• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /पुणे
  • /पुण्यात बस, कारसह 11 वाहनांची तोडफोड; सुरक्षा रक्षकावर जीवघेणा हल्ला

पुण्यात बस, कारसह 11 वाहनांची तोडफोड; सुरक्षा रक्षकावर जीवघेणा हल्ला

पुण्यात हडपसर परिसरात कोयत्याच्या हल्ल्याने खळबळ माजली आहे. 11 वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. सुरक्षा रक्षकावर देखील हल्ला करण्यात आला आहे.

Reported ByVanita Kamble
Published: Nov 15, 2026, 06:58 PM IST|Updated: Nov 15, 2026, 07:02 PM IST
joinshare
पुण्यात बस, कारसह 11 वाहनांची तोडफोड; सुरक्षा रक्षकावर जीवघेणा हल्ला

About the Author

Vanita Kamble

Vanita Kamble

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप? ऑपरेशन टायगर 3.0

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप? ऑपरेशन टायगर 3.0

2

पंढरपूरमध्ये NDRF ची टीम दाखल; 50 फूट खोल विहिरीत कामगार अडकले; एकाचा मृत्यू

3

भारताच्या हवामानात डेंजर बदल, 12 राज्यांना पावसाचा अलर्ट; 145 स्पीडने वारे वाहणार, मोठं वादळ धडकणार, महाराष्ट्रावर काय परिणाम होणार?

4

NVIDIA चे CEO जेन्सन हुआंग यांच्या चिनी गर्लफ्रेंडबाबत आजपर्यंतचा सर्वात मोठा खुलासा; 2025 मध्येच सिंगापूरच्या कंपनीतून...

5

ICC ची मोठी घोषणा; भारतामध्ये होणार 'या' जागतिक मोठ्या स्पर्धा! वेळापत्रक जाहीर

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

पुणे क्राईम : पुण्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत. गुन्हेगार सातत्याने जहशत माजवण्याचा प्रयत्न करत आहेत.  पुण्यातील हडपसरमध्ये सुरक्षा रक्षकावर कोयत्याने जीवघेणा हल्ला झाला. बस, कारसह 11 वाहनांची तोडफोड देखील करण्यात आली आहे. पुणे पोलीस आयुक्तांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला जात आहे.

पुण्यातील हडपसर परिसरात चिंतामणीनगर येथील भाजी मंडई परिसरात शनिवारी रात्री दीडच्या सुमारास थरारक घटना घडली. एका सुरक्षा रक्षकावर कोयत्याने वार करण्यात आले आहेत. आकाश कोतवळे असे या सुरक्षा रक्षकाचे नाव आहे. आकाश कोतवळे हे या हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहेत. खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. 

 सुरक्षारक्षकावर  हल्ला केल्यानंतर आरोपींनी 11 वाहनांची तोडफोड केली आहे. यात एक कार आणि एका बसचा समावेश आहे. यात वाहनांचे मोठे नुकसान जाले आहे. हल्ल्याचा हा सर्वा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

या प्रकरणी काळेपडळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अन्‍जू ऊर्फ मोहम्मद हुसेन शब्बीर शेख आणि अविनाश सतीश केकाणे या तीन आरोपींना अटक केली आहे. अन्य दोन आरोपी फरार आहेत.  पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरिजा निंबाळकर यांच्या मार्गदर्शना खाली तपास सुरू आहे.

फटाके वाजवण्यावरून दोन कुटुंबांत तुफान राडा

घरात लहान बाळ असल्याने फटाके वाजवू नका, असे सांगणे एका कुटुंबाला चांगलेच महागात पडले. शिरूर तालुक्यातील आंबळे येथील काजळेवस्तीवर फटाके वाजवण्याच्या कारणावरून दोन कुटुंबांत वाद झाला. या वादाचे रूपांतर थेट मारहाणीत झाले.

या हाणामारीत काठी आणि कुऱ्हाडीचा वापर झाल्याचा आरोप आहे. यात एकाच कुटुंबातील पाच जण जखमी झाले असून, शिरूर पोलिसांनी 13 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

घरगुती वादातून मारहाण, दुकानाची तोडफोड

पुण्यात घरगुती वादातून झालेल्या मारहाण आणि दुकानाच्या तोडफोडीप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पुणे शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष रेहान बाबुडे यांनी रेहान जुबैर शेख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. बहिणीच्या पतीला मारण्यासाठी सुपारी दिल्याचा आरोपही त्यांनी केला. घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून, कॉल रेकॉर्ड आणि इतर पुराव्यांची निष्पक्ष तपासणी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी बाबुडे यांनी केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास कोंढवा पोलीस करत आहेत.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
crime
Pune
Pune News