उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या 28 जानेवारी 2026 रोजी अपघातात मृत्यू झाला. मुंबईवरून बारामतीला ज्या विमानाने अजित पवार जात होते खराब दृश्यमानतेमुळे आणि ढगाळ वातावरणामुळे विमान क्रॅश झालं, असा प्राथमिक अंदाज लावण्यात आला आहे. पणदुसरीकडे मुंबईतील 3 वर्षांपूर्वीच्या एका विमान दुर्घटनेशी कनेक्शन लावण्यात येतोय. मुंबई विमानतळावर सप्टेंबर 2023 मध्ये झालेल्या चार्टर विमान अपघाताचा फायनल रिपोर्ट एअर अॅक्सीडेंट इन्वेस्टिगेशन ब्यूरोने जाहीर केला आहे. त्यानंतर ही चर्चा रंगली आहे, कारण या रिपोर्टमधून मोठा खुलासा करण्यात आला आहे.
या रिपोर्टनुसार सप्टेंबर 2023 मध्ये झालेल्या चार्टर विमान अपघात हा पायलटच्या अनस्टेबलाइझ्ड अप्रोचमुळे आणि एसओपीचे योग्य पालन न केल्यामुळे झाला आहे. हे विमान व्हिसीआर कंपनीचे होतं. धक्कादायक अजित पवार यांच्या अपघातात झालेल्या विमान देखील व्हिसीआर कंपनीचे होतं. अजित पवार यांच्या विमान अपघातामागे खराब दृश्यमानतेमुळे आणि ढगाळ वातावरणामुळे विमान धावपट्टीवर उतरताना क्रॅश झालंय. या अपघातात अजित पवार यांच्यासह इतर प्रवाशांचाही मृत्यू झाला होता. या अहवालातून असं समोर आलं की, एकाच कंपनीच्या विमानांचे कमी वेळ दोन मोठे अपघात झालाय. त्यामुळे या अहवालाच्या रिपोर्टनंतर महाराष्ट्रात मोठी खळबळ माजली आहे. त्यासोबतच विमान प्रवासाच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर झालाय.
एएआयबीनुसार, 14 सप्टेंबर 2023 ला विशाखापट्टणमहून मुंबईला एक न ठरलेले विमान आलं होतं. जेव्हा हे विमान विशाखापट्टणमहून टेकऑफ केलं ते सामान्यपणे होते. एवढंच नाहीतर प्रवासादरम्यानही विमानात कुठलीही अडचण आली नव्हती. पुढे या विमानाला रनवे 27 वर उतरण्याची परवानगी मिळाली. पण त्यावेळी मुंबईत मुसळधार पाऊस सुरु होता. त्यामुळे दृश्यमानता पहिलेपासूनच कमी होतं.
अशावेळी विमान उतरण्याच्या वेळी अस्थिर झालं आणि सुरुवातीला धावपट्टीच्या डाव्या बाजूला भरकटले. त्यानंतर हळूहळू धावपट्टी 27 च्या उजव्या बाजूला सरकलं. पुढे ऑटोपायलट बंद झाल्यानंतर सुमारे 40 सेकंदांनी, कॉकपिटमध्ये स्टॉलच्या इशाऱ्यासोबत स्टिक शेकर अलर्टचा आवाज यायला लागला.
त्यानंतर, EGPWS चे इशारे देण्यात आले. टॅक्सीवे W आणि टॅक्सीवे N च्या छेदनबिंदूजवळ विमानाचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आलं. त्यानंतर विमान घसरत गेले आणि टॅक्सीवे U आणि टॅक्सीवे N च्या छेदनबिंदूजवळ (स्टँड C80 जवळ) एका कच्च्या जागेवर विमान क्रॅश झालं. या अपघातानंतर विमानाला आग लागली. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि त्यांनी आग विझवली. या दुर्घटनाग्रस्त विमानातून प्रवाशांना बाहेर काढण्यात आलं. काही प्रवासी जखमी झाले होते. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. खराब हवामान असताना पायलटने विमान लँड करण्याचा निर्णय घेतल्यामुळे ही दुर्घटना घडली, असं एएआयबीच्या रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलंय.