• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /पुणे
  • /अदानीचा महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रकल्प अडचणीत; वनविभागाचे काम बंदचे आदेश; 5675 कोटींचा प्रकल्प

अदानीचा महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रकल्प अडचणीत; वनविभागाचे काम बंदचे आदेश; 5675 कोटींचा प्रकल्प

तारळी प्रकल्पाच्या कामाला वनविभागाने दणका दिला आहे. 13 नोव्हेंबरलाच काम बंदचे आदेश देण्यात आले आहेत. 5675 कोटींचा प्रकल्प 56.75 कोटींचा दाखवल्याचा रोहन भाटे यांचा आरोप आहे.

Reported ByVanita Kamble
Published: Nov 17, 2026, 15:34 IST|Updated: Nov 17, 2026, 15:41 IST
joinshare
अदानीचा महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रकल्प अडचणीत;  वनविभागाचे काम बंदचे आदेश; 5675 कोटींचा प्रकल्प

About the Author

Vanita Kamble

Vanita Kamble

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
पुणे, मुंबई नाही तर महाराष्ट्रातील या जिल्ह्यातील लोक अव्वल!  फॅन्सी नंबरसाठी तब्बल 19 कोटी 84 लाख रुपये मोजले

पुणे, मुंबई नाही तर महाराष्ट्रातील या जिल्ह्यातील लोक अव्वल! फॅन्सी नंबरसाठी तब्बल 19 कोटी 84 लाख रुपये मोजले

2

नवी मुंबईतील तरुणाने एकाचवेळी खरेदी केल्या 3 महागड्या कार; एवढ्या पैशात 1 कोटीचे 50 फ्लॅट विकत घेता येतील

3

टायफॉइड झाल्यावर शरीरात कोणते बदल होतात? जाणून घ्या महत्त्वाची लक्षणे

4

इमर्जिंग आशिया कप 2026 पहिल्या सामन्यात वैभव सूर्यवंशीला संधी मिळणार? कशी असेल भारताची Playing 11

5

NBCC ने सुधारली आपली चूक, 49 फ्लॅट्सबाबत कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याचं केलं मान्य; आपल्या जोखमीवर लिलावात सहभागी होण्याचं आवाहन

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

सातारा : सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील तारळी पंप स्टोरेज प्रकल्पावरून आता वाद चांगलाच पेटला आहे. राष्ट्रीय वन्यजीव मंडळाची आवश्यक पूर्वपरवानगी न घेताच प्रकल्पाचे काम सुरू केल्याचा ठपका ठेवत पाटण वनविभागाने 13 नोव्हेंबर रोजीच अदानी कंपनीला नोटीस बजावत काम बंद करण्याचे आदेश दिले आहेत. त्यातच अभिनेते सयाजी शिंदे आणि प्रकल्पविरोधी लढ्याचे नेते विवेकानंद पाटील यांनी प्रकल्पस्थळी पाहणी करून पाटण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तर या प्रकल्पातील आर्थिक अनियमिततेचा मुद्दा सर्वप्रथम राज्य सरकारच्या निदर्शनास आणून देणारे मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांनी तब्बल 100 पट तफावतीचा गंभीर आरोप केला आहे. त्यामुळे तारळी प्रकल्पाभोवतीचा वाद आता अधिकच चिघळला आहे.

पाटण तालुक्यातील तारळी धरण परिसरात उभारण्यात येणाऱ्या पंप स्टोरेज प्रकल्पाला स्थानिकांकडून विरोध होत असतानाच आता वनविभागाच्या कारवाईने प्रकल्पाच्या अडचणी वाढल्या आहेत.13 नोव्हेंबर 2026 रोजी पाटण वनक्षेत्रपाल कार्यालयाने अदानी प्रकल्पाच्या अधिकृत स्वाक्षरीदाराला नोटीस बजावली. राष्ट्रीय वन्यजीव मंडळाची आवश्यक पूर्वपरवानगी न घेताच काम सुरू असल्याचे वनविभागाच्या निदर्शनास आले. त्यामुळे सुरू असलेली सर्व कामे तात्काळ बंद करून तीन दिवसांत खुलासा तसेच वृक्षतोडीसह इतर वैधानिक परवानग्यांची कागदपत्रे सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अन्यथा वन कायद्यानुसार कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.

मात्र या प्रकल्पाच्या पर्यावरणीय मुद्द्यांसोबतच आता आर्थिक व्यवहारांवरही प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांनी या प्रकल्पाच्या खर्चात 100 पट तफावत दाखवून शासनाची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. अदानी ग्रीन एनर्जीच्या या प्रकल्पाची एकूण किंमत 5 हजार 675 कोटी रुपये असताना नियमानुसार या रकमेच्या 4 टक्के म्हणजेच 227 कोटी रुपये वन्यजीव संवर्धनासाठी सह्याद्री व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठानकडे जमा होणे आवश्यक असल्याचे भाटे यांचे म्हणणे आहे.मात्र कंपनीच्या अधिकाऱ्यांनी प्रधान मुख्य वनसंरक्षक कार्यालयाला सादर केलेल्या नोटरी हमीपत्रात प्रकल्पाची किंमत 5 हजार 675 कोटींऐवजी केवळ 56 कोटी 75 लाख रुपये दाखवल्याचा आरोप त्यांनी केला आहे. 

परिणामी, 227 कोटी रुपयांचा वन्यजीव संवर्धन निधी देण्याऐवजी कंपनीने केवळ 2 कोटी 27 लाख रुपये देण्याचे मान्य केले आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात 56 लाख 75 हजार रुपये आणि उर्वरित 1 कोटी 70 लाख रुपये नंतर देण्याचे नमूद केल्याचा दावा भाटे यांनी केला आहे. या प्रकरणी त्यांनी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय वन्यजीव मंडळाकडे तक्रार दाखल करून संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
दरम्यान, 15 नोव्हेंबर रोजी अभिनेते सयाजी शिंदे आणि प्रकल्पविरोधी लढ्याचे नेते विवेकानंद पाटील यांनी प्रत्यक्ष तारळी प्रकल्पस्थळी भेट देत कामाची पाहणी केली. यावेळी उत्खनन, वृक्षतोड आणि पर्यावरणाच्या होणाऱ्या नुकसानीवर त्यांनी आक्षेप घेतले. 

राष्ट्रीय वन्यजीव मंडळाची परवानगी नसताना काम सुरू असल्याचा आरोप करत त्यांनी पाटण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.अदानी कंपनी आणि सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत सयाजी शिंदे यांनी संबंधितांवर कारवाईची मागणी केली. तर सह्याद्रीतील प्रस्तावित 23 प्रकल्प हटवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा निर्धार विवेकानंद पाटील यांनी व्यक्त केला.

एकीकडे वनविभागाचे काम बंदचे आदेश, दुसरीकडे सयाजी शिंदे आणि विवेकानंद पाटील यांची पोलीस तक्रार, तर तिसरीकडे रोहन भाटे यांनी उपस्थित केलेला आर्थिक अनियमिततेचा मुद्दा...अदानी कंपनीने वनविभागाला राष्ट्रीय वन्यजीव मंडळाच्या नोटीस ला उत्तर दिले आहे मात्र काय उत्तर दिलं आहे हे समजू शकलेले नाही.त्याच बरोबर वनविभागाचे अधिकारी यांनी याबाबत कॅमेरासमोर बोलण्यास नकार दिला आहे.त्याच बरोबर अदानी यांच्या कंपनीकडून या बाबतचा खुलासा माध्यमाकडे देखील दिलेला नाही यामुळे तारळी प्रकल्पाचा वाद आता पर्यावरणापासून आर्थिक व्यवहारांपर्यंत अडचणीत अडकला आहे हे मात्र नक्की.

 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Satara
Religion News
Marathi News
Maharashtra Tourism