• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /पुणे
  • /पुणे जिल्ह्यातील 8 तालुक्यात दुष्काळ जाहीर; आठ दिवसात पंचनामे होणार पूर्ण, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांची माहिती

पुणे जिल्ह्यातील 8 तालुक्यात दुष्काळ जाहीर; आठ दिवसात पंचनामे होणार पूर्ण, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांची माहिती

पुणे जिल्ह्यात देखील ८ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलं असून पुणे जिल्ह्यातील भोर,वेल्हे,दौंड,इंदापूर, पुरंदर बारामती,शिरूर आणि खेड या तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे.

Reported ByShivraj Yadav
Published: Oct 01, 2026, 05:05 PM IST|Updated: Oct 01, 2026, 05:08 PM IST
joinshare
पुणे जिल्ह्यातील 8 तालुक्यात दुष्काळ जाहीर; आठ दिवसात पंचनामे होणार पूर्ण, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांची माहिती

About the Author

Shivraj Yadav

Shivraj Yadav

शिवराज यादव झी 24 तास डिजिटलमध्ये सीनिअर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. राज्यासह देश, विदेशातील चालू घडामोडींसह राजकीय, गुन्हेगारी विषयांवरील लिखाण ते करतात. हे लिखाण करताना ते सखोल पद्धतीने करण्याकडे कल असतो. वाचकाला बातमी अत्यंत सहजपणे समजावी यासाठी ती समजेल अशा पद्धतीने लिहितात. याशिवाय क्रीडा, मनोरंजन यांचीही आवड असल्याने त्या क्षेत्राशी संबंधित घडामोडींवरही लिखाण करतात.करिअरशिवराज यांनी 2009 मध्ये आपल्या पत्रकारितेतील करिअरला सुरुवात केली. सर्वात आधी Fotocorp संस्थेत कॅप्शन रायटर म्हणून काम केल्यानंतर पुढील 7 वर्ष त्यांनी टीव्हीमध्ये प्रदीर्घ अनुभव घेतला. लोकमतमधून ऑनलाइन पत्रकारितेला त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर लोकसत्ता आणि सध्या झी 24 तास अशाप्रकारे त्यांच्याकडे 9 वर्षांचा अनुभव आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशिवराज यादव यांनी मुंबईतच आपलं शिक्षण पूर्ण केलं. मुंबई विद्यापीठ मान्यताप्राप्त एमडी कॉलेजमध्ये त्यांनी आर्टसमधून 12 वी उत्तीर्ण केली. यानंतर पुढील 3 वर्षं BMM मधून शिक्षण घेत पत्रकारितेत पदवी घेतली. यादरम्यान बातम्यांचं जग, त्याची समाजाला असणारी गरज आणि त्याचं महत्व याबद्दल चांगली समज निर्माण झाली.लेखन शैली आणि दृष्टीकोणशिवराज यांचं म्हणणं आहे की, प्रत्येक व्यक्तीला आपल्या आजुबाजूला तसंच देश, विदेशात नेमक्या कोणत्या घडामोडी घडत आहेत हे माहिती असलं पाहिजे. ही जबाबदारी माध्यमांवर जास्त असून, त्यांनी ती अवितरपणे पार पडली पाहिजे. प्रत्येक माहिती जशीच्या तशी वाचकांपर्यंत पोहोचवताना माध्यमांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असते.कोणत्या विषयांची सखोल जाणराजकीय घडामोडीचालू घडामोडीमनोरंजनक्रीडा
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

2

भूगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

3

₹100 च्या नोटांचे बंडल, आधी 'लंच ब्रेक'चं कारण अन् नंतर...; SBI मध्ये ग्राहकाने शूट केलेला धक्कादायक Video पहिला का?

4

'...तर तुम्ही ठाण्यातून परत जाणार नाही'; आदित्य ठाकरेंच्या उद्याच्या दौऱ्याआधीच शिंदेंच्या शिवसेनेचा विरोधकांना इशारा

5

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

पुणे जिल्ह्यात देखील ८ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलं असून पुणे जिल्ह्यातील भोर,वेल्हे,दौंड,इंदापूर, पुरंदर बारामती,शिरूर आणि खेड या तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. या आठही तालुक्यांमध्ये प्रशासनाकडून पंचनामे सुरू करण्यात आले असून येत्या 8 ऑक्टोबरपर्यंत पंचनामे करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिली.

यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी म्हणाले की, पुणे जिल्ह्यातील आठ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलं असून यात भोर,वेल्हे,दौंड,इंदापूर,पुरंदर बारामती,शिरूर आणि खेड या तालुक्यांचा समावेश आहे. काल सर्व विभागांची बैठक घेण्यात आली असून सर्वांना सूचना देण्यात आल्या आहेत, की बाधित क्षेत्रातील पिकांचे पंचनामे येत्या 8 ऑक्टोबरपर्यंत युद्धपातळीवर पूर्ण करायचे आहे आणि पंचनाम्यांचा अहवाल शासनाला तातडीने सादर करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर आर्थिक मदत व शासकीय सवलती उपलब्ध करून देण्याचा शासनाचा मानस आहे आणि या दृष्टीने हे कामकाज सुरू देखील करण्यात आलं आहे. यात महसूल, कृषी आणि ग्रामविकास विभागाच्या अधिकाऱ्यांचे संयुक्त पथक तयार करण्यात आले असून या सर्व पथकांना तालुका स्तरावर आवश्यक प्रशिक्षण देण्यात आले आहे असं यावेळी त्यांनी सांगितलं.

ते पुढे म्हणाले की पंचनाम्यासोबतच शेतकऱ्यांना अतिरिक्त सूट देखील देण्यात येत असून यात जमीन महसुलात सूट तसेच बाधित भागातील शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्यात येणार आहे अमली शेतकऱ्यांच्या शेतीशी निगडित कर्जांच्या वसुलीला स्थगिती देण्यात आली आहे. तसेच पीक कर्जाचे पुनर्गठन करण्यासाठी डीडीआर व जिल्हा अग्रणी बँकेमार्फत  सर्व राष्ट्रीयीकृत आणि खाजगी बँकांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत आणि कृषी पंपांच्या चालू वीजबिलात आवश्यक ती सवलत लागू करण्यात आली आहे आणि  पशुसंवर्धन विभागामार्फत जनावरांसाठी चारा डेपो किंवा चारा छावण्यांचे नियोजन करण्यात आले आहे असे यावेळी त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार जुलै महिन्यापासून आम्ही पाण्याचं नियोजन करत होतो. जिल्ह्यात मान्सूनमध्ये काही ठिकाणी कमी काळात जास्त पाऊस तर कधी मोठा खंड पावसाचा पडला असून पुणे जिल्ह्यात सरासरी चांगला पाऊस झाल्याने जिल्ह्यातील प्रमुख धरणांमध्ये सुमारे 90 ते 95 टक्क्यांपर्यंत पाणीसाठा उपलब्ध आहे. तसेच पुढील काळात देखील अल-निनो असल्याचं अंदाज व्यक्त केल्याने पुढील वर्षीच्या पावसाळ्यापर्यंत पुरेल अशा रीतीने जलसंपदा विभागाला पाणी वापराचे नियोजन करण्याचे निर्देश दिले आहेत तसेच ज्या गावांत किंवा वाड्या-वस्त्यांवर पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवेल तेथे मागणीनुसार तात्काळ पाण्याचे टँकर सुरू केले जात आहेत असे यावेळी त्यांनी सांगितले.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Pune News