बंटी पाटील यांना पहिला मोठा धक्का! गोकुळचा नवा अध्यक्ष कोण? येत्या 24 तासांत ठरणार, निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष
बंटी पाटील यांना पहिला मोठा झटका देणारा निर्णय घेण्यात आला आहे. ठरल्याप्रमाणे गोकुळची निवडणूक होणार आहे. अध्यक्षही निवडला जाणार आहे. निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
गोकुळ निवडणूक : सतेज पाटील उर्फ बंटी पाटील पहिला मोठा झटका देणारी घडामोड घडली आहे. गोकुळची निवडणूक ठरल्याप्रमाणे पार पडणार असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय औरंगाबाद खंडपीठाने दिला आहे. अध्यक्षही निवडला जाणार आहे. 25 निवडून आलेल्या सदस्यांसह शासननियुक्त 4 सदस्यही मतदान करणार आहेत. मात्र त्यांची मतं स्वतंत्र ठेवली जाणार आहेत. संपूर्ण प्रक्रिया अंतिम निकालाच्या अधीन राहणार आहे. निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
शासन नियुक्त संचालकांना दिलेल्या मतदानाच्या अधिकाराचा अध्यादेश असंवैधानिक आहे. त्यामुळे त्यांना देण्यात आलेल्या मतदान अधिकाराचा अध्यादेश रद्द करा, अशी मागणी काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी केली. त्यांनी कोल्हापूरच्या जिल्हाधिका-यांना पत्र लिहिलंय. गोकुळच्या अध्यक्षाची निवड निवडून आलेल्या 25 संचालकांच्या बहुमताने व्हावी, अशी मागणी त्यांनी या पत्रातून केली आहे. मात्र, त्यांची मागणी फेटाळली आहे.
10 नोव्हेंबर 2026 रोजी ठरल्याप्रमाणे गोकुळची निवडणूक होणार
10 नोव्हेंबर 2026 रोजी ठरल्याप्रमाणे गोकुळची निवडणूक होणार आहे. निवडून आलेल्या २५ सदस्यासोबत शासनाने नियुक्त केलेले चारही सदस्य मतदान करणार आहेत. शासनाने नियुक्त केलेल्या चार सदस्यांची मतदान केलेली मते वेगळे ठेवले जाणार आहेत. सर्व प्रक्रियेची व्हिडिओग्रफी केली जाणार आहे. निकालही जाहीर केले जाणार आहे. तसेच अध्यक्षही निवडला जाणार आहे.
राज्य शासनाकडून केलेली अध्यादेश स्थगिती मागणी फेटाळली
राज्य शासनाकडून केलेली अध्यादेश स्थगिती मागणी फेटाळण्यात आली आहे. अध्यादेश बरोबर की चूक हे अद्याप ठरले नाही. पुढील सुनावणी 25 नोव्हेंबर रोजी होणार आहे. संपूर्ण निवडणुकीची प्रक्रिया अंतिम निकालाच्या अधिन असून निवडणूक अधिकारी कायद्याच्या चौकटीत निवडणूक घेतील असे स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, कोल्हापूर जिल्हा बँकेत गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडी संदर्भात महायुतीच्या नेत्यांची बैठक सुरू झाल्या आहेत. मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री प्रकाश अबिटकर, राज्यसभा खासदार धनंजय महाडीक याच्यासह महायुतीच्या नेते बैठकीला हजर. औरंगाबाद खंडपीठाने उद्याच अध्यक्ष्य पदाची निवड करावी असा आदेश दिल्याने महायुती मधे जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. गोकुळचा अध्यक्ष पदाचा उमेदवार कोण असणार यावर महायुतीच्या बैठकीत खलबतं सुरु आहेत.