• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /पुणे
  • /Explained : केतन अग्रवाल प्रकरणात सियाच्या चुलत भावाचं कनेक्शन समोर, केतनला लोहगडावरून ढकलल्यानंतर मिसळपावावर ताव अन् बंगळुरुमध्ये धक्कादायक कृत्य...

Explained : केतन अग्रवाल प्रकरणात सियाच्या चुलत भावाचं कनेक्शन समोर, केतनला लोहगडावरून ढकलल्यानंतर मिसळपावावर ताव अन् बंगळुरुमध्ये धक्कादायक कृत्य...

केतन अग्रवाल प्रकरणात चार्जचीट दाखल करण्यात आल्यानंतर या प्रकरणात धक्कादायक खुलासे होत आहेत. या प्रकरणात सिया गोयलच्या चुलत भावाचं कनेक्शन समोर आलंय.

Written ByNeha ChaudhariEdited ByNeha Chaudhari
Published: Sep 29, 2026, 02:52 PM IST|Updated: Oct 03, 2026, 06:54 AM IST
joinshare
Explained : केतन अग्रवाल प्रकरणात सियाच्या चुलत भावाचं कनेक्शन समोर, केतनला लोहगडावरून ढकलल्यानंतर मिसळपावावर ताव अन् बंगळुरुमध्ये धक्कादायक कृत्य...
Image Credit: केतन अग्रवाल प्रकरणात सियाच्या चुलत भावाचं कनेक्शन समोर

About the Author

Neha Chaudhari

Neha Chaudhari

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी  त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात.  यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात.  ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
भुगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

भुगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

2

₹100 च्या नोटांचे बंडल, आधी 'लंच ब्रेक'चं कारण अन् नंतर...; SBI मध्ये ग्राहकाने शूट केलेला धक्कादायक Video पहिला का?

3

'...तर तुम्ही ठाण्यातून परत जाणार नाही'; आदित्य ठाकरेंच्या उद्याच्या दौऱ्याआधीच शिंदेंच्या शिवसेनेचा विरोधकांना इशारा

4

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

5

पूर्णेकर प्रकरण तापलं! शिंदेंच्या शिवसेनेचं कार्यकर्त्यांना आवाहन; पूर्णेकर समर्थक पोलीस स्टेशनमध्ये

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

पुण्यातील लोहगड किल्ल्यावरून धक्का देऊन केतन अग्रवालची हत्या करण्यात आली. याप्रकरणात पोलिसांनी केतनची होणारी बायको सिया गोयल आणि तिच्या प्रियकर चेतन चौधरीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी 5053 पानांची चार्जचीट दाखल केली आहे. पोलिसांनी सांगितलं की, सियाने हत्येपूर्वी वापरलेला फोन सापडला आहे. सियाने हा फोन एका ड्रॉव्हरमध्ये ठेवला होता. या फोनमधून फॉरेन्सिक डिपार्टमेंटने अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत.

माही नावाचं अकाऊंट अन् चुलत भावाचं कनेक्शन

चार्जशीटमध्ये असाल उल्लेख करण्यात आला आहे की, सियाने चुलत भावाकडून इन्टाग्राम अकाऊंट घेतलं. याच अकाऊंटचे  युझर आयडी आणि पासवर्ड बदलून माही ठेवण्यात आलं होतं. त्या अकाऊंटवर तिच्या एका मैत्रिणीचा फोटो तिच्या परवानगीने लावला होता. महत्त्वाचे म्हणजे चेतनकडे देखील या अकाऊंटचा अॅक्सेस होता. 

पोलिसांना या तपासात अनेक धक्कादायक माहिती मिळाली आहे. तपासात असं समोर आलं की सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्या कथित गुप्त विवाह केल्याच समोर आलं आहे. या दोघांनी राजस्थानमधील खाटूश्याम मंदिरात लग्न केल्याचं समोर आलं आहे. पण या प्रकरणात लग्नाची अधिकृत नोंद किंवा सीसीटीव्ही फुटेज समोर आलेले नाही.  पण दुसरीकडे सियाच्या भांगेत सिंदूर आणि चेतनच्या गळ्यात फुलांचा हार असलेला फोटो आरोपींच्याच मोबाईलमधून मिळाला आहे. 

त्याने हत्येनंतर मिसळ खाल्ली

लोहगडावरून केतनची हत्या केल्यानंतर चेतन खाली उतरला आणि जुन्या पुणे - मुंबई महामार्गावरून परत जाताना तो एका हॉटेलमध्ये थांबला होता आणि त्याने मिसळ खाल्ली होती. हे सगळं सीसीटीव्हीमध्ये दिसून आलं आहे. याच सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांचा तपास पुढे गेला आहे. पोलिसांनी माहिती दिली की, चेतन आणि सियाने अनेक वेळा केतनला मारण्याचा प्रयत्न केला आहे. पण ते अपयशी ठरले होते. पण त्यादिवशी लोहगडावरील त्याचे कारस्थानला यश आलं आणि केतनचा मृत्यू झाला. 

बनावट इन्स्टाग्राम अकाऊंट अन्...

केतनला लोहगडवर आणण्यासाठी सियाने इन्स्टाग्रामवर एक फेक अकाऊंट तयार केलं होतं. हे अकाऊंट सियाने माही नावाने सुरु केले होते आणि ती तिच्या मैत्रिणीचे होते असं दाखवलं. याच अकाऊंटवरून केतनला मेसेज करुन लोहगडावर बोलवण्यात आलं होतं. १९ जूनला सियाचा वाढदिवस होता. तर १८ जूनला सियाला सरप्राईज म्हणून लोहगडवर ट्रेकिंगला घेऊन जा असा मेसेज या अकाऊंटवरून करण्यात आला होता. नंतर हे अकाऊंट डिलीट करण्यात आलं. पण सायबर पोलिसांनी फॉरेन्सिकने ते अकाऊंट रिकव्हर केले.

या गोष्टींचा शोध घेण्यात आला...

केतनची हत्या करण्यापूर्वी आणि केल्यानंतर सिया आणि चेतनने केल्यानंतर Google/YouTube सर्च हिस्टरी, व्हॉट्सॲप चॅट्स, आयक्लॉड डेटा आणि कॉल लॉग्स डिलीट करून पुरावे नष्ट केले होते. पण हेसगळं पण पोलिसांनी फॉरेन्सिकच्या मदतीने रिकव्हर करण्यात आलं. एवढंच नाही तर चेतनने आपले लोकेशन लपवण्यासाठी दुसऱ्या व्यक्तीचा मोबाईलचा वापर केला होता, असं तपासात समोर आं आहे. 


 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Pune
crime