• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /पुणे
  • /'शुभम दादा तुझ्या...', हल्लेखोर कोयत्याने वार करताना एकच वाक्य ओरडत होते, मंदार किवळेचा जबाबात धक्कादायक खुलासा! 'आम्हीच कात्रजचे...'

'शुभम दादा तुझ्या...', हल्लेखोर कोयत्याने वार करताना एकच वाक्य ओरडत होते, मंदार किवळेचा जबाबात धक्कादायक खुलासा! 'आम्हीच कात्रजचे...'

बुधवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास झालेल्या हल्ल्यामध्ये मंदार किवळे हा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर सध्या ससून रुग्णालयामध्ये उपचार सुरु असतानाच त्याने पोलिसांकडे जबाब नोंदवला आहे. तो काय म्हणालाय पाहूयात...

Reported BySwapnil Ghangale
Published: Nov 26, 2026, 11:47 IST|Updated: Nov 26, 2026, 12:22 IST
joinshare
'शुभम दादा तुझ्या...', हल्लेखोर कोयत्याने वार करताना एकच वाक्य ओरडत होते, मंदार किवळेचा जबाबात धक्कादायक खुलासा! 'आम्हीच कात्रजचे...'
Image Credit: रुग्णालयामध्ये पोलिसांसमोर जबाब नोंदवताना मंदारचा खुलासा

About the Author

Swapnil Ghangale

Swapnil Ghangale

मोजक्या शब्दांमध्ये...स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.पत्रकारितेचा श्रीगणेशास्वप्निल यांनी पत्रकारितेच्या दुसऱ्या वर्षापासूनच 'ठाणे वैभव' या ठाण्यातील स्थानिक वृत्तपत्रामध्ये शिकाऊ पत्रकार म्हणून कामाला सुरुवात केली. सांस्कृतिक आणि गुन्हेगारी यासंदर्भातील वृत्तांकन यांनी या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये केलं. बीएमएमच्या तृतीय वर्षाला ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालयातील 'ऋत' या पत्रकारिता विभागाच्या महाविद्यालयीन वृत्तपत्रासाठी स्वप्निल यांनी उपसंपादक म्हणून काम पाहिले.डिजिटलमध्ये एन्ट्री'महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉम'च्या माध्यमातून पहिल्यांदा डिजिटल क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या स्वप्निल यांनी सुरुवातीला सोशल मिडिया व्यवस्थापक म्हणून काम पाहिले. त्यानंतर हळूहळू ते डिजिटल वृत्तांकनाकडे वळले. त्यांनी 'महाराष्ट्र टाइम्स' वृत्तपत्रामध्येही माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लेखन केलं. मुख्य पुरवणीसोबतच अनेकदा रविवार विशेष अंकांमध्येही त्यांचे लेख छापून आले आहेत. 'मुंबई टाइम्स' या पुरवणीअंतर्गत विद्यार्थ्यांच्या विश्वातील अनेक विषय त्यांनी कॉलेज क्लब रिपोर्ट्सच्या माध्यमातून हाताळले. कॉलेज क्लब रिपोर्टर्ससोबतच्या कामासोबतच त्यांनी 'मटा सन्मान', 'मटा श्रावण क्विन' यासारख्या कार्यक्रमांसाठी डिजिटल आणि प्रिंटदरम्यान संयोजक म्हणून काम पाहिलं. जवळपास पाच वर्ष ते मटामध्ये कार्यरत होते.प्रगल्भतेची आसमहाराष्ट्र टाइम्सनंतर तितक्याच तोलामोलाच्या 'लोकसत्ता'मध्ये स्वप्निल यांनी काम केलं. या ठिकाणीही ते पाच वर्ष कार्यरत होते. 'मटा'पासून सुरु झालेल्या प्रवासाला 'लोकसत्ता'मध्ये प्रगल्भता लाभली. राजकीय बातम्या, ताज्या घडामोडी, ट्रेडींग बातम्या याबरोबरच त्यांनी डिजिटल आणि प्रिंटमधील समन्वयाचं (इंटीग्रेशन) कामही त्यांनी लोकसत्तामध्ये केलं. 'लोकसत्ता'मधील 'व्हिवा' या पुरवणीमध्ये तरुणाईसंदर्भातील विषयांवर त्यांनी लेखन केलं. तसेच 'लोकप्रभा'च्या माध्यमातून त्यांनी माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लिखाण केलं. लोकसत्ता डॉट कॉममध्ये स्वप्निल यांनी चार ते पाच सेक्शनसची जबाबदारी पार पाडली.तो सध्या काय करतो?'लोकसत्ता'नंतर स्वप्निल यांनी पहिल्यांदाच टीव्हीशी संलग्न वेबसाईटसाठी म्हणजेच 'झी 24 तास'च्या वेबसाईटसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी ते ताज्या घडामोडींबरोबरच, राजकीय बातम्या, ब्रेकिंग बातम्या, ट्रेडिंग बातम्या हाताळतात. बातमीमधील अचूक माहिती, व्याकरण, उत्तम मथळे यासारख्या गोष्टींकडे त्यांचं कटाक्षाने लक्ष असतं. लिखाणबरोबरच मॅरेथॉन पळणं, वेगवेगळ्या ठिकाणी खादडीसाठी जाणं, पुस्तकांसोबतच अवांतर वाचन यासारख्या गोष्टींना ते प्राधान्य देतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
रिलायन्सच्या प्रोजेक्टसाठी 50,000 झाडांची कत्तल? भरपाई म्हणून कोकणात झाडं लावली; मनेस नेत्याचा गंभीर आरोप

रिलायन्सच्या प्रोजेक्टसाठी 50,000 झाडांची कत्तल? भरपाई म्हणून कोकणात झाडं लावली; मनेस नेत्याचा गंभीर आरोप

2

रोहित पवार यांना मोठा झटका! राष्ट्रवादी पक्षाने स्पष्ट केली भूमिका

3

शरद पवारांनी भाकरी फिरवली! रोहिणी खडसेंच्या जागी नव्या महिला नेतृत्वाला संधी; प्रदेशाध्यक्ष बदलल्या

4

'या' शहरात बनतंय MS Dhoni चं तिसरं घर, बांधकामाचं डिझाईन समोर, पाहा Video

5

सुप्रिया सुळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री झाल्या तर शपथविधीला जाणार का? संजय राऊत यांनी एका वाक्यात उत्तर; राजकीय वर्तुळात खळबळ

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

पुण्यात बुधवारी शिवाजीनगर कोर्टाबाहेर झालेल्या हल्ल्यात मंदार किवळे गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणामध्ये रात्री उशिरा पुण्यातील शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये नऊ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र हल्लेखोरांनी हल्ला करताना नेमकं ते काय बोलत होते मंदारनेच पोलिसांकडे नोंदवलेल्या फिर्यादीत सांगितलं आहे. संपूर्ण घटनाक्रम आणि हल्लेखोरांची विधानं मंदारने पोलिसांना जशीच्या तशी सांगितली आहेत. मंदार उपचार घेताना शुद्धीत असून त्याने पोलिसांकडे जबाब नोंदवला आहे. 

शिवाजीनगर न्यायालयाबाहेर काय घडलं?

मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर मंदार किवळे चार दिवसांपूर्वीच तुरुंगातून बाहेर आलेला. 25 नोव्हेंबर रोजी दुपारी Sk वाजण्याच्या सुमारास खटल्याच्या सुनावणीसाठी तो शिवाजीनगर न्यायालयात आला असता. दोन दुचाकींवरून आलेल्या सहा ते सात हल्लेखोरांनी त्याच्यावर पिस्तुलातून गोळीबार केला आणि त्यानंतर कोयत्याने सपासप वार केले. यात मंदार गंभीर जखमी झाला. रक्तबंबाळ अवस्थेत मंदारने रस्ता ओलांडला आणि तो समोरच्या फुटपाथवर रक्ताच्या थारोळ्यात पडला.

हल्ला करण्याआधी काय विचारलं? कोयते मारताना हल्लेखोर काय ओरडत होते?

आधी मला तूच आमच्या शुभमला मारलं ना? असा प्रश्न दोघांनी विचारला आणि हातात असलेल्या पिस्तूलने गोळी चालवली , मात्र ती गोळी मला लागली नाही," असं मंदारने पोलिसांना हल्ल्यासंदर्भातील तपशील देताना सांगितलं. पुढे बोलताना, "त्यावेळी गाडीवर बसलेल्या एकाने, 'याच्या डोक्यात कोयता टाका, असं म्हणत माझ्यावर कोयत्याने वार केले. त्यानंतर "शुभम दादा तुझ्या खुनाचा आम्ही बदला घेतला आहे. आम्हीच कात्रजचे राजे आहोत, असं म्हणत हल्लेखोरांनी तिथून पळ काढला," अशी माहिती मंदार किवळेने दिली आहे.

शुभम चव्हाणची हत्या कधी झाली?

एप्रिल 2025 मध्ये पुण्यातील कात्रज येथील संतोषनगर परिसरात जमिनीच्या वादातून शुभम चव्हाण या तरुणाचा खून झाला होता. या खून प्रकरणात मंदार किवळे मुख्य आरोपी होता. या खुनाचा बदला घेण्यासाठी शुभम चव्हाणचा भाऊ अक्षय चव्हाण आणि त्याच्या साथीदारांनी हा हल्ला घडवून आणल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.

मंदारसाठी पुढले तीन दिवस महत्त्वाचे

ससून रुग्णालयाचे डीन डॉ. येलाप्पा जाधव यांनी, मंदारच्या दोन्ही हातांवर आणि डोक्याच्या मागील बाजूस गंभीर जखमा झाल्या आहेत. तो सध्या बोलत असला तरी पुढील 72 तास त्याच्या प्रकृतीसाठी अत्यंत महत्त्वाचे आणि चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी बुधवारी रात्री बोलताना स्पष्ट केलं.

आरोपी कोण?

या प्रकरणात आतापर्यंत सहा संशयितांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये शुभम चव्हाणचा भाऊ अक्षय सुभाष चव्हाण (20), अमोल रामचंद्र चव्हाण (48), स्वप्नील बाजीराव गवळी (28), ओंकार संतोष पवार (18), सूरज साधू मालेकर (वय 22) यांच्याबरोबरच एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
crime
Pune
Pune News