• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /नाशिक
  • /विवाहित महिलेवर सामूहिक अत्याचार; संपूर्ण प्रकरण समजल्यावर पोलिसही चक्रावले

विवाहित महिलेवर सामूहिक अत्याचार; संपूर्ण प्रकरण समजल्यावर पोलिसही चक्रावले

धुळ्यात एक अत्यंत धक्कादायक प्रकार घडला आहे. एका विवाहित महिलेवर सामूहिक अत्याचार झाला आहे. आरोपींचे भयानक कृत्य पहाून पोलिसही हादरले आहेत.

Reported ByVanita Kamble
Published: Oct 04, 2026, 12:01 AM IST|Updated: Oct 04, 2026, 12:06 AM IST
joinshare
विवाहित महिलेवर सामूहिक अत्याचार;  संपूर्ण प्रकरण समजल्यावर पोलिसही चक्रावले

About the Author

Vanita Kamble

Vanita Kamble

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
भुगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

भुगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

2

₹100 च्या नोटांचे बंडल, आधी 'लंच ब्रेक'चं कारण अन् नंतर...; SBI मध्ये ग्राहकाने शूट केलेला धक्कादायक Video पहिला का?

3

'...तर तुम्ही ठाण्यातून परत जाणार नाही'; आदित्य ठाकरेंच्या उद्याच्या दौऱ्याआधीच शिंदेंच्या शिवसेनेचा विरोधकांना इशारा

4

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

5

पूर्णेकर प्रकरण तापलं! शिंदेंच्या शिवसेनेचं कार्यकर्त्यांना आवाहन; पूर्णेकर समर्थक पोलीस स्टेशनमध्ये

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

धुळे क्राईम न्यूज : विवाहित महिलेवर सामूहिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना धुळ्यात घडली आहे. पीडित महिलेचे आक्षेपार्ह फोटो काढले.  नवऱ्याला फोटो दाखवतो” म्हणत धमकी देत तिघांनी या महिलेवर अत्याचार केला आहे. महिलेच्या तक्रारीनंतप पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.  

धुळे शहरातील रामदेव बाबा नगर परिसरात एका विवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याचा गंभीर आरोप समोर आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी आझादनगर पोलीस ठाण्यात विविध कलमन्वये तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेच्या कथनानुसार 30 तारखेला सकाळी कामावर जात असताना तिची प्रकृती बिघडली. डोके-पोट दुखणे आणि चक्कर येत असल्याने तिने एका अनोळखी व्यक्तीकडे लिफ्ट मागितली. त्या व्यक्तीने तिला मदत म्हणून लिफ्ट दिली.

दरम्यान, काही जणांनी महिलेला त्या व्यक्तीसोबत पाहिल्यानंतर दोघांचे अनैतिक संबंध असल्याचा संशय घेतला. त्यानंतर महिलेचे संबंधित व्यक्तीसोबत फोटो काढून “हे फोटो तुझ्या नवऱ्याला दाखवतो,” अशी धमकी देत तिला ब्लॅकमेल केल्याचा आरोप आहे.महिलेच्या म्हणण्यानुसार, घरात कोणी नसल्याची संधी साधून आरोपींनी तिच्यावर जबरदस्ती केली. तसेच घटनेचा व्हिडिओ तयार करून त्याद्वारे ब्लॅकमेल करण्यात आले आणि पैसेही घेतल्याचा आरोप तिने केला आहे.

या प्रकरणात महिलेने साहिल, बाबू आणि अबू बकर अशी नावे सांगितली असून, पोलिसांच्या अधिकृत नोंदीनुसार आरोपी म्हणून साहिल हबीब पिंजारी, बाबू इरफान शाह आणि समद शेख जब्बार यांची नावे नमूद आहेत. पोलिस अधिकाऱ्यांसह सामाजिक-राजकीय क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती प्रकरण समोर आल्यानंतर आझादनगर पोलीस ठाण्यात धुळे जिल्ह्याचे अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे आणि आझादनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पाटील यांच्यासह सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पीडित महिलेने आरोपींना तातडीने अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.  दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि शांतता राखावी, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Dhule
crime
Maharashtra News