SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

हवामानाचा दुहेरी खेळ! पुढील काही तास महत्त्वाचे; महाराष्ट्रातील हवामानात पुन्हा मोठे बदल, IMD चा अलर्ट

महाराष्ट्रात हवामानात बदल पाहिला मिळतोय. दिवसा उन्हाचे चटके तर मध्यरात्री आणि पहाटे गारवा जाणवतोय. हवामान विभागाकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Written By Neha Chaudhari Edited By Neha Chaudhari
Published: Nov 15, 2026, 08:46 AM IST | Updated: Nov 15, 2026, 08:55 AM IST
Image Credit: maharashtra weather
Join

नोव्हेंबरचा अर्धा महिना संपला आहे, अशात महाराष्ट्रातील वातावरणात मोठा बदल पाहिला मिळतोय. दिवसा उन्हाचे चटके आणि मध्यरात्री - पहाटे गारवा जाणवतोय. या संमिश्र वातावरणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होतोय. भारतीय हवामान विभागाच्या अर्लटनुसार उत्तर भारतात काही राज्यांमध्ये पावसाचा इशारा दिला आहे. तर महाराष्ट्रात मात्र हवामान उष्ण आणि दमट असणार आहे. तर उत्तर दिशेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे थंडीची कपडे बाहेर काढावे लागणार आहे, असं हवामान खात्याने सांगितलं आहे.

महाराष्ट्रात कसं असणार हवामान?

मुंबई आणि उपनगरांमधील वातावरणाबद्दल बोलायचं झालं तर आकाश मुख्यत्वे निरभ्र असणार आहे. सकाळी आणि रात्री गारवा जाणवत असला तरी दिवसा मात्र उन्हाचे चटके जाणवणार आहे. पण दुसरीकडे हवामान विभागाने विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातही थंडी चाहुल लागणार आहे. पण ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या किनारपट्टीवरील जिल्ह्यांमध्येही हवामान कोरडेच असणार आहे.  छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड आणि लातूर जिल्ह्यांमध्ये थंडीची चाहुल लागणार आहे. एकंदरीत महाराष्ट्रात पावसाचा कुठलाही इशार नसून दिवसा हवामान कोरडे तर रात्री - पहाटे गारवा जाणवणार आहे. 

 

 

पण भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार श्चिम राजस्थान, लडाख, हिमाचल प्रदेश आणि जम्मू आणि काश्मीरच्या अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र वेगाने मजबूत होणार असल्याने तिसऱ्यांना चक्रीवादळ येणार आहे. त्यामुळे 18-19 नोव्हेंबर 2026 दरम्यान आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या किनारपट्टी भागात मुसळधार पावसाचा इशार देण्यात आला आहे. 


 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी  त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात.  यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात.  ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES