्या शिवसेनेचा विरोधकांना इशारा

5

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

मालेगावात एका महिलेला अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आर्थिक देवाण-घेवाणीतून त्यांची ओळख निर्माण झाली होती. यानंतर चरित्राच्या संशयावरून वाद निर्माण झाल्याने महिला झोपेत असतानाच त्याने अंगावर पेट्रोल टाकून आग लावली. मालेगाव तालुक्यातील देवघट या गावी ही घटना घडली. यावेळी लागलेल्या आगीत संशयितदेखील भाजला गेल्याने त्याचा मृत्यू झाला. दुसरीकडे महिलेची मृत्यूशी झुंज सुरू आहे.

संशयित अनिल बंडू सोनवणे (50) असे मृत व्यक्तीचे नाव असून सुनंदा देवसिंग मोरे (45) असे महिलेचे नाव आहे. बुधवारी रात्री देवघट गावाजवळील इंदिरानगर वस्तीवर हा प्रकार घडला. पीडित महिला आई, बहीण व मुलांसह झोपडीबाहेर अंगणात झोपलेली होती. या ठिकाणी संशयित अनिल सोनवणे हा पेट्रोलने भरलेली डबा घेऊन आला. त्याने झोपलेल्या सुनंदा यांच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिले. महिला आगीत होरपळू लागल्याने तिने आरडाओरड केली. यावेळी झालेल्या झटापटीत संशयित अनिलदेखील गंभीर भाजला गेला. मात्र त्याने घटनास्थळावरून पळ काढत बाजूलाच असलेल्या एका पाण्याच्या डबक्यात स्वतःला झोकून दिले.
पहाटे पावणेतीनच्या सुमारास झालेल्या या धक्कादायक प्रकारानंतर संपूर्ण वस्तीवर नागरिकांची गर्दी झाली होती. भाजलेल्या दोघांना तत्काळ मालेगाव व त्यानंतर धुळे येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच मालेगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शेगर यांनी पथकासह घटनास्थळी जाऊन पाहणी केली.

दरम्यान, संशयित अनिलचा गुरुवारी मृत्यू झाला. तर सुनंदा यांची प्रकृतीही गंभीर असून त्या मृत्यूशी झुंज देत आहेत. या घटनेमागील नेमके कारण, पैशांचा व्यवहार आणि घटनेची पार्श्वभूमी याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे. या प्रकरणावरून पीडित महिलेचा मुलगा सोमनाथ मोरे याने दिलेल्या फिर्यादीवरून मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Nashik
crime