मुलीने आंतरजातीय विवाह केल्यामुळं नाराज असलेल्या आई-वडिलांनी असं काही केलं की परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आई-वडिलांनी पोटच्या मुलीचेच अपहरण केल्याची घटना नाशिक जिल्ह्यात घडली आहे. या प्रकरणी पीडित मुलीचे वडिल आण नातेवाईकांविरोधात नाशिकच्या आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुलीने आंतरजातीय विवाह केला म्हणून तिच्या घरच्यांचा तिच्यावर राग होता. आई -वडिलांसह तिच्या इतर नातेवाईकांनी मुलीला व जावयाला जबरदस्तीने नेण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. नाशिक पूणे महामार्गे येथील शिंदे-पळसे टोलनाक्यावर मुलीच्या नातेवाईकांनी मुलाला धमकावले असल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
नाशिक पुणे-महामार्गे येथील शिंदे-पळसे टोलनाक्यावरुन येत असताना. आरोपींनी मुलाला धमकावले आणि गाडीच्या खाली ढकलले त्यानंतर मुलीला घेऊन ते नागपूर येथे गेले. पीडितेला नागपूरला मामाच्या घरी नेऊन डांबून ठेवण्यात आले. तसंच, तिचे दुसरे लग्न लावून देण्यासाठी तिच्यावर दबाव वाढवल्याचही पीडितेने तक्रारीत म्हटलं आहे.
मुलीने आई-वडिलांविरोधातच मारहाण आणि अपहरण केल्याची फिर्याद दिली आहे. पीडित मुलीचे वडील आणि नातेवाईक विरोधात नाशिकच्या आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.
मालेगाव विषबाधा प्रकरणाची प्रशासनाकडून गंभीर दखल
नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील नांदगाव बुद्रुक येथे भेळभत्ता खालल्याने सुमारे 190 जणांना विषबाधा झाला होती..या प्रकरणाची प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून ,भेळ भत्ता विक्रेता भिला मोरे याच्या विरोधात मालेगाव तालुका पोलिसात अन्नसुरक्षा व मानके कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.या घटनेचा मालेगाब तालुका पोलिस अधिक तपास करीत आहे. तसेच या प्रकरणी अन्न व औषध प्रशासनाने भेळ भत्त्याचे नमुने घेतले असून तपासणीसाठी प्रयोग शाळेत पाठविण्यात आले आहे.