• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /पुणे
  • /पुणे विमानतळाच्या कार्गो वाहतुकीत मोठी झेप; आठ महिन्यांत तब्बल ४४ टक्क्यांची वाढ

पुणे विमानतळाच्या कार्गो वाहतुकीत मोठी झेप; आठ महिन्यांत तब्बल ४४ टक्क्यांची वाढ

पुणे विमानतळाच्या कार्गो वाहतुकीत मोठी झेप घेतली आहे. पहिल्या आठ महिन्यांत तब्बल ४४ टक्क्यांची वाढ झाली आहे.

Reported ByVanita Kamble
Published: Oct 07, 2026, 12:03 AM IST|Updated: Oct 07, 2026, 12:05 AM IST
joinshare
पुणे विमानतळाच्या कार्गो वाहतुकीत मोठी झेप; आठ महिन्यांत तब्बल ४४ टक्क्यांची वाढ

About the Author

Vanita Kamble

Vanita Kamble

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

2

भूगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

3

₹100 च्या नोटांचे बंडल, आधी 'लंच ब्रेक'चं कारण अन् नंतर...; SBI मध्ये ग्राहकाने शूट केलेला धक्कादायक Video पहिला का?

4

'...तर तुम्ही ठाण्यातून परत जाणार नाही'; आदित्य ठाकरेंच्या उद्याच्या दौऱ्याआधीच शिंदेंच्या शिवसेनेचा विरोधकांना इशारा

5

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

पुणे  : पुणे आणि परिसरातील वाढत्या औद्योगिक व व्यावसायिक उलाढालीच्या पार्श्वभूमीवर पुणे विमानतळाने कार्गो वाहतुकीत उल्लेखनीय कामगिरी नोंदवली आहे. जानेवारी ते ऑगस्ट २०२६ या आठ महिन्यांत पुणे विमानतळावरून ४५,०५०.७ मेट्रिक टन कार्गोची हाताळणी करण्यात आली असून, गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत ही वाढ ४३.९ टक्के आहे. विशेष म्हणजे २०२६ मधील या आठही महिन्यांत कार्गो वाहतुकीत सातत्याने वाढ नोंदविण्यात आली आहे.

जानेवारी ते ऑगस्ट २०२५ या कालावधीत पुणे विमानतळावर ३१,३०३.७ मेट्रिक टन कार्गोची हाताळणी झाली होती. यंदा त्यात तब्बल १३,७४७ मेट्रिक टनांची भर पडून एकूण कार्गो वाहतूक ४५ हजार मेट्रिक टनांच्या पुढे गेली आहे.

महिनानिहाय आकडेवारीतही पुणे विमानतळाची कामगिरी लक्षणीय राहिली आहे. मे आणि ऑगस्ट २०२६ मध्ये कार्गो वाहतुकीने सहा हजार मेट्रिक टनांचा टप्पा पार केला. मे महिन्यात सर्वाधिक ६,१४७.८ मेट्रिक टन, तर ऑगस्टमध्ये ६,०४६.८ मेट्रिक टन कार्गोची हाताळणी करण्यात आली. ऑगस्टमधील वाढ गेल्या वर्षीच्या ऑगस्टच्या तुलनेत सुमारे ४५.९ टक्के आहे.

देशांतर्गत कार्गो वाहतुकीतही मोठी वाढ नोंदविण्यात आली आहे. जानेवारी ते ऑगस्ट २०२५ या कालावधीतील ३१,२४१.३ मेट्रिक टनांवरून यंदा ती ४४,८२२ मेट्रिक टनांवर पोहोचली असून, ही वाढ सुमारे ४३.५ टक्के आहे.

आंतरराष्ट्रीय कार्गो वाहतुकीतील वाढ विशेष उल्लेखनीय ठरली आहे. गेल्या वर्षी पहिल्या आठ महिन्यांत ६२.४ मेट्रिक टन असलेली आंतरराष्ट्रीय कार्गो वाहतूक यंदा २२८.७ मेट्रिक टनांवर पोहोचली आहे. म्हणजेच आंतरराष्ट्रीय कार्गोची हाताळणी तीन पटींहून अधिक वाढली आहे.

या कामगिरीबाबत केंद्रीय नागरी हवाई वाहतूक व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले, “पुणे विमानतळावरील कार्गो वाहतुकीत झालेली भरीव वाढ ही पुणे आणि परिसरातील विस्तारत्या आर्थिक व औद्योगिक क्षमतेचे सकारात्मक निदर्शक आहे. उत्पादन, ऑटोमोबाईल, अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, औषधनिर्माण यांसारख्या उच्च मूल्यवर्धित क्षेत्रांचे पुणे हे महत्त्वाचे केंद्र आहे. या उद्योगांच्या विकासासाठी सक्षम आणि वेगवान एअर-कार्गो कनेक्टिव्हिटी अत्यंत महत्त्वाची आहे.”

“२०१४ नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात भारताच्या नागरी हवाई वाहतूक क्षेत्राने अभूतपूर्व विस्तार आणि परिवर्तन अनुभवले आहे. देशातील विमानतळांची वाढती संख्या, देशांतर्गत आणि प्रादेशिक हवाई कनेक्टिव्हिटीचा विस्तार तसेच विमान वाहतूक पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण यामुळे नागरी हवाई वाहतूक क्षेत्र देशाच्या आर्थिक विकासाचे एक महत्त्वाचे ग्रोथ इंजिन म्हणून पुढे आले आहे. या परिवर्तनाचा लाभ पुण्यासारख्या वेगाने विकसित होणाऱ्या औद्योगिक आणि व्यावसायिक केंद्रांनाही होत आहे,” असे मोहोळ यांनी नमूद केले.

“विमानतळ हे केवळ प्रवासी वाहतुकीचे केंद्र न राहता व्यापार, लॉजिस्टिक्स, गुंतवणूक आणि प्रादेशिक आर्थिक विकासाला चालना देणारे महत्त्वाचे केंद्र ठरावे, या दृष्टीने केंद्र सरकार विमान वाहतूक पायाभूत सुविधा आणि कनेक्टिव्हिटी अधिक सक्षम करण्यासाठी कटिबद्ध आहे. पुणे विमानतळावरील कार्गोच्या प्रमाणात सातत्याने होत असलेली वाढ ही याच दिशेने सुरू असलेल्या प्रयत्नांची सकारात्मक फलश्रुती आहे,” असेही मोहोळ यांनी सांगितले.

पुणे आणि परिसरात ऑटोमोबाईल, उत्पादन, आयटी, औषधनिर्माण, अभियांत्रिकी तसेच विविध निर्याताभिमुख उद्योगांचे मोठे जाळे आहे. त्यामुळे वेळेचे महत्त्व असलेल्या आणि उच्च मूल्याच्या मालवाहतुकीसाठी हवाई कार्गो सेवांची मागणी सातत्याने वाढत आहे. पुणे विमानतळावरील वाढती कार्गो वाहतूक स्थानिक उद्योगांना देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठांशी अधिक वेगाने जोडण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरत आहे.

भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडून वाढत्या गरजांच्या अनुषंगाने पुणे विमानतळावरील प्रवासी तसेच कार्गो सुविधांची कार्यक्षमता अधिक सक्षम करण्यावर भर दिला जात आहे. कार्गो वाहतुकीतील ही सातत्यपूर्ण वाढ महाराष्ट्रातील महत्त्वाचे एव्हिएशन आणि लॉजिस्टिक्स हब म्हणून पुण्याचे स्थान आणखी मजबूत करणारी ठरणार आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Pune
Pune News
Maharashtra News