नाशिक क्राईम न्यूज : बहिण भावाच्या नात्याला काळीमा फासणारी अत्यंत संतापजनक घटना नाशिकमध्ये घडली आहे. नाशिकच्या चांदवड तालुक्यात अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराचे गंभीर प्रकरण समोर आले आहे. अवघ्या 14 वर्षे 16 दिवस वयाच्या मुलीने नवजात बालिकेला जन्म दिल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
वडनेर भैरव पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. पीडित मुलीच्या चुलत भावाने लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. 9 जानेवारी ते 27 सप्टेंबर 2026 या कालावधीत अत्याचार झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी वडनेर भैरव पोलीस ठाण्यात पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस उपनिरीक्षक अमोल बी. पवार या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. अल्पवयीन मुलीच्या सुरक्षिततेचा आणि न्यायाचा प्रश्न या घटनेमुळे पुन्हा ऐरणीवर आला आहे.
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करुन तिची हत्या झाल्याची धक्कादायक घटना नवी मुंबईत उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. मागील 3 दिवसांपूर्वी तुर्भे पोलिस ठाण्यात एक अल्पवयीन मुलगी घरातून बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल झाली होती. त्यानंतर पोलिसांनी पथक तयार करून तांत्रिक माहिती आणि सीसीटीव्ही तपासून एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली असता त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार करुन निर्घृण खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. तुर्भे पोलिसांनी आरोपीला नराधम आरोपीला अटक केली आहे. सदर आरोपी मयत मुलीच्या कुटुंबियांच्या ओळखीचा असून पोलिसांच्या नातेवाईकांनी आरोपीला फाशीच्या शिक्षेची मागणी केली. तुर्भे पोलिसांनी दहा जणांचे एक पथक तयार केले असून संबंधित प्रकरणाचा कसून तपास सुरू केला आहे.