SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

भाजप नेत्याची हत्या; कारमध्ये सोबत प्रवास करणाऱ्या दोघांनी गोळ्या घातल्या; हत्येमागे शिंदेंच्या शिवसेनेचा हात?

पंढरपूरमध्ये भाजप नेत्याची हत्या झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. हत्येमागे शिंदेंच्या शिवसेनेचा हात असल्याचा आरोप केला जात आहे.

Reported By Vanita Kamble Written By Vanita Kamble
Published: Nov 03, 2026, 05:45 PM IST | Updated: Nov 03, 2026, 06:02 PM IST
Join

पंढरपूर : ठाण्यातील प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणावरून महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ माजली आहे. या प्रकरणी शिंदेंच्या शिवसेनेच्या माजी महापौर, नगरसेविका मीनाक्षी शिंदे आणि पती राजेंद्र शिंदे या दोघांच्या अटकेची मागणी पूर्णेकर कुटुंबीयांनी केली. पूर्णेकर हत्या प्रकरण ताजे असतानाच आता पंढरपूर मध्ये भाजप नेत्याची हत्या झाली आहे. कारमध्येच त्यांना गोळ्या घालण्यात आल्या. हत्येमागे शिंदेंच्या शिवसेनेचा हात असल्याच्या आरोप भाजप नेत्यांच्या कुटुंबाने केला आहे. 

सांगोला तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भाजपा युवा मोर्चाचे माजी तालुकाध्यक्ष प्रतापसिंह करचे यांचा डोक्यात गोळ्या झाडून निर्घृण खून करण्यात आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण सांगोला तालुक्यात खळबळ उडाली आहे. या खुना मागे सांगली जिल्ह्यातील शिंदे शिवसेनेच्या नेत्याचा हात असल्याचा आरोप कुटुंबाने केला आहे.

27 ऑक्टोबर 2026 रोजी मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास सांगोला तालुक्यातील तिप्पेहळ्ळी परिसरात ही घटना घडली. प्रतापसिंह करचे हे स्वतःच्या कारने प्रवास करत असताना त्यांच्यासोबत असलेले संशयित आरोपी हर्षवर्धन ऐवळे आणि विक्रम घरडे यांनी बंदुकीतून गोळ्या झाडून त्यांची हत्या केली.  याप्रकरणी सांगोला पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे‌

हत्येमागे राजकीय कट असल्याचा गंभीर आरोप

मात्र या हत्येमागे राजकीय कट असल्याचा गंभीर आरोप मयताच्या पत्नी अर्चना करचे यांनी केला आहे. आटपाडी येथील शिंदे सेनेचे नेते तथा सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक तानाजी पाटील, त्यांचे बंधू शिवाजी पाटील आणि जिल्हा परिषद सदस्य रोहन पाटील यांनी कट रचून सुपारी देऊन ही हत्या घडवून आणल्याची लेखी तक्रार करचे कुटुंबीयांनी सोलापूरच्या जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे दिली आहे. 

राज्यात भाजपचे सरकार असतानाही एका भाजप कार्यकर्त्याची अशी हत्या होत असेल तर सर्वसामान्यांचे काय? असा सवाल उपस्थित करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न्याय द्यावा, अशी मागणी अर्चना करचे यांनी केली आहे. 

पूर्णेकर कुटुंबीयांना पोलीस संरक्षण वाढवून द्या; मीनाक्षी शिंदेंची पोलीस आयुक्तांकडे मागणी 

राम पूर्णेकरांच्या जिवीताला धोका असून पूर्णेकर कुटुंबीयांना पोलीस संरक्षण वाढवून द्या, असं पत्र देत मीनाक्षी शिंदेंनी पोलीस आयुक्तांकडे मागणी केली. प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात माझं आणि माझे पती राजेंद्र शिंदेंचं नाव घेण्यासाठी राम पूर्णेकरांना प्रवृत्त केल्याचं मीनाक्षी शिंदे म्हणाल्यात. तर मी काही केलं नाही म्हणून सुरुवातीला राजीनामा दिला नव्हता.. मात्र माझ्या नेत्यावर आरोप झाल्यानंतर राजीनामा दिल्याची प्रतिक्रिया ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदेंनी दिली.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.

ZEENEWS TRENDING STORIES