नाशिकमधून एक अत्यंत खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. आरोपीने पीडित विवाहितेला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. विविध शीतपेयातून महिलेला गुंगीचे औषध पाजून बेशुद्ध करत तिच्यावर अत्याचार केल्याचा गंभीर गुन्हा नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी संशयित महेंद्र देशमानकर या 52 वर्षीय इसमाविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.
व्हिडीओ आणि फोटो व्हायरल करण्याची धमकी
आरोपीने या पीडित महिलेवर अत्याचार करत असताना तिचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ देखील काढले. नंतर हेच व्हिडीओ आणि फोटो व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार पीडित 35 वर्षीय महिलेवर आरोपीने अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अंबड पोलिसांकडून तपास केला असतानाच नवीन माहिती समोर आली आहे.
पोलिसांनी काय माहिती दिली?
नाशिकच्या इगतपुरी तालुक्यात असलेल्या एका फार्म हाऊसवर नेऊन आरोपीने पीडितेवर अत्याचार करून त्याचे चित्रीकरण केलं आहे. या संदर्भात पिडीतिने दिलेल्या तक्रार दिल्यानंतर अंबड पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे शाखा आणि अंबड पोलीस ठाण्याचे एक असे दोन पथकं महिंद्र देशमानकरचा शोध घेत असल्याचे पोलीस उपायुक्त किशोर काळे यांनी सांगितले आहे.
पतीला सोडून दे, मी तुझ्याशी...
देशमानकरने पीडितेशी आधी ओळख वाढवली. त्यानंतर, “पतीला सोडून दे, मी तुझ्याशी लग्न करतो” असे आमिष दाखवले. 2020 ते 2026 या कालावधीत त्याने वारंवार पीडितेवर अत्याचार केला. त्याने तिला कधी स्वतःच्या घरी तर कधी मित्राच्या त्र्यंबकेश्वर येथील फार्म हाऊसवर नेले. शीतपेयातून गुंगीचे औषध पाजून बेशुद्ध केले आणि अनैसर्गिक संबंध प्रस्थापित केल्याचं तक्रारीमध्ये नमूद करण्यात आलं आहे.
मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून अश्लील व्हिडीओंची पॉर्न साईटवर विक्री
नालासोपाऱ्यामध्येही अत्याचाराचं एक विचित्र प्रकरण समोर आलं आहे. विशेष म्हणजे या प्रकरणाची व्याप्ती वाढू लागली आहे. या प्रकरणातील आरोपी आरिफवर हे प्रकरण समोर आल्यापासून चौथा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीनं पीडितेला राजोडी येथील समुद्र किना-यावरील एका लॉजमध्ये नेलं आणि अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी आता नालासोपारा पोलिसांकडून गुन्हा अर्नाळा पोलिसांकडे वर्ग करण्यात आलाय. आरोपी आरिफवर अनेक तरुणींना फसवल्याचा आरोप करण्यात आला आहे. मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्याचे अश्लील व्हिडिओ बनवून पॉर्न साइटवर विकण्यात आल्याचा धक्कादायक आरोपही करण्यात येत आहे. आरोपीच्या मोबाईलमध्ये 80 हून अधिक अश्लील व्हिडिओ सापडले आहेत. आत्तापर्यंत आरिफविरोधात 4 मुलींनी आवाज उठवला असून तक्रार दाखल करणाऱ्या तरुणीने आरोप केला आहे की, त्याने साधारण 70 ते 80 मुलींना प्रेमाच्या जाळ्यात फसवले असून त्यांचे अश्लील व्हिडिओ पॉर्नोग्राफिक साइटवर विकले आहेत.