SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

गोकुळच्या अध्यक्षपदाची वाटणी, निवडणूक जिंकल्यानंतर महायुतीच्या नेत्यांची मोठी घोषणा; फॉर्म्युला जाहीर

गोकुळची निवडणूक जिंकल्यानंतर महायुतीच्या नेत्यांनी मोठी घोषणा केली आहे. गोकुळचे अध्यपद महायुतीच्या 3 पक्षांमध्ये वाटून दिले जाणार आहे.

Reported By Vanita Kamble Written By Vanita Kamble
Published: Nov 10, 2026, 15:51 IST | Updated: Nov 10, 2026, 16:33 IST
Join

गोकुळ निवडणूक : महाराष्ट्रातील बहुचर्चित गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचा निकाल अखेर जाहीर झाला आहे. गोकुळवर महायुतीची सत्ता आली आहे. अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या राजेश पाटील यांची निवड झाली आहे. समविचारीच्या शशिकांत पाटील चुयेकरांचा पराभव झाला आहे.  राजेश पाटील यांना 16 तर चुयेकरांना 13 मतं मिळाली आहेत. निवडणूक जिंकल्यानंतर महायुतीच्या नेत्यांनी गोकुळच्या अध्यपद वाटून घेणार असल्याचे जाहीर केले. 

गोकुळ दूध संघाच्या अध्यक्ष पदी महायुतीचे उमेदवार राजेश पाटील यांचा विजय झाला. गोकुळ दुध संघ महायुतीच्या ताब्यात गेला आहे. महायुतीच्या उमेदवाराला 29 पैकी इतकी 16 मत तर समविचारी आघाडीचे उमेदवार शशिकांत पाटील चूयेकर यांना 13 इतकी मत.  समविचारी पॅनेलचे उमेदवार शशिकांत पाटील चुयेकर यांचा पराभव, समविचारी आघाडीला मोठा धक्का. 
 

पहिल्या टप्यात निवडून आलेल्या संचालकांची मतमोजणी पार पाडली, त्यामध्ये शशिकांत पाटील चुयेकर याना 13 मत मिळाली तर राजेश पाटील याना 12 मत मिळाली.  दुसऱ्या टप्यात शासन नियुक्त मतमोजणीत राजेश पाटील याना 16 मत तर शशिकांत पाटील चुयेकर याना 13 मत मिळाली.

महायुतीच्या नेत्यांनी जाहीर केला अध्यक्षपदाचा फॉर्म्युला

मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि खासदार धनंजय महाडिक यांनी निकालानंतर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी महायुतीच्या नेत्यांनी अध्यक्षपदाचा फॉर्म्युला देखील जाहीर केला.  साडे पाच लाख लोकांच्या हिताचा निर्णय घेतला. महाविकास आघाडीने संभ्रम पसरवला. न्यायालयाने चपराक दिली आणि त्यांना घरी पाठवले. दूध उत्पादकांना अधिकचा दर देण्याचा प्रयत्न करणार अस धनंजय महाडिक म्हणाले. 

अध्यपदाचा फॉर्म्युला ठरवला असून पहिला राष्ट्रवादीचा अध्यक्ष नंतर पुढील अध्यक्ष कोण असेल याचा निर्णय घेऊ असं महायुतीच्या नेत्यांनी जाहीर केले. 
वैधानिक संकट दूर करण्याचा प्रयत्न महायुतीच्या सर्व प्रमुख नेत्यांनी केला.  पहिला अध्यक्ष होण्याचा मान राष्ट्रवादीला दिला. महायुतीचे आभार. कोरमचे संकट गोकुळच्या निवडणुकीवर आले होते. त्यांनी फेट नरेटीव्ह पसरवून आमच्या लोकांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला.  

प्रशासका शिवाय दुसरा कोणता पर्याय नव्हता.  अस झालं असतं 13 लोकांना घर बसावे लागलं असतं. दूध उत्पादकांना न्याय देण्याचे काम केले जाईल. अतिशय पारदर्शक पद्धतीने कामकाज करेल. हा दूध संघ अमूल सोबत काम करणार नाही, तर अमूलपेक्षा चांगले काम करु.  तज्ञ संचालक शासनाने नियुक्त केलेले उच्चशिक्षित आणि अनुभवी आहेत. अध्यादेश आहे त्याचे पुढे कायद्यात रुपांतर होईल असं हसन मुश्रीम म्हणाले.

 

 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES