• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /नाशिक
  • /कृष्णा महाराज शास्त्री भगवान गडाचे चौथे मठाधिपती; डॉ. नामदेव महाराज शास्त्रींनी 2 वर्षांपूर्वीच घोषीत केला होता उत्तराधिकारी

कृष्णा महाराज शास्त्री भगवान गडाचे चौथे मठाधिपती; डॉ. नामदेव महाराज शास्त्रींनी 2 वर्षांपूर्वीच घोषीत केला होता उत्तराधिकारी

कृष्णा महाराज शास्त्री भगवान गडाचे नवे मठाधिपती बनले आहेत. डॉ. नामदेव महाराज शास्त्री यांच्या उपस्थितीत कृष्णा महाराज शास्त्री यांची महंतपदी विधिवत नियुक्ती करण्यात आली.

Reported ByVanita Kamble
Published: Oct 20, 2026, 07:45 PM IST|Updated: Oct 20, 2026, 07:54 PM IST
joinshare
कृष्णा महाराज शास्त्री भगवान गडाचे चौथे मठाधिपती; डॉ. नामदेव महाराज शास्त्रींनी 2 वर्षांपूर्वीच घोषीत केला होता उत्तराधिकारी

About the Author

Vanita Kamble

Vanita Kamble

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

2

भूगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

3

₹100 च्या नोटांचे बंडल, आधी 'लंच ब्रेक'चं कारण अन् नंतर...; SBI मध्ये ग्राहकाने शूट केलेला धक्कादायक Video पहिला का?

4

'...तर तुम्ही ठाण्यातून परत जाणार नाही'; आदित्य ठाकरेंच्या उद्याच्या दौऱ्याआधीच शिंदेंच्या शिवसेनेचा विरोधकांना इशारा

5

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

अहिल्यानगर : अहिल्यानगरच्या श्री क्षेत्र भगवानगडाच्या अमृत महोत्सवी वर्षात दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर ह.भ.प. न्यायाचार्य डॉ. श्री. नामदेव महाराज शास्त्री बाबांच्या हस्ते कृष्णा महाराज शास्त्री यांची भगवानगडाच्या चतुर्थ महंतपदी विधिवत नियुक्ती करण्यात आली. गडाच्या स्थापनेला 75 वर्षे पूर्ण होत असतानाच नवीन महंतांची नियुक्ती झाल्याने या सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले. संत भगवानबाबांनी 1951 मध्ये दसऱ्याच्या दिवशी श्री क्षेत्र भगवानगडाची स्थापना केली होती. 

यंदा गडाचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे होत आहे. या ऐतिहासिक वर्षात कृष्णा महाराज शास्त्री यांना गादीवर विराजमान करण्याचा निर्णय विद्यमान मठाधिपती डॉ. नामदेव महाराज शास्त्री आणि श्री क्षेत्र भगवानगड ट्रस्टने घेतला होता. मात्र, दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन नियोजित भव्य सोहळ्याऐवजी कार्यक्रम साधेपणाने पार पडला. तरीही या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी हजारो भाविक गडावर उपस्थित होते.

कृष्णा महाराज शास्त्री हे मूळचे तेलंगणातील असून, 17 वर्षांपूर्वी ते भगवानगडावर आले. त्यांनी गडावरील ज्ञानेश्वरी विद्यापीठात सलग 12 वर्षे राहून डॉ. नामदेव महाराज शास्त्रीच्या मार्गदर्शनाखाली ज्ञानेश्वरी आणि अन्य धार्मिक ग्रंथांचे अध्ययन केले. एम.ए.पर्यंत शिक्षण घेतलेल्या कृष्णा महाराजांनी विद्या पारंगत झाल्यानंतर एकनाथवाडी येथील निरंजन संस्थानचे महंत म्हणून सुमारे तीन वर्षे कार्य केले.

डॉ. नामदेव महाराज शास्त्रींनी सुमारे दोन वर्षांपूर्वी कृष्णा महाराजांना आपला उत्तराधिकारी घोषित केले होते. त्यावेळी एकनाथवाडी येथील ग्रामस्थांनी त्यांना रथातून, ढोल-ताशांच्या गजरात, टाळ-मृदंगाच्या निनादात आणि हरिनामाच्या जयघोषात भगवानगडावर आणले होते. त्यांना निरोप देताना ग्रामस्थ भावूक झाले होते. त्यानंतर दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर त्यांच्या नियुक्तीचा सोहळा संपन्न झाला.

कृष्णा महाराज शास्त्री यांना गादीवर विराजमान केल्यानंतर डॉ. नामदेव महाराज शास्त्री बाबांनी सामाजिक जीवनातून पूर्णपणे निवृत्ती घेतली आहे. यापुढील आयुष्य ज्ञानेश्वरीचा भावानुवाद लिहिण्यासाठी समर्पित करण्याचा त्यांचा संकल्प आहे. संत भगवानबाबांनी आयुष्यभर ज्ञानेश्वरीचे वाचन केले, तर नामदेव महाराज शास्त्री तिचा भावानुवाद लिहिण्याचे कार्य करीत आहेत. महाराष्ट्राच्या आध्यात्मिक आणि साहित्यिक क्षेत्रासाठी ही अभिमानाची बाब मानली जात आहे. यापुढेही त्यांचे ग्रंथलेखन आणि साहित्यनिर्मिती सुरू राहणार आहे.

दरम्यान, श्री क्षेत्र भगवानगडाच्या भक्तांनी यापुढे मठाधिपती म्हणून कृष्णा महाराज शास्त्री यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. अमृत महोत्सवी वर्षात झालेली ही नियुक्ती भगवानगडाच्या धार्मिक परंपरेतील महत्त्वाचा टप्पा ठरली आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Nashik
Maharashtra News