पुणे CBI कारवाई : पुण्यात CBI ने मोठी कारवाई केली आहे. सीबीआयने पुण्यात छापेमारी केली आहे. 1.73 कोटींची रोकड जप्त करण्यात आली आहे. म्हैसूर, बंगळूर आणि दिल्लीतही शोधमोहीम राबवली गेली. लाचखोरीच्या प्रकरणात CBI ने कारवाई केली आहे.
लाचखोरीच्या एका प्रकरणात सीबीआयने म्युनिशन्स इंडिया लिमिटेड (एमआयएल) च्या कार्यकारी संचालकासह तीन जणांना अटक केली आहे. आरोपींना 13 ऑक्टोबर 2026 रोजी अटक करण्यात आली. सीबीआयच्या माहितीनुसार 12 ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पुण्यात कार्यरत असताना, म्युनिशन्स इंडिया लिमिटेडचे कार्यकारी संचालक, खासगी कंत्राटदार आणि विक्रेत्यांच्या संगनमताने, सरकारी कामाच्या बदल्यात लाच मागणे आणि स्वीकारणे यात सामील होते असा आरोप आहे. या प्रकरणात CBI ने छापेमारी केली.
या प्रकरणात कारवाई करत, सीबीआयने पुण्यात आरोपी अधिकाऱ्याच्या निवासस्थानी शोधमोहीम राबवून 1.73 कोटींची रोकड जप्त केली. म्हैसूर, बंगळूर आणि दिल्लीतील आरोपींच्या निवासस्थानीही शोधमोहीम राबवण्यात आली, जिथे अंदाजे 50 लाख रोकड आणि प्रकरणाशी संबंधित महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली. सीबीआय या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे.
काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकर यांच्या २००६ मधील हत्या प्रकरणात अपडेट समोर आलीय. माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासह आठ जणांची निर्दोष मुक्तता करण्याच्या सत्र न्यायालयाच्या निर्णयाला सीबीआयने मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. सत्र न्यायालयाचा निर्णय कायद्याच्या दृष्टीने चुकीचा असून तो रद्द करण्यात यावा, अशी मागणी सीबीआयने केलीय. लवकरच या अपिलावर न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होण्याची शक्यता आहे.