• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /नाशिक
  • /विजय खैरनारला फाशीची शिक्षा! कोर्ट म्हणालं, 'हे दुर्मिळातील दुर्मिळ प्रकरण'; 3 वर्षांच्या चिमुकलीवर...

विजय खैरनारला फाशीची शिक्षा! कोर्ट म्हणालं, 'हे दुर्मिळातील दुर्मिळ प्रकरण'; 3 वर्षांच्या चिमुकलीवर...

या प्रकरणामध्ये आरोपीने पीडितेच्या वडिलांसोबत झालेल्या भांडणाचा राग मनात ठेऊन चिमुकलीचं घरासमोरुन अपहरण केलं. त्यानंतर त्याने तिच्यासोबत जे काही केलं ते ऐकून आणि वाचूनच तुमच्या अंगावर काटा येईल. या प्रकरणात निकाल देताना न्यायालयाने काय म्हटलंय जाणून घ्या...

Reported BySwapnil Ghangale
Published: Oct 16, 2026, 11:30 AM IST|Updated: Oct 16, 2026, 12:43 PM IST
joinshare
विजय खैरनारला फाशीची शिक्षा! कोर्ट म्हणालं, 'हे दुर्मिळातील दुर्मिळ प्रकरण'; 3 वर्षांच्या चिमुकलीवर...
Image Credit: दुर्मिळात दुर्मिळ प्रकरण असल्याचं न्यायालयाचं निरिक्षण (फोटो एआयवरुन साभार)

About the Author

Swapnil Ghangale

Swapnil Ghangale

मोजक्या शब्दांमध्ये...स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.पत्रकारितेचा श्रीगणेशास्वप्निल यांनी पत्रकारितेच्या दुसऱ्या वर्षापासूनच 'ठाणे वैभव' या ठाण्यातील स्थानिक वृत्तपत्रामध्ये शिकाऊ पत्रकार म्हणून कामाला सुरुवात केली. सांस्कृतिक आणि गुन्हेगारी यासंदर्भातील वृत्तांकन यांनी या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये केलं. बीएमएमच्या तृतीय वर्षाला ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालयातील 'ऋत' या पत्रकारिता विभागाच्या महाविद्यालयीन वृत्तपत्रासाठी स्वप्निल यांनी उपसंपादक म्हणून काम पाहिले.डिजिटलमध्ये एन्ट्री'महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉम'च्या माध्यमातून पहिल्यांदा डिजिटल क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या स्वप्निल यांनी सुरुवातीला सोशल मिडिया व्यवस्थापक म्हणून काम पाहिले. त्यानंतर हळूहळू ते डिजिटल वृत्तांकनाकडे वळले. त्यांनी 'महाराष्ट्र टाइम्स' वृत्तपत्रामध्येही माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लेखन केलं. मुख्य पुरवणीसोबतच अनेकदा रविवार विशेष अंकांमध्येही त्यांचे लेख छापून आले आहेत. 'मुंबई टाइम्स' या पुरवणीअंतर्गत विद्यार्थ्यांच्या विश्वातील अनेक विषय त्यांनी कॉलेज क्लब रिपोर्ट्सच्या माध्यमातून हाताळले. कॉलेज क्लब रिपोर्टर्ससोबतच्या कामासोबतच त्यांनी 'मटा सन्मान', 'मटा श्रावण क्विन' यासारख्या कार्यक्रमांसाठी डिजिटल आणि प्रिंटदरम्यान संयोजक म्हणून काम पाहिलं. जवळपास पाच वर्ष ते मटामध्ये कार्यरत होते.प्रगल्भतेची आसमहाराष्ट्र टाइम्सनंतर तितक्याच तोलामोलाच्या 'लोकसत्ता'मध्ये स्वप्निल यांनी काम केलं. या ठिकाणीही ते पाच वर्ष कार्यरत होते. 'मटा'पासून सुरु झालेल्या प्रवासाला 'लोकसत्ता'मध्ये प्रगल्भता लाभली. राजकीय बातम्या, ताज्या घडामोडी, ट्रेडींग बातम्या याबरोबरच त्यांनी डिजिटल आणि प्रिंटमधील समन्वयाचं (इंटीग्रेशन) कामही त्यांनी लोकसत्तामध्ये केलं. 'लोकसत्ता'मधील 'व्हिवा' या पुरवणीमध्ये तरुणाईसंदर्भातील विषयांवर त्यांनी लेखन केलं. तसेच 'लोकप्रभा'च्या माध्यमातून त्यांनी माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लिखाण केलं. लोकसत्ता डॉट कॉममध्ये स्वप्निल यांनी चार ते पाच सेक्शनसची जबाबदारी पार पाडली.तो सध्या काय करतो?'लोकसत्ता'नंतर स्वप्निल यांनी पहिल्यांदाच टीव्हीशी संलग्न वेबसाईटसाठी म्हणजेच 'झी 24 तास'च्या वेबसाईटसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी ते ताज्या घडामोडींबरोबरच, राजकीय बातम्या, ब्रेकिंग बातम्या, ट्रेडिंग बातम्या हाताळतात. बातमीमधील अचूक माहिती, व्याकरण, उत्तम मथळे यासारख्या गोष्टींकडे त्यांचं कटाक्षाने लक्ष असतं. लिखाणबरोबरच मॅरेथॉन पळणं, वेगवेगळ्या ठिकाणी खादडीसाठी जाणं, पुस्तकांसोबतच अवांतर वाचन यासारख्या गोष्टींना ते प्राधान्य देतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

2

भूगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

3

₹100 च्या नोटांचे बंडल, आधी 'लंच ब्रेक'चं कारण अन् नंतर...; SBI मध्ये ग्राहकाने शूट केलेला धक्कादायक Video पहिला का?

