• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /पुणे
  • /सरकारी आणि देवस्थानच्या जमीनीवर चारा लागवड करावी; खासदार मोहिते पाटील यांनी सुचवला पर्याय

सरकारी आणि देवस्थानच्या जमीनीवर चारा लागवड करावी; खासदार मोहिते पाटील यांनी सुचवला पर्याय

आगामी काळात चारा निर्मिती साठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार मोहिते पाटील यांनी पर्याय सुचवला आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवले आहे.

Reported ByVanita Kamble
Published: Sep 30, 2026, 11:59 PM IST|Updated: Oct 01, 2026, 12:06 AM IST
joinshare
सरकारी आणि देवस्थानच्या जमीनीवर चारा लागवड करावी;  खासदार मोहिते पाटील यांनी सुचवला पर्याय

About the Author

Vanita Kamble

Vanita Kamble

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

2

भूगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

3

₹100 च्या नोटांचे बंडल, आधी 'लंच ब्रेक'चं कारण अन् नंतर...; SBI मध्ये ग्राहकाने शूट केलेला धक्कादायक Video पहिला का?

4

'...तर तुम्ही ठाण्यातून परत जाणार नाही'; आदित्य ठाकरेंच्या उद्याच्या दौऱ्याआधीच शिंदेंच्या शिवसेनेचा विरोधकांना इशारा

5

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

खासदार मोहिते पाटील : राज्यात 265 तालुक्यांमध्ये सरकारने दुष्काळ जाहीर झाला आहे. शेतीसह जनावरांच्या चारा पाण्याचा प्रश्न देखील गंभीर बनला आहे. अशातच आगामी काळात चारा निर्मितीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार मोहिते पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडवीस यांचा पर्याय सुचविले आहेत. सरकारी तसेच देवस्थानच्या जमीनीवर चारा लागवड करावी अशी सूचना त्यांनी केली आहे. 
 

राज्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आगामी काळात उद्भवणाऱ्या चारा टंचाईच्या अडचणीवर मात करण्यासाठी शेती महामंडळ, वन विभाग तसेच शासनाच्या ताब्यात असणाऱ्या विविध जमिनी उपलब्ध असून, सोबतच राज्यातील मोठ्या देवस्थानांकडे असणाऱ्या जमिनी यांचा दुष्काळाच्या कालावधीत नियोजनबद्ध पद्धतीने उपयोग करून त्यावर तातडीने चारा पिकांची लागवड केल्यास पशुपालकांना मोठा दिलासा मिळू शकतो. त्यामुळे उपलब्ध शासकीय तसेच निमशासकीय आणि देवस्थानांच्या जमिनीची पाहणी करून, योग्य जमिनीवर चारा पिकांची लागवड करण्याची कार्यवाही तातडीने हाती घेण्यात यावी. अशी मागणी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी केली आहे
 

उपरोक्त विषयास अनुसरून, महाराष्ट्र राज्याच्या अनेक भागांमध्ये अपुरा व खंडित पाऊस झाल्याने शेती व पशुधनावर गंभीर परिणाम होत असून, सद्यस्थितीचा विचार करता आगामी काळात चारा व पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. ग्रामीण भागातील शेतकरी व पशुपालकांसाठी पशुधन हा त्यांच्या उपजीविकेचा महत्त्वाचा आधार असल्याने, दुष्काळाच्या परिस्थितीत पशुधनाचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी शासनाने तातडीने प्रभावी उपाययोजना करणे आवश्यक आहे. 
 

दुष्काळी परिस्थितीचा विचार करून पात्र दूध उत्पादकांना प्रतिलिटर 15/- अनुदान देण्याची योजना तातडीने लागू करण्यात यावी. सदर अनुदानाची रक्कम पात्र दूध उत्पादकांच्या बैंक खात्यावर DBT पद्धतीने जमा करण्याची कार्यवाही करण्यात यावी. अशी मागणी केली आहे.

 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Pune
Solapur
Maharashtra Politics