पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पुणे महापालिका एका अजब नियम आणण्याच्या तयारीत आहेत. शहराच्या सौंदर्य वाढविण्यासाठी आणि पुणेकरांना शिस्त लावण्यासाठी महापालिकेत नवीन प्रस्ताव मांडण्यात आला आहे. हा अजब नियम म्हणजे मुख्य रस्त्यांवरील इमारतींसाठी असणार आहे. महापालिकेच्या नवीन नियम म्हणजे या इमारतींच्या बाल्कनीत किंवा खिडक्यांमध्ये कपडे सुकवण्यावर निर्बंध येणार आहे. या नवीन नियमा पुणेकरांनी जोरदार विरोध केलाय.
महापालिकेनुसार रस्त्यावरून जाताना बाल्कनीत सुकणारे कपडे हे शहराच्या सौंदर्यास खराब करतात. त्यामुळे प्रशासनाने पुणेकरांना आवाहन केलं आहे की, नागरिकांनी शहर स्वच्छतेसाठी सहकार्य करावे. मात्र, या संभाव्य निर्णयामुळे पुणेकरांमध्ये नाराजीचा तीव्र नाराजी आहे. कारण या समस्येपेक्षा सध्या शहरात पिण्याच्या पाण्याची समस्या, खराब रस्ते आणि इतर पायाभूत सुविधांचे प्रश्न गंभीर असताना महापालिकेचा हा अजब नियमामुळे पुणेकर नाराज आहेत. नागरिक आधीच दैनंदिन अडचणींचा सामना करत असतात अशात महापालिकेने मूलभूत समस्या सोडवण्याकडे पहिले लक्ष द्यावे, अशी मागणी जोरदार धरत आहे.
बाल्कनीत कपडे वाळत घालणे ही प्रत्येक घरातील सध्याची गरज आणि परिस्थिती आहे. त्यामुळे महापालिकेने अशा निर्बंधांपेक्षा नागरी सुविधांवर भर द्यावा, अशी मागणी पुणेकरांनी केली आहे. आता पुणेकरांच्या विराधानंतरही प्रशासनाचा हा प्रस्ताव प्रत्यक्षात येणार का आणि यावर अंतिम निर्णय काय असणार याकडे सर्वांच लक्ष लागलंय.
पावसाळा संपला की साचलेल्या पाण्यात डेंगी डासांची पैदास वाढून सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात तशीही डेंग्यू पेशंट्ची संख्या दरवर्षी वाढत आणि थंडी पडताच कमीही होते असं तज्न डॉक्टर सांगतात. पण यंदा अलनिनोच्या प्रभावामुळे ऑक्टोबर हिट जरा जास्तच वाढली आणि पुण्यात डेंग्यू डासांचे प्रमाणही वाढलं. विशेष करून नगररोड, बाणेर परिसरात डेंग्यू पेशंट्ची संख्या सर्वाधिक आढळून आलीय. लोहगाव आणि गोखलेनगरमधे तर दोन डेंग्यू संशयित पेशंट्सचा उपचारादरम्यान मृत्यूही झालाय. पण पालिका माञ, गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत यंदाची डेंग्यू पेशंट्सची संख्या निम्याने कमीच असल्याचा दावा करण्यात धन्यता मानतेय. डेंग्यूचा पार्दुभाव झालेल्या भागात धूळ फवारणी केल्याचाही दावा पालिकेनं केलाय.