SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

नाशिकमध्ये आणखी एक पर्यटनस्थळ उभारणार, अध्यात्माशी थेट संबंध; कुंभमेळ्यासाठी....

नाशिकला लवकरच नवीन ओखळ मिळणार. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर लवकरच नाशिकमध्ये रामायण थीम पार्क उभारणार

Written By Mansi Kshirsagar Edited By Mansi Kshirsagar
Published: Sep 30, 2026, 09:27 AM IST | Updated: Sep 30, 2026, 09:30 AM IST
Image Credit: Ramayan Theme Park in the Adgaon area
Join

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यात अनेक महत्त्वाची कामे हाती घेण्यात आली आहेत. प्रशासनाकडून विविध कामांना गती देण्यात आली आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या धार्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी आडगावमध्ये रामायण थीम पार्क साकारण्यात येणार आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भाविकांना रामायणातील विविध प्रसंगांचा दिव्य अनुभव घेता येणार आहे.

रामायण थीम पार्क महापालिकेच्या आडगाव येथील सर्व्हे क्रमांक 772 मधील राखीव जागेवर हा भव्य प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. महापालिकेवर अतिरिक्त आर्थिक भार न टाकता सार्वजनिक-खासगी भागीदारीच्या (पीपीपी) तत्त्वावर हा प्रकल्प विकसित करण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे नाशिकच्या धार्मिक ओळखीला आणि पंचवटीच्या महात्म्याला जागतिक स्तरावर नवी ओळख मिळणार आहे.

रामायणातील प्रसंगाचा दिव्य अनुभव येणार

रामायणातील प्रभू श्रीराम यांचे बालपण, अयोध्याकांड, अरण्यकांड, सुंदरकांड आणि युद्धकांड यातील प्रसंग अत्याधुनित तंत्रज्ञानाच्या माध्यमातून साकारले जाणार आहेत. त्यामुळं भाविकांना आणि पर्यटकांना रामायणातील पात्रांचा लाइव्ह अनुभव घेता येणार आहे. रामायणातील आदर्श, प्रभू श्रीरामांचे जीवनचरित्र वनवासातील प्रसंगहे सुद्धा पर्यटकांना अनुभवता येणार आहे.

पंचवटीचा नवी ओळख मिळणार

नाशिक आणि रामायणाचा संदर्भ पुराणातही आढळतो. प्रभू श्री राम, माता सीता आणि लक्ष्मण यांनी वनवासातील काही काळ नाशिकमध्ये व्यतित केला होता. त्यामुळं पंचवटीला धार्मिक व पौराणिक महत्त्व आहे. तसंच, नाशिकमध्ये पर्यटकांची रेलचेलही अधिक असते. या पार्श्वभूमीवर थीम पार्क प्रस्तावित करण्यात आले आहे. नाशिकच्या रामायणकालीन वारशाचे आधुनिक दर्शन यानिमित्ताने होणार आहे.

कुशावर्त भाविकांसाठी बंद

1 ते 30 ऑक्टोबरपर्यंत त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त भाविकांसाठी बंद राहणार आहे. प्रशासनाने 31 ऑक्टोबरला  असलेल्या सिंहस्थ कुंभमेळा ध्वजारोहणाच्या तयारीसाठी कुंडाचे  काम हाती घेतले आहे. कुंडाचे संवर्धन, दुरुस्ती, अद्यावतीकरण आणि सुशोभीकरणाचे काम   हाती घेतल्याने कुंड राहणार बंद. १ ऑक्टोबरपासून ऐन पितृपक्षात भाविकांना आता कुशावर्तात स्नानाची संधी हुकणार आहे.  नाशिक आणि त्र्यंबकेश्वरी एकाच वेळी ध्वजारोहण केले जाणार आहे. यानिमित्ताने त्र्यंबकेश्वरच्या कुशावर्ताची कामे  करण्यात आली आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि जनरल बातम्यांमध्ये हातखंडा आहे. पायाभूत सुविधा म्हणजेच infrastructure, मुंबई लोकल संबंधित बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. महाराष्ट्र व मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्पाचे अपडेट वाचकापर्यंत पोहोचवतात.त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड आहे.  गुन्हेविषयक बातम्या आणि त्याचे विश्लेषणात्मक लेख आणि त्याचा अभ्यासपूर्ण मसुदा वाचकांना समजेल अशा भाषेत लिहिण्याची विशेष आवड आहे. त्याचबरोबर, लाइफस्टाईल आणि हवामानासंदर्भातील बातम्यांमध्येसुद्धा त्यांचा विशेष हातखंडा आहे.डिजिटल मीडियातील कारकीर्दमानसी यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात डिजीटल मीडियापासून केली. ग्रुम अँड ग्रो या अॅपसाठी कंटेट रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये रुजू झाल्या.  मनोजरंन बातम्यांपासून सुरुवात केल्यानंतर जनरल बातम्या, अर्थविषयक बातम्या, क्राइम आणि लाइफस्टाईल विषयाशी निगडीत विषयांवर लिहिण्यास सुरुवात केली. मानसी या आता झी 24 तासमध्ये राजकीय, सामाजिक आणि इन्फ्रासंदर्भातील बातम्या प्रामुख्याने करतात.शैक्षणिक पात्रतामानसी क्षीरसागर यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.

ZEENEWS TRENDING STORIES