4

'...तर तुम्ही ठाण्यातून परत जाणार नाही'; आदित्य ठाकरेंच्या उद्याच्या दौऱ्याआधीच शिंदेंच्या शिवसेनेचा विरोधकांना इशारा

5

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील 3 वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करुन तिची निर्घृण हत्या केल्या प्रकरणी आरोपीला फाशीची सिक्षा सुनावण्यात आली आहे. मालेगाव सत्र न्यायालयाने हे प्रकरण दुर्मिळात दुर्मिळ प्रकरण असल्याचं नमूद करत ही शिक्षा सुनावली आहे. नोव्हेंबर 2025 मध्ये घडलेल्या या गुन्ह्यातील आरोपी विजय संजय खैरनारवरील सर्व आरोप न्यायालयात सिद्ध झाल्यानंतर आज या प्रकरणामध्ये अंतिम निकाल देण्यात आला.

निकाल देताना न्यायालयाने काय म्हटलं?

निर्भया प्रकरणासह इतर प्रकरणांची पडताळणी न्यायालयाने निकाल देताना केली. बालिकेचे वय लक्षात घेतलं तर ते प्रकरण आणि या प्रकरणामधील सर्व बाबी जुळतात, असं निरिक्षण न्यायालयाने नोंदवलं. हे प्रकरण दुर्मिळातील दुर्मिळ प्रकरण आहे. या महत्त्वाच्या प्रकरणामध्ये फाशीची शिक्षा सुनावण्यात येत आहे, असं न्यायालयाने निकाल देताना जाहीर केलं.

नेमकं घडलेलं काय?

16 नोव्हेंबर 2025 रोजी मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात घडलेल्या घटनेमध्ये  3 वर्षांच्या चिमुरडीचे अपहरण करुन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्यानंतर आरोपीने विजय खैरनारने तिची हत्या केली. प्राथमिक तपासानुसार, मुख्य आरोपी 24 वर्षांचा असून पीडित मुलीच्या वडिलांसोबत घटनेच्या सुमारे महिनाभरापूर्वी भांडण झाले होते. याच भांडणाचा राग मनात ठेवून सूड उगवण्याच्या उद्देशाने आरोपी विजयने अंगणात खेळत असलेल्या तीन वर्षांच्या चिमुरडीचे अपहरण केले. नराधम विजय खैरनार चिमुरडीला अज्ञात स्थळी नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आणि त्यानंतर पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने दगडाने डोके ठेचून तिची निर्घृण हत्या केली.

गावकऱ्यांचा रास्तारोको

घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी महामार्ग रोखून तीव्र निदर्शने केली आणि आरोपीला फाशी देण्याची मागणी केली. पोलिसांनी तत्परता दाखवत आरोपी विजय खैरनारला तात्काळ अटक केली. जनतेचा आक्रोश आणि प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्य सरकारने हे प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवण्याचे निर्देश दिले.

अवघ्या 23 दिवसांमध्ये तपास

पोलिसांनी अवघ्या 23 दिवसांत तपास पूर्ण करून न्यायालयात 425 पानांचे दोषारोपपत्र दाखल केले.

आरोपी सिद्ध झाले

30 सप्टेंबर 2026 रोजी मालेगाव अप्पर जिल्हा आणि सत्र न्यायालयाने दोन्ही बाजूंचे युक्तिवाद आणि 24 साक्षीदारांचे जबाब नोंदवल्यानंतर आरोपी विजय खैरनारला लैंगिक अत्याचार, हत्या आणि पुरावे नष्ट करण्याच्या गुन्ह्यांत दोषी ठरवले. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार किंवा सीसीटीव्ही नसतानाही वैज्ञानिक पुरावे म्हणजेच डीएनए रिपोर्ट आणि परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे न्यायालयात दोष सिद्ध झाले. सरकारी पक्षाने आरोपीला कठोरात कठोर म्हणजेच फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली होती.

एका वर्षाच्या आत आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली

पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी सरकारने प्रख्यात विधिज्ञ ॲड. उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली होती. या प्रकरणामध्ये गुन्हा घडल्यानंतर एका वर्षाच्या आत आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. प्रकरणाचा निकाल लागल्यानंतर ॲड. उज्ज्वल निकम यांनी पत्रकार परिषद घेऊन न्यायालयातील युक्तिवादाची माहिती दिली.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Nashik
crime