SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

मोठा खुलासा! अजित पवारांच्या विमान अपघाताचं 3 वर्षांपूर्वीच्या दुर्घटनेशी कनेक्शन? AAIB चा फायनल रिपोर्ट समोर

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच मुंबईतील 3 वर्षांपूर्वीच्या दुर्घटनेशी कनेक्शन असल्याचे बोललं जातंय.

Written By Neha Chaudhari Edited By Neha Chaudhari
Published: Oct 18, 2026, 03:29 PM IST | Updated: Oct 18, 2026, 03:32 PM IST
Image Credit: Ajit Pawar
Join

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या 28 जानेवारी 2026 रोजी अपघातात मृत्यू झाला. मुंबईवरून बारामतीला ज्या विमानाने अजित पवार जात होते खराब दृश्यमानतेमुळे आणि ढगाळ वातावरणामुळे विमान क्रॅश झालं, असा प्राथमिक अंदाज लावण्यात आला आहे. पणदुसरीकडे मुंबईतील 3 वर्षांपूर्वीच्या एका विमान दुर्घटनेशी कनेक्शन लावण्यात येतोय. मुंबई विमानतळावर सप्टेंबर 2023 मध्ये  झालेल्या चार्टर विमान अपघाताचा  फायनल रिपोर्ट एअर अ‍ॅक्सीडेंट इन्वेस्टिगेशन ब्यूरोने जाहीर केला आहे. त्यानंतर ही चर्चा रंगली आहे, कारण या रिपोर्टमधून मोठा खुलासा करण्यात आला आहे.

या रिपोर्टनुसार सप्टेंबर 2023 मध्ये  झालेल्या चार्टर विमान अपघात हा पायलटच्या अनस्टेबलाइझ्ड अप्रोचमुळे आणि एसओपीचे योग्य पालन न केल्यामुळे झाला आहे. हे विमान व्हिसीआर कंपनीचे होतं. धक्कादायक अजित पवार यांच्या अपघातात झालेल्या विमान देखील व्हिसीआर कंपनीचे होतं. अजित पवार यांच्या विमान अपघातामागे खराब दृश्यमानतेमुळे आणि ढगाळ वातावरणामुळे विमान धावपट्टीवर उतरताना क्रॅश झालंय. या अपघातात अजित पवार यांच्यासह इतर प्रवाशांचाही मृत्यू झाला होता. या अहवालातून असं समोर आलं की, एकाच कंपनीच्या विमानांचे कमी वेळ दोन मोठे अपघात झालाय. त्यामुळे या अहवालाच्या रिपोर्टनंतर महाराष्ट्रात मोठी खळबळ माजली आहे. त्यासोबतच विमान प्रवासाच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर झालाय.

सप्टेंबर 2023 मध्ये झालेल्या विमान अपघाताबद्दल अहवालामध्ये काय सांगितलंय?


एएआयबीनुसार, 14 सप्टेंबर 2023 ला विशाखापट्टणमहून मुंबईला एक न ठरलेले विमान आलं होतं. जेव्हा हे विमान विशाखापट्टणमहून टेकऑफ केलं ते सामान्यपणे होते. एवढंच नाहीतर प्रवासादरम्यानही विमानात कुठलीही अडचण आली नव्हती. पुढे या विमानाला रनवे 27 वर उतरण्याची परवानगी मिळाली. पण त्यावेळी मुंबईत मुसळधार पाऊस सुरु होता. त्यामुळे दृश्यमानता पहिलेपासूनच कमी होतं.

अशावेळी विमान उतरण्याच्या वेळी अस्थिर झालं आणि सुरुवातीला धावपट्टीच्या डाव्या बाजूला भरकटले. त्यानंतर हळूहळू धावपट्टी 27 च्या उजव्या बाजूला सरकलं. पुढे ऑटोपायलट बंद झाल्यानंतर सुमारे 40 सेकंदांनी, कॉकपिटमध्ये स्टॉलच्या इशाऱ्यासोबत स्टिक शेकर अलर्टचा आवाज यायला लागला.

त्यानंतर, EGPWS चे इशारे देण्यात आले. टॅक्सीवे W आणि टॅक्सीवे N च्या छेदनबिंदूजवळ विमानाचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आलं. त्यानंतर विमान घसरत गेले आणि टॅक्सीवे U आणि टॅक्सीवे N च्या छेदनबिंदूजवळ (स्टँड C80 जवळ) एका कच्च्या जागेवर विमान क्रॅश झालं. या अपघातानंतर विमानाला आग लागली. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि त्यांनी आग विझवली. या दुर्घटनाग्रस्त विमानातून प्रवाशांना बाहेर काढण्यात आलं. काही प्रवासी जखमी झाले होते. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. खराब हवामान असताना पायलटने विमान लँड करण्याचा निर्णय घेतल्यामुळे ही दुर्घटना घडली, असं एएआयबीच्या रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलंय. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी  त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात.  यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात.  ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.

ZEENEWS TRENDING STORIES