SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

गोकुळच्या 4 संचालकांच्या नियुक्तीचा वाद; अभिजीत दिपके यांचा थेट मुख्यमंत्र्यांना सवाल, फक्त एकच प्रश्न विचारला

गोकुळच्या 4 संचालकांच्या नियुक्तीच्या वादावर कॉकरोज जनता पार्टीचे नेते अभिजीत दिपके यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अभिजीत दिपके यांनी थेट मुख्यमंत्र्यांन सवाल केला आहे.

Reported By Vanita Kamble Written By Vanita Kamble
Published: Nov 09, 2026, 18:24 IST | Updated: Nov 09, 2026, 18:30 IST
Join

अभिजीत दिपके : गोकुळच्या 4 संचालकांच्या नियुक्तीवरून मोठा वाद निर्माण झाला आहे.   राज्य सरकारने नियुक्त केलेल्या 4 संचालकांविरोधात सतेज पाटील यांनी तीव्र आंदोलन केले. शासन नियुक्त संचालकांना मतदानाचा दिलेला अधिकाराचा अध्यादेश असंवैधानिक असल्याने रद्द करावा अशी मागणी त्यांनी केली आहे. विद्यार्थी नेता विवेकानंद पाटील यांनी देखील  4 संचालकांच्या नियुक्तीवरून सरकारवर हल्लाबोल केला आहे. यानंतर आता कॉकरोज जनता पार्टीचे नेते अभिजीत दिपके यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी सरकारवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. 

जी मुलं आंदोलन करत होते त्यांना मुख्यमंत्री अराजकवादी तत्व म्हणत होते, असंवैधानिक तत्व म्हणत होते खास करून आम्हाला कॉकरोज जनता पार्टीला. पण कोल्हापूरमध्ये गोकुळच्या निवडणुकीत जे काही झालं ते आपण सगळे बघतोय. कशाप्रकारे निवडणूक हारल्यानंतरही भाजपने कसे त्यांच्या सरकारने चार अजून मेंबर्स अपॉइंट करून एक होस्टाईल टेकओव्हर करण्याचा प्रयत्न केला. ज्यानेकरून निवडणूक हारल्यानंतरही जो कंट्रोल आहे त्या कॉर्पोरेशनचा तो भाजपकडे असला पाहिजे अंस गंभीर आरोप अभिजीत दिपके यांनी केला आहे.

मुख्यमंत्री साहेबांना मला विचारायचं अराजकवादी कोण आहे? अराजकवादी आम्ही आहोत की तुम्ही आहात? जे जनतेचा कौल मानत नाहीये, अराजकवादी आम्ही आहोत का तुम्ही आहात? जे निवडणूक हारल्यानंतरही संविधानाच्या विरोधात जाऊन त्या कॉर्पोरेशनचा एक होस्टाईल टेकओवर करण्याचा डाव आहे. निवडणूक हारल्यानंतरही  काही करून स्वतःची सत्ता स्थापन करायला बघत आहेत .

हे कधीपर्यंत चालणार आहे? विचार करा जर एका दूध संघाच्या निवडणुकीसाठी हे लोक या पातळीवर पडू शकतात. तर जिथे जिथे राज्यस्तरीय निवडणुका होतात तिथे हे ज्ञानेश कुमारच्या मदतीने कुठल्या लेव्हलला मॅंडेट चोरी करत असतील. कोल्हापूरच्या सगळ्या शेतकऱ्यांना माझा सलाम आहे. जे रस्त्यावर उतरून या गैरसंविधानिक आणि अराजक प्रयत्नांचा विरोध करत आहेत. काही झालं तरी जनतेचा जो कौल आहे तो शेवटचा कौल असला पाहिजे आणि त्याचं होस्टाईल टेकओव्हर होता कामा नये असं अभिजीत दिपके म्हणाले.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES