मफलरवाला नेता कोण? छगन भुजबळ यांची एका वाक्यात प्रतिक्रिया
मुंबई आणि पुण्यात पोस्टर लागले आहेत. मफलरवाला नेता कोण ?अशी चर्चा रंगली आहे. यावर मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अजित पवार विमान दुर्घटना : फ्लेक्सवर अजित पवार यांच्या अपघात/घातपातामागे असलेल्यांना वाचवणारा नेता कोण ? असा मजकूर असलेले बॅनर लागले आहेत. फ्लेक्स वर मफलरचा ही फोटो आहे, मुंबईपाठोपाठ पुण्यातही मफलरवाल्या नेत्याचे बॅनर झळकले आहेत. डेक्कन परिसरातील या बॅनरची चर्चा रंगली असून, 16 तारखेला रोहित पवार कोणता गौप्यस्फोट करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मफलरवाला नेता कोण? यावर मंत्री छगन भुजबळ यांची एका वाक्यात प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबईपाठोपाठ पुण्यात ही लागले मफलर वाला नेता कोण याचे फ्लेक्स लागले आहेत. रोहित पवार करणार याबद्दल गौप्यस्फोट करणार आहेत. त्यामुळे हा मफलरवाला कोण याची चर्चा जोरात सुरू आहे.
मफलरवाला नेता कोण ? याबाबत पत्रकार परिषदेत मोठा गौप्यस्फोट केला जाणार आहे. रोहित पवारांकडील माहिती महाराष्ट्रासह देशासमोर येणार असल्याचा खळबळजनक दावा अमोल मिटकरींनी केला आहे. संबंधित नेत्याला सोडणार नाही असा मिटकरीनी इशार दुला आहे.
छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया
मफलरवाल्या नेत्याच्या पोस्टरबाजीवर छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महायुतीच्या नेत्या या सुनेत्रा पवार आहेत. त्यांनी सांगितल आहे सर्व चौकशी निकाल आल्यानंतर भाष्य करू. कोणाला आपण थांबू शकत नाही. कोण काय म्हणाले यासंदर्भात उत्तर देणार नाही असं म्हणत मफलरवाला नेता कोण? या प्रश्नाचे एका वाक्यात उत्तर दिले आहे.
अमोल मिटकरींचा खळबळजनक दावा
रोहित पवार यांच्याकडे जी काही माहिती आहे, ती ते महाराष्ट्रासह संपूर्ण देशासमोर मांडतील, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माजी आमदार अमोल मिटकरी यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, मफलरवाला नेता असा उल्लेख करत मिटकरी यांनी व्ही. के. सिंग यांच्या मुलाच्या लग्नात विशिष्ट मफलर आणि कोट कोणी वापरला होता? तसेच व्ही. के. सिंग आरोपी असताना त्यांना वाचवण्याचा प्रयत्न कोणी केला ? असे सवाल उपस्थित करत आगामी पत्रकार परिषदेत या संपूर्ण प्रकरणाचा बारीकसारीक उलगडा होण्याचे संकेत दिले आहेत.
एवढेच नाही, तर या प्रकरणामागे कोणत्याही पक्षाचा नेता असला तरी त्याला सोडणार नाही, असा आक्रमक पवित्रा मिटकरी यांनी घेतला आहे. संबंधित नेत्याला जाणीवपूर्वक धडा शिकवल्याशिवाय महाराष्ट्र सोडणार नाही, अशी धमकीवजा भाषा करत त्यांनी आणखी एक वादग्रस्त विधान केले आहे. भविष्यात त्याच्या घरात पाळणा हलवणारा कोणी शिल्लक राहणार नाही, असा इशाराही मिटकरी यांनी दिला. या पत्रकार परिषदेतून नेमके कोणते खुलासे होणार आणि ''''मफलरवाला नेता'''' कोण, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे..