• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /पुणे
  • /गोकुळवर सतेज पाटील यांच्या समविचारी आघाडीची सत्ता; महाराष्ट्रापासून दिल्लीत सत्तेत असलेल्या महायुतीला मोठा धक्का

गोकुळवर सतेज पाटील यांच्या समविचारी आघाडीची सत्ता; महाराष्ट्रापासून दिल्लीत सत्तेत असलेल्या महायुतीला मोठा धक्का

गोकुळ दूध संघ निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. सतेज पाटलांच्या समविचारी आघाडीनं दणदणीत विजय मिळवत महायुतीला पराभवाचे पाणी पाजले आहे.

Reported ByVanita Kamble
Published: Oct 19, 2026, 09:49 PM IST|Updated: Oct 19, 2026, 09:51 PM IST
joinshare
गोकुळवर  सतेज पाटील यांच्या समविचारी आघाडीची सत्ता; महाराष्ट्रापासून दिल्लीत सत्तेत असलेल्या महायुतीला मोठा धक्का

About the Author

Vanita Kamble

Vanita Kamble

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

2

पूर्णेकर प्रकरण तापलं! शिंदेंच्या शिवसेनेचं कार्यकर्त्यांना आवाहन; पूर्णेकर समर्थक पोलीस स्टेशनमध्ये

3

नाशिककरांसाठी महत्त्वाची बातमी! 30 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबरला वाहतूक मार्गात मोठे बदल, तर हा रस्ता वाहतुकीसाठी राहणार बंद

4

टोल प्लाझाच्या 20 किमी परिसरात राहणाऱ्यांसाठी गुड न्यूज; 1 नोव्हेंबरपासून नवे नियम लागू

5

मोठी बातमी! 'कर्मचारी विशेष' लोकल कायमची बंद करणार किंवा...; ठाणे स्टेशनवरील कर्मचाऱ्यांच्या मुजोरपणानंतर रेल्वेकडून 2 पर्यायांवर विचार सुरु

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

Gokul Election Result :  राज्यभर चर्चेत असलेल्या गोकुळ दूध संघ निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. सतेज पाटलांच्या समविचारी आघाडीनं महायुतीला जोरदार धक्का दिला आहे. गोकुळवर  सतेज पाटील यांच्या समविचारी आघाडीची सत्ता आली आहे. सतेज पाटलांच्या समविचारी आघाडीने 13 जागा जिंकल्या आहेत. तर, 12 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले आहे. एका आकड्याने या निवडणुकीचा सर्व डाव उलटला आहे. 

एकूण 25 संचालकांच्या जागांसाठी 50 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले होते. गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी 99.88 टक्के मतदान पार पडलं. जवळपास 5 हजार 416 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. या निवडणुकीसाठी मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक, जिल्ह्यातील महायुतीचे आमदार आणि समविचारी आघाडीचे नेते सतेज पाटील या दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली.  गोकुळचा गुलाल कोण उधळणार, याकडे लक्ष लागले होते.

ही निवडणूक जिंकण्यासाठी काँग्रेस नेते सतेज पाटील आणि राष्ट्रवादीचे नेते, मंत्री हसन मुश्रीफ यांनी आपली संपूर्ण ताकद पणाला लावली होती. सुरुवातील महायुतीच्या पॅनलं आघाडी घेतली होती. मात्र, सतेज पाटलांच्या पॅनलनं मुंसडी मारत मतमोजणीत आघाडी घेतली. आबाजी पाटील आणि युवराज पाटील या दोन्ही अर्ज नामंजूर झाले. अखेरीस  सतेज पाटलांच्या समविचारी आघाडीचे 13 उमेदवार विजयी ठरले. सतेज पाटील यांनी गोकुळची निवडणुक जिंकत महायुतीला पराभवाचे पाणी पाडले आहे.

सतेज पाटील मतमोजणी केंद्रावर  ठाण मांडून बसले होते. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून निकाल जाहीर करण्यासाठी मुद्दाम उशिरा केला जात आहे, असा आरोप सतेज पाटलांनी केलाय. पॅनलनं आघाडी घेताच सतेज पाटलांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला.

अनेक दिग्गजांचा पराभव

गोकुळच्या निवडणुकीत अनेक दिग्गजांचा पराभव झाला आहे.  महायुतीच्या नेत्या शौमिका महाडिक, माजी अध्यक्ष नावेद मुश्रीफ, अरुण डोंगळे, विश्वास पाटील यांना पराभवाचा धक्का बसला आहे. गोकुळ दूध संघ निवडणुकीत महायुतीला दुहेरी धक्का बसला आहे. हसन मुश्रीफांचे पुत्र नावेद मुश्रीफांचा पराभव झाला. शौमिका महाडिक यांचाही पराभव झाला. शौमिका महाडिकांकडून फेर मतमोजणीची मागणी करण्यात आली होती.  मात्र, फेर मतमोजणीतही शौमिका महाडिकांचा पराभव झाला आहे. 
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Kolhapur
Maharashtra Politics