• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /पुणे
  • / केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणातील सर्वात मोठा पुरावा; लोहगडावर केतनसोबत नेमकं काय घडलं ते सर्व प्रत्यक्षात पाहणारा व्यक्ती

केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणातील सर्वात मोठा पुरावा; लोहगडावर केतनसोबत नेमकं काय घडलं ते सर्व प्रत्यक्षात पाहणारा व्यक्ती

केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणात आरोप पत्र दाखल झाले आहे. केतनची होणारी प्तनी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी केतनची हत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे. आता सर्वात मोठा पुरावा पोलिसांच्या हाती लागला आहे.

Reported ByVanita Kamble
Published: Sep 28, 2026, 11:47 PM IST|Updated: Sep 28, 2026, 11:52 PM IST
joinshare
 केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणातील सर्वात मोठा पुरावा; लोहगडावर केतनसोबत नेमकं काय घडलं ते सर्व प्रत्यक्षात पाहणारा व्यक्ती

About the Author

Vanita Kamble

Vanita Kamble

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

2

भूगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

3

₹100 च्या नोटांचे बंडल, आधी 'लंच ब्रेक'चं कारण अन् नंतर...; SBI मध्ये ग्राहकाने शूट केलेला धक्कादायक Video पहिला का?

4

'...तर तुम्ही ठाण्यातून परत जाणार नाही'; आदित्य ठाकरेंच्या उद्याच्या दौऱ्याआधीच शिंदेंच्या शिवसेनेचा विरोधकांना इशारा

5

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

लोहगड केतन अग्रवाल मृत्यू प्रकरण : लोहगडाच्या कड्यावर नेमकं काय घडलं? केतन अग्रवाल दरीत कसा कोसळला? या प्रश्नांची उत्तरं शोधताना पोलिसांच्या तपासात आता एका प्रत्यक्षदर्शीचा जबाब समोर आलाय. केतनला कड्यावरून ढकलताना पाहिल्याचा दावा या प्रत्यक्षदर्शीने केला. एवढंच नाही तर घटना कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप आहे. दुसरीकडे तब्बल 12 टीबी तांत्रिक डेटाची तपासणी सुरू आहे. 

केतन अग्रवालच्या हत्येवेळी लोहगडाच्या कड्यावर नेमकं काय घडलं?  याचा तपास सुरु असतानाच आता एका प्रत्यक्षदर्शीचा जबाब समोर आला आहे.
केतन अग्रवालला कड्यावरून ढकलताना पाहिल्याचा दावा या तरुणाने पोलिसांकडे केला. एवढंच नाही तर घटनेबाबत कुणाला सांगितल्यास किल्ल्यावरून फेकून देईन, अशी धमकी दिल्याचंही या तरुणाने म्हटल आहे. लोहगडावर केतन आणि सिया एकत्र जात होते. त्यांच्या काही अंतरावर चेतन चौधरीही मागून येत होता. त्यानंतर काय घडलं? याची माहिती प्रत्यक्षदर्शीने पोलिसांना दिली.

लोहगडावर काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितली A टू Z स्टोरी

प्रत्यक्षदर्शी त्याच्या मित्राच्या कुटुंबासोबत लोहगडावर आला होता.  लोहगड चढताना केतन आणि सियाला एकत्र जाताना पाहिलं. काही अंतरावर चेतन चौधरीही त्यांच्यामागे येत होता.  सिया खाली बसली, तिने केतनच्या पायावर लाथ मारली. प्रत्यक्षदर्शीने चेतनला याबाबत विचारणा केली.  तू शांत बस, नाही तर तुलाही असाच फेकून देईन अशी धमकी दिल्याचंही प्रत्यक्षदर्शीने आपल्या जबाबात म्हटलंय. घटनेनंतर भीतीपोटी प्रत्यक्षदर्शीने सुरुवातीला कुणालाही काही सांगितलं नाही. मात्र माध्यमांमधून घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्याने पोलिसांशी संपर्क साधला.विशेष म्हणजे उन्हाळ्यातही चेतनने हुडी घातली होती. त्यामुळे चेहरा लक्षात राहिल्याचं प्रत्यक्षदर्शीने जबाबात म्हटल. गड चढताना आणखी एका व्यक्तीने चेतनला हुडीबाबत विचारणा केल्याची माहितीही तपासात समोर आली.

तब्बल 12 टीबी तांत्रिक डेटा उलगणाकर मोठं रहस्य

दरम्यान पोलिसांच्या हाती तब्बल 12 टीबी तांत्रिक डेटा लागलाय. सहा मोबाईल, नऊ पेनड्राइव्ह, बॅकअप  आणि कॉल रेकॉर्ड या सगळ्याची तपासणी सुरू आहे. सोशल मीडिया आणि डिलीट केलेल्या चॅटचा फॉरेन्सिक तपास सुरू आहे. हटवलेला काही डेटा पुन्हा मिळवल्याचा सूत्रांचा दावा आहे. आयफोनमधील डेटा आणि चॅट कायमस्वरूपी डिलीट करण्याबाबत सर्च केल्याची माहितीही तपासात समोर आली. तसंच सियाने घरात लपवून ठेवलेला दुसरा मोबाईल फोडल्याचंही तपासात निष्पन्न झाल्याची माहिती आहे. मोबाईलच्या बॅकअपमधून महत्त्वाची माहिती मिळाल्याचा पोलिसांचा दावा आहे. प्रत्यक्षदर्शीचा जबाब, धमकीचा आरोप आणि 12 टीबी तांत्रिक डेटा. या सगळ्या धाग्यांची पोलिसांकडून तपासणी सुरू आहे. मात्र लोहगडाच्या त्या कड्यावर नेमकं काय घडलं? केतन दरीत कसा कोसळला? या प्रश्नांचं सत्यअद्याप समोर यायचं आहे. लोहगडाच्या कड्यावरची ती काही क्षणांची घटना आणि त्यामागचं सत्य. पोलिसांच्या तपासातूनच आता उलगडणार आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Pune
Pune News
crime