• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /नाशिक
  • /डोंगराळे अत्याचार व खून प्रकरण: नराधम विजय खैरनार दोषी, जन्मठेप होणार की मृत्यूदंड?

डोंगराळे अत्याचार व खून प्रकरण: नराधम विजय खैरनार दोषी, जन्मठेप होणार की मृत्यूदंड?

डोंगराळे अत्याचार व खून प्रकरण: नराधम विजय खैरनार दोषी ठरवण्यात आले असून आता शिक्षा काय होणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार

Written ByMansi KshirsagarEdited ByMansi Kshirsagar
Published: Oct 01, 2026, 11:28 AM IST|Updated: Oct 01, 2026, 11:29 AM IST
joinshare
डोंगराळे अत्याचार व खून प्रकरण: नराधम विजय खैरनार दोषी, जन्मठेप होणार की मृत्यूदंड?
Image Credit: Dongrale Minor Crime Case

About the Author

Mansi Kshirsagar

Mansi Kshirsagar

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि जनरल बातम्यांमध्ये हातखंडा आहे. पायाभूत सुविधा म्हणजेच infrastructure, मुंबई लोकल संबंधित बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. महाराष्ट्र व मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्पाचे अपडेट वाचकापर्यंत पोहोचवतात.त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड आहे.  गुन्हेविषयक बातम्या आणि त्याचे विश्लेषणात्मक लेख आणि त्याचा अभ्यासपूर्ण मसुदा वाचकांना समजेल अशा भाषेत लिहिण्याची विशेष आवड आहे. त्याचबरोबर, लाइफस्टाईल आणि हवामानासंदर्भातील बातम्यांमध्येसुद्धा त्यांचा विशेष हातखंडा आहे.डिजिटल मीडियातील कारकीर्दमानसी यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात डिजीटल मीडियापासून केली. ग्रुम अँड ग्रो या अॅपसाठी कंटेट रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये रुजू झाल्या.  मनोजरंन बातम्यांपासून सुरुवात केल्यानंतर जनरल बातम्या, अर्थविषयक बातम्या, क्राइम आणि लाइफस्टाईल विषयाशी निगडीत विषयांवर लिहिण्यास सुरुवात केली. मानसी या आता झी 24 तासमध्ये राजकीय, सामाजिक आणि इन्फ्रासंदर्भातील बातम्या प्रामुख्याने करतात.शैक्षणिक पात्रतामानसी क्षीरसागर यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

2

भूगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

3

₹100 च्या नोटांचे बंडल, आधी 'लंच ब्रेक'चं कारण अन् नंतर...; SBI मध्ये ग्राहकाने शूट केलेला धक्कादायक Video पहिला का?

4

'...तर तुम्ही ठाण्यातून परत जाणार नाही'; आदित्य ठाकरेंच्या उद्याच्या दौऱ्याआधीच शिंदेंच्या शिवसेनेचा विरोधकांना इशारा

5

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे साडेचार वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार करुन तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याचे प्रकरण घडले होते. या प्रकरणात आता आरोपीवर गुन्हा सिद्ध झाला आहे. आरोपीवर वेगवेगळे चार गुन्हे सिद्ध झाले आहेत. बुधवारी न्यायालयाने मोठा निकाल दिला आहे. येथील जलदगती न्यायालयाने आरोपी विजय खैरनार याला अपहरण, लैंगिक अत्याचार आणि खुनाच्या आरोपांखाली दोषी ठरवले. अप्पर जिल्हा न्यायाधीश के. जी. पालेदार यांनी हा निकाल जाहीर केला असून आरोपीला काय शिक्षा होणार, याचा फैसला 7 ऑक्टोबरच्या सुनावणीनंतर होणार आहे.

आरोपी विजय खैरनार याच्यावर चार गुन्ह्यात दोष निश्चिती झाली आहे. या गुन्ह्यात जन्मठेप किंवा मृत्यूदंडाची शिक्षा आहे. तसंच, मरेपर्यंत जन्मठेप किंवा फाशीची शिक्षेची तरतूद आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशान्वये आरोपीवर सिद्ध झालेले गुन्हे व शिक्षेबद्दल आरोपी व आरोपीच्या वकिलांना त्यांचे म्हणणे मांडण्याची एक आठवड्याची संधी दिली आहे.

यावेळी आरोपीची मागील एक वर्षात जेलमधील वागणूक त्याची गावातील वागणूक याबद्दल माहिती घेण्यात येणार आहे. तसंच, गुन्हे व शिक्षेबद्दल लेखी किंवा तोंडी म्हणणे न्यायालयाला सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

आरोपीवर दोष सिद्ध झाला असून जन्मठेप किंवा मृत्युंदंडाची शिक्षा द्यायची यावर पुढील 7 ऑक्टोबरला अहवाल सादर करण्याचे आदेश न्यायालयाला देण्यात आले आहेत.  पुढील सुनावणी 7 ऑक्टोबरला असून शिक्षा सुनावण्यात येणार आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

मागीच वर्षी 16 नोव्हेंबर रोडी डोंगराळे गावातून साडेचार वर्षांच्या चिमुरडीचे अपहरण करण्यात आले होते. त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आली. या घटनेने राज्यभरात संतापाची लाट उसळली होती.  आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी जोर धरू लागली होती. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगात फिरवत अवघ्या काही तासांत गावातील विजय खैरनार याला अटक केली. गेल्या 10 महिन्यांपासून या प्रकरणाची सुनावणी जलदगती न्यायालयात सुरू होती. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Nashik
Maharashtra News
crime