SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

नाशिक शहराचे पौराणिक नाव तुम्हाला ठावूक आहे का? रामायणातील 'त्या' प्रसंगानंतर मिळालं नवं नाव, वाचा पौराणिक कथा!

नाशिक शहराला नाव कसं मिळाले? शहराचे पूर्वीचे नाव कोणते होत? या सगळ्यांची उत्तरे जाणून घेऊयात

Written By Mansi Kshirsagar Edited By Mansi Kshirsagar
Published: Oct 02, 2026, 08:56 AM IST | Updated: Oct 02, 2026, 08:59 AM IST
Image Credit: How did Nashik get its name
Join

नाशिकला ऐतिहासिक आणि पौराणिक महत्त्व आहे. नाशिक ही महाराष्ट्राची देवभूमी म्हणूनही ओळखली जाते. गोदाघाट आणि तेथील मंदिरे असो किंवा 12 ज्योतिर्लिंगामधील त्र्यंबकेश्वर देवस्थान असो. नाशिक नेहमीच भाविकांसाठी महत्त्वाचे धार्मिक स्थळ राहिले आहे. नाशिकमध्ये यंदा सिंहस्थ कुंभमेळादेखील होणार आहे. त्यामुळं नाशिक पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. पण नाशिकचे तुम्हाला पौराणिक नाव माहिती आहे का?

नाशिकचा उल्लेख रामायणातही आढळतो. रामायणात उल्लेख असलेली अनेक ठिकाणे नाशिकमध्ये आहेत. प्रभू श्रीराम, सीता, लक्ष्मण यांनी वनवासातील काही काळ नाशिकच्या तपोवन येथे व्यतित केला होता, अशी मान्यता आहे. त्यामुळं रामायणाशी संबंधामुळं तपोवन हे हिंदूंसाठी एक पवित्र आणि महत्त्वपूर्ण स्थळ आहे.

अनेक ऐतिहासिक आणि पुराणांत नाशिकचा उल्लेख आढळतो. पण पुराणात नाशिकचे नाव वेगळे होते. नाशिक हे नाव रामायणातील एका प्रसंगावरुन पडले आहे. नाशिक हे नाव कसं पडलं जाणून घेऊयात. हिंदू पौराणिक ग्रंथांनुसार आणि रामायण काळातील उल्लेखावरून, प्रभू रामचंद्र यांनी आपल्या चौदा वर्षांच्या वनवासातील काही काळ नाशिक परिसरातील पंचवटी आणि तपोवन भागात घालवला होता. लक्ष्मणाने शूर्पणखेचे नाक (नासिका) येथेच कापले होते, ज्यावरून या शहराला पुढे नाशिक' हे नाव मिळाले. त्याचबरोबर आणखी एक आख्यायिका सांगितली जाते ती अशी कि, गोदावरीच्या तीरावरील नऊ टेकड्यांवर हे गाव वसले म्हणून ते ‘नवशिख’ म्हणून ओळखले जायचे. याच नवशिख शब्दाचा पुढे अपभ्रंश होऊन ‘नाशिक’ हे नाव पडले.

नाशिक शहराचे पौराणिक नाव काय?

नाशिकचे पौराणिक आणि जुने नाव 'जनस्थान' असे मानले जाते. तसंच, वेगवेगळ्या युगानुसार  'पद्मनगर' किंवा 'त्रिकंटक असंही म्हटलं जातं. मुघल काळात या शहराचे नाव बदलून 'गुलशनाबाद' असे ठेवण्यात आले होते.

पंचवटीलाही ऐतिहासिक महत्त्व

नाशिकमध्ये पंचवटी परिसरालाही मोठा इतिहास आहे. पंचवटी हे नाव गोदावरी नदीच्या काठावरील पाच जुन्या वटवृक्षांवरून आले आहे, असे मानले जाते. या परिसरामध्ये अनेक रामायणातील घटना घडल्या, जसे की सीतेचे हरण आणि लक्ष्मण-शूर्पणखा युद्ध. लक्ष्मणाने शूर्पणखेचे नाक कापले ते ठिकाणही पंचवटीमध्ये आहे. तसंच, सीता मातेची गुंफा याच परिसरात आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि जनरल बातम्यांमध्ये हातखंडा आहे. पायाभूत सुविधा म्हणजेच infrastructure, मुंबई लोकल संबंधित बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. महाराष्ट्र व मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्पाचे अपडेट वाचकापर्यंत पोहोचवतात.त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड आहे.  गुन्हेविषयक बातम्या आणि त्याचे विश्लेषणात्मक लेख आणि त्याचा अभ्यासपूर्ण मसुदा वाचकांना समजेल अशा भाषेत लिहिण्याची विशेष आवड आहे. त्याचबरोबर, लाइफस्टाईल आणि हवामानासंदर्भातील बातम्यांमध्येसुद्धा त्यांचा विशेष हातखंडा आहे.डिजिटल मीडियातील कारकीर्दमानसी यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात डिजीटल मीडियापासून केली. ग्रुम अँड ग्रो या अॅपसाठी कंटेट रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये रुजू झाल्या.  मनोजरंन बातम्यांपासून सुरुवात केल्यानंतर जनरल बातम्या, अर्थविषयक बातम्या, क्राइम आणि लाइफस्टाईल विषयाशी निगडीत विषयांवर लिहिण्यास सुरुवात केली. मानसी या आता झी 24 तासमध्ये राजकीय, सामाजिक आणि इन्फ्रासंदर्भातील बातम्या प्रामुख्याने करतात.शैक्षणिक पात्रतामानसी क्षीरसागर यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.

ZEENEWS TRENDING STORIES