पुण्यात बस, कारसह 11 वाहनांची तोडफोड; सुरक्षा रक्षकावर जीवघेणा हल्ला
पुण्यात हडपसर परिसरात कोयत्याच्या हल्ल्याने खळबळ माजली आहे. 11 वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. सुरक्षा रक्षकावर देखील हल्ला करण्यात आला आहे.
पुणे क्राईम : पुण्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत. गुन्हेगार सातत्याने जहशत माजवण्याचा प्रयत्न करत आहेत. पुण्यातील हडपसरमध्ये सुरक्षा रक्षकावर कोयत्याने जीवघेणा हल्ला झाला. बस, कारसह 11 वाहनांची तोडफोड देखील करण्यात आली आहे. पुणे पोलीस आयुक्तांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला जात आहे.
पुण्यातील हडपसर परिसरात चिंतामणीनगर येथील भाजी मंडई परिसरात शनिवारी रात्री दीडच्या सुमारास थरारक घटना घडली. एका सुरक्षा रक्षकावर कोयत्याने वार करण्यात आले आहेत. आकाश कोतवळे असे या सुरक्षा रक्षकाचे नाव आहे. आकाश कोतवळे हे या हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहेत. खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
सुरक्षारक्षकावर हल्ला केल्यानंतर आरोपींनी 11 वाहनांची तोडफोड केली आहे. यात एक कार आणि एका बसचा समावेश आहे. यात वाहनांचे मोठे नुकसान जाले आहे. हल्ल्याचा हा सर्वा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
या प्रकरणी काळेपडळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अन्जू ऊर्फ मोहम्मद हुसेन शब्बीर शेख आणि अविनाश सतीश केकाणे या तीन आरोपींना अटक केली आहे. अन्य दोन आरोपी फरार आहेत. पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरिजा निंबाळकर यांच्या मार्गदर्शना खाली तपास सुरू आहे.
फटाके वाजवण्यावरून दोन कुटुंबांत तुफान राडा
घरात लहान बाळ असल्याने फटाके वाजवू नका, असे सांगणे एका कुटुंबाला चांगलेच महागात पडले. शिरूर तालुक्यातील आंबळे येथील काजळेवस्तीवर फटाके वाजवण्याच्या कारणावरून दोन कुटुंबांत वाद झाला. या वादाचे रूपांतर थेट मारहाणीत झाले.
या हाणामारीत काठी आणि कुऱ्हाडीचा वापर झाल्याचा आरोप आहे. यात एकाच कुटुंबातील पाच जण जखमी झाले असून, शिरूर पोलिसांनी 13 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घरगुती वादातून मारहाण, दुकानाची तोडफोड
पुण्यात घरगुती वादातून झालेल्या मारहाण आणि दुकानाच्या तोडफोडीप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पुणे शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष रेहान बाबुडे यांनी रेहान जुबैर शेख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. बहिणीच्या पतीला मारण्यासाठी सुपारी दिल्याचा आरोपही त्यांनी केला. घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून, कॉल रेकॉर्ड आणि इतर पुराव्यांची निष्पक्ष तपासणी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी बाबुडे यांनी केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास कोंढवा पोलीस करत आहेत.