सोलापूर : सोलापुरात मोठी राजकीय घडामोड घडली आहे. सोलापुरात भाजपकडून शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. मंगळवेढा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सुनंदा आवताडे यांच्यासह 5 नगरसेवकांनी भाजपात प्रवेश केला आहे. या 5 नगरसेवकांसह 250 पदाधिकाऱ्यांनी भाजपचे कमळ हाती घेतले आहे. यामुळे भाजपची ताकद आणखी वाढली आहे.
प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये हा मोठा पक्ष प्रवेश झाला आहे. तसेच खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष सिद्धेश्वर आवताडे, डीसीसीचे माजी उपाध्यक्ष बबनराव आवताडे यांच्यासह 250 पदाधिकाऱ्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. ऐन डीसीसी बँक आणि विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर भाजपत प्रवेशामुळे शिवसेना पक्षाला मोठा धक्का मानला जात आहे.
डीसीसी बँक आणि विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठी लॉटरी लागली आहे. खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष सिद्धेश्वर आवताडे, डीसीसीचे माजी उपाध्यक्ष बबनराव आवताडे यांच्यासह 250 पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये पक्ष प्रवेश केला आहे.
मंगळवेढा शहरासह ग्रामिणचे 10 सरपंच, 40 ग्रामपंचायत सदस्य, बाजार समिती सभापतीसह 17 संचालक, खरेदी विक्री संघाचे 15 सदस्य, 70 सोसायटी सदस्यांनी प्रवेश केला. नगरपरिषदेला बबनराव आवताडे गटाने तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवली होती. मात्र आता ऐन डीसीसी बँक आणि विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर भाजपत प्रवेशामुळे शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का मानला जात आहे.
ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 30 मधून निवडून आलेली एमआयएम पक्षाची नगरसेविका सहर शेख हिचे वडील युनूस शेख यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेनेत प्रवेश करताच त्यांची अखिल भारतीय केबल सेनेच्या कळवा मुंब्रा अध्यक्षपदी नियुक्तीही करण्यात आली. ठाणे महानगरपालिकेची निवडणूक जिंकल्यानंतर सहर शेख हिचे एक भाषण व्हायरल झाले होते. यामध्ये तिने 'कैसा हराया..', असे म्हणत विरोधकांना डिवचले होते. सहर शेखचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला होता. याच सभेत सहर शेख हिने आपल्याला येणा-या काळात संपूर्ण मुंब्रा हिरव्या रंगाने व्यापून टाकायचा आहे, असे म्हटले होते. तिच्या या वक्तव्यावरुन प्रचंड टीका झाली होती. टीका करणाऱ्यांमध्ये महायुतीसह शिंदे सेनेचाही समावेश होता. त्यामुळे आता शिंदेंकडून युनूस शेख यांना मानाचं पान दिल्यानं उलटसुलट चर्चा रंगल्या आहेत.