....तर मी पाय धरायलाही तयार आहे, राज ठाकरेंनी MPSC विद्यार्थ्यांना दिला शब्द; आवाहन करत म्हणाले 'फक्त भलते गैरसमज...'
पुण्यात एमपीएससीचे विद्यार्थी आंदोलन करत असून, मनसे अध्यक्ष राज ठाकरे त्यांत्या भेटीसाठी पोहोचले होते.
पुण्यात एमपीएससीचे विद्यार्थी आंदोलन करत असून, मनसे अध्यक्ष राज ठाकरे त्यांत्या भेटीसाठी पोहोचले होते. यावेळी त्यांनी 70 हजार पदांची भरती होणं शक्य नाही असं सांगताना पुन्हा एकदा भूमिपूत्रांना नोकरीत प्राधान्य देण्याचा मुद्दा मांडला. मराठी तरुण, तरुणींना नोकऱ्या मिळाल्या तर आंदोलनाची गरज नाही असं ते म्हणाले. तसंच मराठी मुलांसाठी जर कोणाचेही पाय घरायला लागले तर राज ठाकरे तयार आहे असंही सांगून टाकलं. आपण आऱक्षण पाहिजे म्हणतो. पण नोकऱ्या कुठे आहेत? अशी विचारणाही त्यांनी केली.
सगळं खासगी होत चाललं आहे
आपण आऱक्षण पाहिजे म्हणतो. पण नोकऱ्या कुठे आहेत. सगळं खासगी होत चाललं आहे. केंद्र सरकार त्यासाठी बसलं आहे. जमीन, पोर्ट, विमानतळ अदानीला देत आहेत. खासी क्षेत्रात आरक्षण नाही. मग हे सगळं सरकारी धोरणांमुळे होत आहे. तुम्हाला गृहित धरलं आहे. याचं कारण निवडणुका येतात त्यावेळी पैसे फेकले जातात. त्याच्यातून निवडून येणार हे त्यांनी माहिती असतं. त्यांचा गैरसमज दूर करत नाही तोपर्यंत न्याय मिळणार नाही असं त्यांनी सांगितलं.
पाय धरायला लागले तर राज ठाकरे तयार
शक्य त्या मार्गाने प्रश्न सोडवला पाहिजे. मराठी मुलांसाठी जर कोणाचेही पाय धरायला लागले तर राज ठाकरे तयार आहे. फक्त भलत्या गरैरसमज, प्रश्नात राहू नका. परस्थिती समजून घ्या आणि मगच आंदोलन सुरु ठेवा. रोज कोणीतरी येईल, भाषणं करतील, नवीन उमेद, स्वप्नं दाखवलीत पण वस्तुस्थिती समजून घ्या. बाबव वाढला पाहिजे, तो सरकारला कळता पाहिजे आणि निर्णय घेतला पाहिजे. लवकरच प्रश्न मार्गी लागेल अशी आशा आहे असं ते म्हणाले आहेत.
तुमची वेदना मी समजू शकतो
"सरकारी फसवणुकीमुळे आपल्या आयुष्यातील उमेदीचा काळ कसा जातो, हे माझ्यापेक्षा चांगलं कोणी सांगू शकणार नाही, हे आता देशभर जे आंदोलन सुरु आहे. तुमच्याकडे पेपर आणि आमच्याकडे मतं फुटत आहेत. या गोष्टींमुळे एक वर्ष पुढे जातं. जशी तुमच्या आयुष्यातील वर्ष जातात तशी आमचीही जातात. जे आम्हाला वाटतं ते तुम्हाला कळू शकेल. संपूर्ण देशभर बेधुंदशाही सुरु आहे. कोणी कोणाचं ऐकायला तयार नाही. एकाच बाजूने मन की बात सुरु आहे. जणू काही दुसऱ्या बाजूला मन नाही. रोज कोणीतर येणार, भाषण करणार, टाळ्या पिटणार यात आयुष्य घालवू नका. माझा पुनर्जन्मावर विश्वास नाही. या आयुष्यातील एक एक वर्ष पुडे जात आहे. आम्ही निवडणुकांसाठी तयारी करतो, मग कळतं की, मतांची चोरी झाली. पाच पाच वर्ष निघून जातात. तुमची वेदना मी समजू शकतो," असंही त्यांनी सांगितलं.
जातीपातीच्या भानगडीत पडू नका
"देशात, महाराष्ट्रात प्रत्यक्ष स्थिती काय आहे जाणून घ्या. जातीपातीच्या भानगडीत पडू नका. यात तुम्हाला अडकवलं जात आहे. जेणेकरुन रोजच्या विषयाकडे लक्ष जाऊ नये. जातीत एकमेकांचा राग करा, मारा यात तुमचा वेळ गेला तर घरी जाऊन आई-वडिलांना काय तोंड दाखवणार आहात? अनेक मुलं कर्ज घेऊन आली आहेत. मराठा, धनगर, हिंदू, मुस्लिम यातच आपण अडकलो आहोत. कारण प्रश्नांकडे लक्ष जाऊ नये यासाठी भरटकवंल जात आहे, त्यातून बाहेर पडा", असं आवाहन त्यांनी केलं.
....तर आंदोलनाची गरज नाही
"मराठवाड्यासह महाराष्ट्रातून इतकी मुलं आली आहेत. पण नशिबात पेपर फुटला येत आहे. मी सांगतो ते सत्य आणि कडवट असतं. अनेकांना ते झेपत नाही. पण कालांतराने बरोबर बोलला असं कळतं. मी सांगतो की, 70 हजारांची पदभरती होणार नाही. हे तुम्ही आताच लक्षात ठेवा. दुसरं सरकार आलं तरी मागणी पूर्ण होऊ सकत नाही. परिस्थिती, वस्तुस्थिती समजून घ्या. पण नोकऱ्या मिळाल्याच पाहिजेत. मी 20-22 वर्ष सतत सांगतोय की. नोकऱ्या कामधंदे मराठी मुला मुलींना मिळाले पाहिजेत. उद्या या गोष्टी मिळाल्या तर आंदोलनाची गरज नाही," असं ते म्हणाले.