• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /पुणे
  • /पंढरपुरात शिवा संघटनेचा जिल्हाध्यक्ष राजू भिंगेची गोळ्या घालून हत्या; नंतर मोठा ट्विस्ट, पोलीस ठाण्यात...

पंढरपुरात शिवा संघटनेचा जिल्हाध्यक्ष राजू भिंगेची गोळ्या घालून हत्या; नंतर मोठा ट्विस्ट, पोलीस ठाण्यात...

पंढरपूरमध्ये मंगळवारी रात्री शिवा संघटनेचा जिल्हाध्यक्ष राजू भिंगेची गोळ्या घालून हत्या कऱण्यात आली. यानंतर एकच खळबळ उडाली आहे.

Reported ByShivraj Yadav
Published: Nov 18, 2026, 16:36 IST|Updated: Nov 18, 2026, 16:41 IST
joinshare
पंढरपुरात शिवा संघटनेचा जिल्हाध्यक्ष राजू भिंगेची गोळ्या घालून हत्या; नंतर मोठा ट्विस्ट, पोलीस ठाण्यात...
Image Credit: शिवा संघटनेचा जिल्हाध्यक्ष राजू भिंगेची गोळ्या घालून हत्या

About the Author

Shivraj Yadav

Shivraj Yadav

शिवराज यादव झी 24 तास डिजिटलमध्ये सीनिअर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. राज्यासह देश, विदेशातील चालू घडामोडींसह राजकीय, गुन्हेगारी विषयांवरील लिखाण ते करतात. हे लिखाण करताना ते सखोल पद्धतीने करण्याकडे कल असतो. वाचकाला बातमी अत्यंत सहजपणे समजावी यासाठी ती समजेल अशा पद्धतीने लिहितात. याशिवाय क्रीडा, मनोरंजन यांचीही आवड असल्याने त्या क्षेत्राशी संबंधित घडामोडींवरही लिखाण करतात.करिअरशिवराज यांनी 2009 मध्ये आपल्या पत्रकारितेतील करिअरला सुरुवात केली. सर्वात आधी Fotocorp संस्थेत कॅप्शन रायटर म्हणून काम केल्यानंतर पुढील 7 वर्ष त्यांनी टीव्हीमध्ये प्रदीर्घ अनुभव घेतला. लोकमतमधून ऑनलाइन पत्रकारितेला त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर लोकसत्ता आणि सध्या झी 24 तास अशाप्रकारे त्यांच्याकडे 9 वर्षांचा अनुभव आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशिवराज यादव यांनी मुंबईतच आपलं शिक्षण पूर्ण केलं. मुंबई विद्यापीठ मान्यताप्राप्त एमडी कॉलेजमध्ये त्यांनी आर्टसमधून 12 वी उत्तीर्ण केली. यानंतर पुढील 3 वर्षं BMM मधून शिक्षण घेत पत्रकारितेत पदवी घेतली. यादरम्यान बातम्यांचं जग, त्याची समाजाला असणारी गरज आणि त्याचं महत्व याबद्दल चांगली समज निर्माण झाली.लेखन शैली आणि दृष्टीकोणशिवराज यांचं म्हणणं आहे की, प्रत्येक व्यक्तीला आपल्या आजुबाजूला तसंच देश, विदेशात नेमक्या कोणत्या घडामोडी घडत आहेत हे माहिती असलं पाहिजे. ही जबाबदारी माध्यमांवर जास्त असून, त्यांनी ती अवितरपणे पार पडली पाहिजे. प्रत्येक माहिती जशीच्या तशी वाचकांपर्यंत पोहोचवताना माध्यमांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असते.कोणत्या विषयांची सखोल जाणराजकीय घडामोडीचालू घडामोडीमनोरंजनक्रीडा
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
पुणे, मुंबई नाही तर महाराष्ट्रातील या जिल्ह्यातील लोक अव्वल!  फॅन्सी नंबरसाठी तब्बल 19 कोटी 84 लाख रुपये मोजले

पुणे, मुंबई नाही तर महाराष्ट्रातील या जिल्ह्यातील लोक अव्वल! फॅन्सी नंबरसाठी तब्बल 19 कोटी 84 लाख रुपये मोजले

2

नवी मुंबईतील तरुणाने एकाचवेळी खरेदी केल्या 3 महागड्या कार; एवढ्या पैशात 1 कोटीचे 50 फ्लॅट विकत घेता येतील

3

टायफॉइड झाल्यावर शरीरात कोणते बदल होतात? जाणून घ्या महत्त्वाची लक्षणे

4

इमर्जिंग आशिया कप 2026 पहिल्या सामन्यात वैभव सूर्यवंशीला संधी मिळणार? कशी असेल भारताची Playing 11

5

NBCC ने सुधारली आपली चूक, 49 फ्लॅट्सबाबत कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याचं केलं मान्य; आपल्या जोखमीवर लिलावात सहभागी होण्याचं आवाहन

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

पंढरपूरमध्ये मंगळवारी रात्री शिवा संघटनेचा जिल्हाध्यक्ष राजू भिंगेची गोळ्या घालून हत्या कऱण्यात आली. यानंतर एकच खळबळ उडाली आहे. हत्येनंतर सोलापूर ग्रामीण पोलिसांनी तपासासाठी पथकं तयार केली आहेत. दरम्यान एक संशयित व्यक्तीला पंढरपूर पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. महत्त्वाचं म्हणजे, ही व्यक्ती स्वत:हून पोलीस ठाण्यात हजर झाली होती.  ऐन कार्तिकी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर मध्ये झालेली गोळीबाराची घटना यामुळे पंढरपूर हादरलं आहे.

शहराच्या उपनगरामध्ये सराईत गुन्हेगार आणि शिवा संघटनेचा जिल्हाध्यक्ष राजू भिंगे याची बंदुकीमधून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. राजू भिंगे हा पंढरपूरमधील नगरसेवक नामदेव भोईटे यांच्या हत्या प्रकरणांमध्ये सहभागी होता. 2017 साली मिरजजवळ ही घटना घडली होती. त्यामुळे पूर्व वैमान्यातून भिंगे याची हत्या झाल्याची शक्यता आहे.

पंढरपुरात इसबावी येथे राहत्या घरासमोरच गोळीबार झाल्याची घटना घडली. गोळीबारानंतर  भिंगे याला तातडीने शहरातील लाईफ लाईन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र त्या र्वीच त्याचा मृत्यू झाला. राजू भिंगेवर गावठी पिस्तुलाने छातीत आणि पायात अशा दोन गोळ्या झाडल्याची माहिती मिळत आहे. पोलीस सीसीटीव्ही तपासत असून शहरात सर्वत्र कॉम्बिंग ऑपरेशनला सुरुवात झाली आहे.

राजू भिंगे याच्यावर पंढरपूर पोलीस स्टेशनमध्ये गंभीर स्वरूपाचे पाच गुन्हे दाखल होते. त्याच्या तडीपारचा प्रस्ताव सुद्धा पोलिसांनी पाठवला होता. घटना घडलेल्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि पोलिसांनी नेमलेली पथके या मधून घटनेत सहभागी असलेल्या व्यक्तींचा शोध सुरू आहे. दरम्यान एका व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरू आहे. 
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
crime