नोव्हेंबरचा अर्धा महिना संपला आहे, अशात महाराष्ट्रातील वातावरणात मोठा बदल पाहिला मिळतोय. दिवसा उन्हाचे चटके आणि मध्यरात्री - पहाटे गारवा जाणवतोय. या संमिश्र वातावरणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होतोय. भारतीय हवामान विभागाच्या अर्लटनुसार उत्तर भारतात काही राज्यांमध्ये पावसाचा इशारा दिला आहे. तर महाराष्ट्रात मात्र हवामान उष्ण आणि दमट असणार आहे. तर उत्तर दिशेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे थंडीची कपडे बाहेर काढावे लागणार आहे, असं हवामान खात्याने सांगितलं आहे.
मुंबई आणि उपनगरांमधील वातावरणाबद्दल बोलायचं झालं तर आकाश मुख्यत्वे निरभ्र असणार आहे. सकाळी आणि रात्री गारवा जाणवत असला तरी दिवसा मात्र उन्हाचे चटके जाणवणार आहे. पण दुसरीकडे हवामान विभागाने विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातही थंडी चाहुल लागणार आहे. पण ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या किनारपट्टीवरील जिल्ह्यांमध्येही हवामान कोरडेच असणार आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड आणि लातूर जिल्ह्यांमध्ये थंडीची चाहुल लागणार आहे. एकंदरीत महाराष्ट्रात पावसाचा कुठलाही इशार नसून दिवसा हवामान कोरडे तर रात्री - पहाटे गारवा जाणवणार आहे.
14 Nov, Tmin Maharashtra Klp 17.7 °C Parbhani 16.4 MWR 15 NSK 13.4 Malegaon 14.4 Pune 13.9 Jalna 16 Slp 16.9 Jalgaon 13.5 Sangli 15.6 Nanded 15 Matheran 20 Chh.Sambhaji Nagar 15.2 Satara 14.1 Dharashiv 16 Baramati 13.2 Jeur 12 Udgir 11.6 Nandurbar 18 AhilayNagar 14.5
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) November 14, 2026
पण भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार श्चिम राजस्थान, लडाख, हिमाचल प्रदेश आणि जम्मू आणि काश्मीरच्या अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र वेगाने मजबूत होणार असल्याने तिसऱ्यांना चक्रीवादळ येणार आहे. त्यामुळे 18-19 नोव्हेंबर 2026 दरम्यान आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या किनारपट्टी भागात मुसळधार पावसाचा इशार देण्यात आला आहे.