• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /पुणे
  • /गोपीचंद पडळकरांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा! काय आहे प्रकरण?

गोपीचंद पडळकरांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा! काय आहे प्रकरण?

सर्वोच्च न्यायालयाने भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचा मोठा दिलासा दिला आहे. काय आहे नेमकं प्रकरण जाणून घ्या.

Written ByNeha ChaudhariEdited ByNeha Chaudhari
Published: Oct 16, 2026, 03:51 PM IST|Updated: Oct 16, 2026, 04:14 PM IST
joinshare
गोपीचंद पडळकरांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा! काय आहे प्रकरण?
Image Credit: Gopichand Padalkar

About the Author

Neha Chaudhari

Neha Chaudhari

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी  त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात.  यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात.  ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
भुगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

भुगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

2

₹100 च्या नोटांचे बंडल, आधी 'लंच ब्रेक'चं कारण अन् नंतर...; SBI मध्ये ग्राहकाने शूट केलेला धक्कादायक Video पहिला का?

3

'...तर तुम्ही ठाण्यातून परत जाणार नाही'; आदित्य ठाकरेंच्या उद्याच्या दौऱ्याआधीच शिंदेंच्या शिवसेनेचा विरोधकांना इशारा

4

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

5

पूर्णेकर प्रकरण तापलं! शिंदेंच्या शिवसेनेचं कार्यकर्त्यांना आवाहन; पूर्णेकर समर्थक पोलीस स्टेशनमध्ये

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

सर्वोच्च न्यायालयाने भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा दिला आहे. त्यामुळे सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचा मार्ग त्यांचा मोकळा झाला आहे. सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी पडळकर यांनी दाखल केलेला उमदेवारी अर्ज वैध ठरला आहे. सर्वोच्च न्यायालयाने हा अर्ज वैध ठरवल्यामुळे आता पडळकरांचा निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. महत्त्वाचे म्हणजे मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठानेही पडळकरांचा हा अर्ज अवैध ठरवला होता. त्यामुळे पडळकरांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने पडळकरांच्या बाजूने निर्णय देत त्यांना मोठा दिलासा दिला आहे. 

काय आहे नेमका वाद?

सध्या महाराष्ट्रातील सांगलीमध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या 21 जागांसाठी निवडणूक आहे. या निवडणुकीसाठी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी जत सोसायटीच्या माध्यमातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता पण तो अवैध ठरवण्यात आला होता. पडळकरांनी या अर्जासोबत जे कागदपत्रे लावली होती ती बनावट असल्याचा आरोप काँग्रेस नेते आणि माजी आमदार विक्रम सांवत यांनी केला होता. सावंत यांच्यासह बाजार समितीचे माजी सभापती सुजय शिंदेंनीही पडळकरांवर कागदापत्राबद्दल आरोप केला होता. 

विरोधकांनी असा आक्षेप घेतला होता की,  पडळकर हे कोणत्याही संस्थेचे संचालक नाहीत. शिवाय ते दोन वर्षांपासून सभासदही नाही,  त्यामुळे ते उमेदवारी अर्ज भरू शकत नाहीत. यानंतर सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांच्या अर्ज वैध ठरला होता. त्यानंतर विक्रम सावंत आणि सुजय शिंदे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात याचिका दाखल केली. या अर्जावर सुनावणीदरम्यान पुराव्यांच्या आधारे पडळकर यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरवण्यात आला. त्यामुळे पडळकरांनी उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. इथे मात्र निकाल पडळकरांच्या बाजूने लागला आणि निवडणूक लढवण्याचा मार्ग त्यांच्या मोकळा झाला. 

पडळकर समर्थकांची प्रतिक्रिया

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर पडळकरांच्या समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. पडळकर यांचे कार्यकर्ते महादेव पाटील म्हणाले की, विरोधकांनी उच्च न्यायालयात गेले आणि तिथे पडळकरांच्या अडचणी वाढवल्यात. पण या निर्णयाला पडळकर यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आणि तिथे त्यांच्या विजय झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालामुळे सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील चुरस पाहण्यासारखी असणार आहे. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Sangli
Gopichand Padalkar
Supreme court
Maharashtra Politics