• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /नाशिक
  • /महाराष्ट्रात खळबळ! एफडीएच्या 12 अधिकाऱ्यांवर निलंबनाची टांगती तलवार, काय घडलं नेमकं?

महाराष्ट्रात खळबळ! एफडीएच्या 12 अधिकाऱ्यांवर निलंबनाची टांगती तलवार, काय घडलं नेमकं?

अन्न व औषध प्रशासनातील (एफडीए) भ्रष्ट कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. नाशिकमधील पाच प्रमुख अधिकाऱ्यांसह राज्यातील तब्बल 12 अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई होण्याची दाट शक्यता

Written ByMansi KshirsagarEdited ByMansi Kshirsagar
Published: Oct 02, 2026, 09:56 AM IST|Updated: Oct 02, 2026, 09:57 AM IST
joinshare
महाराष्ट्रात खळबळ! एफडीएच्या 12 अधिकाऱ्यांवर निलंबनाची टांगती तलवार, काय घडलं नेमकं?
Image Credit: maharashtra Fda 12 Officers Face Threat Of Suspension

About the Author

Mansi Kshirsagar

Mansi Kshirsagar

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि जनरल बातम्यांमध्ये हातखंडा आहे. पायाभूत सुविधा म्हणजेच infrastructure, मुंबई लोकल संबंधित बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. महाराष्ट्र व मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्पाचे अपडेट वाचकापर्यंत पोहोचवतात.त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड आहे.  गुन्हेविषयक बातम्या आणि त्याचे विश्लेषणात्मक लेख आणि त्याचा अभ्यासपूर्ण मसुदा वाचकांना समजेल अशा भाषेत लिहिण्याची विशेष आवड आहे. त्याचबरोबर, लाइफस्टाईल आणि हवामानासंदर्भातील बातम्यांमध्येसुद्धा त्यांचा विशेष हातखंडा आहे.डिजिटल मीडियातील कारकीर्दमानसी यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात डिजीटल मीडियापासून केली. ग्रुम अँड ग्रो या अॅपसाठी कंटेट रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये रुजू झाल्या.  मनोजरंन बातम्यांपासून सुरुवात केल्यानंतर जनरल बातम्या, अर्थविषयक बातम्या, क्राइम आणि लाइफस्टाईल विषयाशी निगडीत विषयांवर लिहिण्यास सुरुवात केली. मानसी या आता झी 24 तासमध्ये राजकीय, सामाजिक आणि इन्फ्रासंदर्भातील बातम्या प्रामुख्याने करतात.शैक्षणिक पात्रतामानसी क्षीरसागर यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

2

भूगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

3

₹100 च्या नोटांचे बंडल, आधी 'लंच ब्रेक'चं कारण अन् नंतर...; SBI मध्ये ग्राहकाने शूट केलेला धक्कादायक Video पहिला का?

4

'...तर तुम्ही ठाण्यातून परत जाणार नाही'; आदित्य ठाकरेंच्या उद्याच्या दौऱ्याआधीच शिंदेंच्या शिवसेनेचा विरोधकांना इशारा

5

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

महाराष्ट्रातील अन्न व औषध प्रशासन विभाग पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. गेल्या काही दिवसांपासून FDA कडून विविध ठिकाणी छापेमारी करण्यात येत असून अन्नभेसळ करणाऱ्या अस्थापनांवर कारवाई करण्यात येत आहे. मात्र आता एफडीए वेगळ्यात कारणामुळं चर्चेत आले आहे. अन्न व औषध प्रशासनातील (एफडीए) भ्रष्ट कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. अन्न व औषध प्रशासनांतर्गत मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

महाराष्ट्रातील अन्न व औषध प्रशासनातील (FDA) भ्रष्ट कारभार समोर आल्यानंतर नाशिकमधील 5 प्रमुख अधिकाऱ्यांसह राज्यातील तब्बल 12 अधिकाऱ्यांवर थेट निलंबनाची कारवाई होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. या घटनेने राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काही अधिकाऱ्यांकडून नियमांना बगल देऊन मनमानी कारभार सुरू होता. कागदोपत्री कारवाया दाखवणे आणि न्यायालयाच्या स्पष्ट आदेशांचा अवमान केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या सर्व प्रकरणात नाशिक विभागातील पाच महत्त्वाच्या अधिकाऱ्यांची नावे समोर आली आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी अंतिम टप्प्यात असून, दोषींवर कठोर शिस्तभंगाचे कायदेशीर संकेत मिळत आहेत.

एफडीएच्या संबंधित अधिकाऱ्यांचा मिळून 12 जणांचा हा गट असून, या सर्वांवरच प्रशासकीय पातळीवरून कठोर दंडात्मक व निलंबनाची कारवाई केली जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. या पाच अधिकाऱ्यांसह एकूण १२ जणांवर होणाऱ्या या संभाव्य कारवाईमुळे महसूल व शासकीय वर्तुळात धावपळ उडाली आहे. येत्या काही दिवसांत यावर अधिकृत आदेश धडकण्याची शक्यता आहे.

संजय राऊतांनीही केलेले ट्विट

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत  यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांना एक पत्र लिहलं असून यात धक्कादायक बाबी मांडल्या आहेत. खासदार संजय राऊत यांनी FDA अधिकाऱ्यांकडून सुरू असलेल्या लुटीबाबत तात्काळ कारवाईच्या मागणी केली आहे. याबाबत त्यांनी काही आरोपही केले आहे.  FDA अधिकाऱ्यांकडून सुरू असलेल्या लुटीबाबत तात्काळ कारवाईच्या मागणी केली आहे.  हॉटेल व्यावसायिकांना धमक्या, ब्लॅकमेल करून पैसे गोळा करण्याचा हा उद्योग आता पूर्वीपेक्षा जास्त जोमाने सुरू झाला आहे, असा आरोप संजय राऊतांनी केला आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Nashik
FDA
Tukaram Mundhe