SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

गोकुळच्या निवडणूकीत नवा पेच! एका कायद्यामुळे सरकारने नियुक्त केलेल्या 4 संचालकांना मतदान करता येणार नाही?

गोकुळच्या निवडणूकीत नवा पेच निर्माण झाला आहे. सरकारने नियुक्त केलेल्या 4 संचालकांना मतदान करता येणार की नाही असा संभ्रम निर्माण झाला आहे. सहकार कायद्यात याबाबत तरतूद आहे.

Reported By Vanita Kamble Written By Vanita Kamble
Published: Nov 09, 2026, 20:00 IST | Updated: Nov 09, 2026, 20:04 IST
Join

गोकुळ दूध संघ अध्यक्षपदाची निवडणूक : गोकुळ दूध संघाच्या अध्यक्ष निवडीचा उद्या फैसला होणार असला, तरी शासन नियुक्त चार संचालकांच्या मतदानाच्या अधिकारावरून नवा पेच निर्माण झाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने ठरल्याप्रमाणे अध्यक्ष निवड प्रक्रिया घेण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, शासनाने आजच चार स्वीकृत संचालकांची नावे जाहीर केली आहेत. या चारही संचालकांना मतदान करता येणार का, हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न उपस्थित झाला आहे.

सहकार कायद्यातील तरतुदीनुसार अध्यक्ष निवडीसाठी संचालकांना 7 दिवस आधी नियमानुसार पूर्वसूचना देणे आवश्यक आहे. विशेष परिस्थितीतही किमान 3 दिवसांची नोटीस देण्याची तरतूद आहे. मात्र, शासन नियुक्त चार संचालकांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून अद्याप कोणतीही नोटीस बजावण्यात आलेली नसल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यामुळे उद्याच्या अध्यक्ष निवडीत या चार संचालकांना मतदानाचा अधिकार मिळणार की केवळ निवडून आलेल्या 25 संचालकांनाच मतदान करता येणार, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. 

कारण या निर्णयावरच गोकुळमधील सत्तेचं गणित अवलंबून असणार आहे.  25 निवडून आलेल्या संचालकांमध्ये समविचारी आघाडीचे 13, तर महायुतीचे 12 संचालक आहेत. केवळ या 25 संचालकांनाच मतदानाची संधी मिळाल्यास 13 विरुद्ध 12 असे संख्याबळ कायम राहणार आहे. मात्र, शासन नियुक्त 4 संचालकांना मतदानाचा अधिकार दिल्यास महायुतीच्या 12 मतांमध्ये आणखी 4 मतांची भर पडून हे संख्याबळ 16 पर्यंत पोहोचू शकते. त्यामुळे उद्या निवडणूक निर्णय अधिकारी नेमकी कोणती भूमिका घेणार? न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी आणि सहकार कायद्यातील नोटीस प्रक्रियेचा ताळमेळ कसा साधणार? याकडे संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे.

गोकुळ अध्यक्ष निवडीत मतदानाचा पेच

एकूण निवडून आलेले संचालक – 25
समविचारी आघाडी – 13
महायुती – 12
निवड प्रक्रिया कशी होऊ शकेल यामधील पर्याय क्रमांक 1
केवळ 25 संचालकांना मतदान
समविचारी आघाडी – 13 मते
महायुती – 12 मते
अध्यक्ष निवड प्रक्रिया कशी होऊ शकेल यामधील पर्याय क्रमांक 2
शासन नियुक्त चार संचालकांनाही मतदानाचा अधिकार
महायुती – 12 + 4 = 16 मते 
समविचारी आघाडी – 13 मते

आता सर्वात मोठा प्रश्न असा आहे की शासन नियुक्त चार संचालकांना नोटीस बजावली आहे का? नोटीसशिवाय मतदानाचा अधिकार देता येणार का? निवडणूक निर्णय अधिकारी कोणती भूमिका घेणार? गोकुळच्या अध्यक्ष निवडीत उद्या नेमकं काय घडणार? या कडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेला आहे. दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी देखील तसाच मुद्दा उपस्थित केला आहे. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES