• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /पुणे
  • / महाराष्ट्रातील प्रसिद्ध कास पठारचे सौंदर्य पाहून आफ्रिकन पर्यटक भारावले; गर्दीत रांग लावून अनुभवला निसर्गाचा अविष्कार

महाराष्ट्रातील प्रसिद्ध कास पठारचे सौंदर्य पाहून आफ्रिकन पर्यटक भारावले; गर्दीत रांग लावून अनुभवला निसर्गाचा अविष्कार

साताऱ्याच्या कास पठारावरील फुलांची भुरळ सातासमुद्रापार असलेल्या पर्यटकांना देखील पडत आहे. आफ्रिकन पर्यटकांनी अनुभवला कासच्या निसर्गाचा अविष्कार. जपाननंतर आता आफ्रिकन पर्यटक कासवर आले आहेत. पुष्प पठाराच्या सौंदर्याने परदेशी पाहुणे भारावले आहेत.

Reported ByVanita Kamble
Published: Sep 30, 2026, 07:10 PM IST|Updated: Sep 30, 2026, 07:22 PM IST
joinshare
 महाराष्ट्रातील प्रसिद्ध कास पठारचे सौंदर्य पाहून आफ्रिकन पर्यटक भारावले; गर्दीत रांग लावून अनुभवला निसर्गाचा अविष्कार

About the Author

Vanita Kamble

Vanita Kamble

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

2

भूगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

3

₹100 च्या नोटांचे बंडल, आधी 'लंच ब्रेक'चं कारण अन् नंतर...; SBI मध्ये ग्राहकाने शूट केलेला धक्कादायक Video पहिला का?

4

'...तर तुम्ही ठाण्यातून परत जाणार नाही'; आदित्य ठाकरेंच्या उद्याच्या दौऱ्याआधीच शिंदेंच्या शिवसेनेचा विरोधकांना इशारा

5

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

सातारा कास पठार : जागतिक वारसा म्हणून नोंद असलेल्या कास पठारावर पर्यटकांचा ओघ वाढतच आहे. अनेक रंगाची विविध आकाराची अनेक दुर्मिळ फुले   पाहण्यासाठी देशाचा काना कोपऱ्यातून पर्यटक या पठारावर येत आहेत. परदेशी पर्यटक देखील येथे येत आहेत. आफ्रिकन पर्यटकांनी कास पठारवरील निसर्गाचा अविष्कार अनुभवला. 

1 सप्टेंबरपासून कास पठारावरील फुलांचा हंगाम सुरु 

साता-यातील वर्ल्ड हेरिटेजमध्ये नोंद झालेल्या कास पठारावरील प्रसिद्ध फुलांच्या हंगामाची सुरुवात 1 सप्टेंबरपासून झालीय. या हंगामाचे उद्घाटन खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते पार पडले. यावेळी बोलताना खासदार उदयनराज यांनी कास पठाराच्या सौंदर्याचे कौतुक करत हा परिसर अत्यंत आवडीचा असल्याचं त्यांनी सांगितले. या कास पठारावर आता 30 ते 35 प्रकारची दुर्मिळ फुले पाहायला मिळतायेत.  कास पठारचे निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे. परदेशी पर्यटक देखील मोठ्या संख्येने कास पठारला भेट देत आहेत. 

कास पठाराच्या सौंदर्याने परदेशी पाहुणे भारावले

कास पठार,सातारा-जागतिक वारसा स्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या साताऱ्याच्या कास पुष्प पठाराची भुरळ आता थेट परदेशी पर्यटकांनाही पडली आहे. कासच्या फुलांचा हंगाम अनुभवण्यासाठी आफ्रिकन पर्यटकांनी कास पठाराला भेट दिली. रंगीबेरंगी फुलांनी बहरलेलं कासचं पठार पाहून हे पर्यटक अक्षरशः भारावून गेले.कासच्या निसर्गसौंदर्याची ख्याती देशाच्या सीमा ओलांडून जगभर पोहोचली आहे. त्यामुळेच दरवर्षी फुलांचा हंगाम पाहण्यासाठी देश-विदेशातून पर्यटक कासवर दाखल होतात.

जपानी पर्यटकांनंतर आता  आफ्रिकेचे पर्यटक

काही दिवसांपूर्वी जपानमधील पर्यटकांनी कासला भेट दिली होती. त्यानंतर आता आफ्रिकन पर्यटकांनी कासच्या फुलांचा अनोखा नजारा अनुभवला. कासच्या पठारावर फुललेली विविधरंगी फुलं, निसर्गाचा मनमोहक आविष्कार आणि या ठिकाणचं अनोखं सौंदर्य पाहून परदेशी पर्यटकांनी आनंद व्यक्त केला.कासचा हा फुलोत्सव आता केवळ महाराष्ट्राचाच नव्हे, तर जगभरातील पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे.

कास पठारावरील पर्यटनाला लक्झरी ओळख

साता-यातील कास पठारावरील पर्यटनाला लक्झरी ओळख मिळवून देण्यासाठी ‘द सुपर कार रुट ग्रुप’च्या तब्बल 25 आलिशान सुपरकार्स साताऱ्यात दाखल झाल्या आहेत.  या सुपरकार्सच्या ताफ्याने थेट खासदार उदयनराजे भोसले यांच्या ‘जलमंदिर पॅलेस’ येथे भेट दिली. उदयनराजेंनी सर्व कार मालकांचे उत्साहात स्वागत केलं. कासच्या पर्यटन संवर्धनाचा आणि प्रसाराचा हा एक उत्तम उपक्रम असल्याचे उदयनराजेंनी नमूद केले. साताऱ्याच्या रस्त्यांवरून धावलेल्या या कोट्यवधींच्या सुपरकार्स ने सातारकरांच्या डोळ्यांचे पारणे फेडले .
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Satara
Maharashtra Tourism
Maharashtra News