SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

मोठी बातमी! पुणे जिल्ह्याला मिळणारी तिसरी महानगरपालिका, सुनेत्रा पवारांनी दिले स्पष्ट संकेत; 'ही महानगरपालिका व्हावी हे अजितदादांचे...'

सुनेत्रा पवारांनी बुधवारी वेगवेगळ्या विकासकामांच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. त्यावेळी त्यांच्याकडे एका माजी आमदाराने अत्यंत महत्त्वाची मागणी केली. यासंदर्भात सुनेत्रांनी जाहीर भाषणात भाष्य केलं. त्या नेमकं काय म्हणाल्या जाणून घ्या...

Reported By Swapnil Ghangale Written By Swapnil Ghangale
Published: Nov 05, 2026, 08:28 AM IST | Updated: Nov 05, 2026, 08:46 AM IST
Image Credit: पुण्यात सध्या आहेत दोन महानगरपालिका (प्रातिनिधिक फोटो, सौजन्य - सोशल मीडियावरुन साभार)
Join

राज्याला मोठा महसूल देणाऱ्या चाकण औद्योगिक नगरीत नागरिकांना मात्र रोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय. हा प्रश्न सोडवण्यासाठी चाकणला महानगरपालिका करण्याची मागणी माजी आमदार दिलीप मोहिते-पाटील यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे केली आहे. विशेष म्हणजे यानंतर सुनेत्रा पवारांनी यावर सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

माजी आमदाराने केली मागणी

चाकणची वाहतूक कोंडी आणि मूलभूत सुविधांचा प्रश्न सोडवण्यासाठी आता महानगरपालिकेची मागणी जोर धरू लागलीय. चाकणमध्ये एक दिवस येऊन पाहा, पुन्हा इथे यावंसं वाटणार नाही, अशा शब्दांत माजी आमदार दिलीप मोहिते-पाटील यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासमोर परिस्थिती मांडली. अनेक आंदोलनं आणि आश्वासनांनंतरही वाहतूक कोंडीचा प्रश्न कायम असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. चाकण आणि परिसराची लोकसंख्या सुमारे पाच लाखांवर पोहोचल्याचा दाखला देत रस्ते, गटारं आणि पिण्याच्या पाण्याचे प्रश्न सोडवण्यासाठी चाकणला महानगरपालिका करण्याची मागणी त्यांनी केली. आता सुनेत्रा पवार या मागणीवर काय निर्णय घेतात, याकडे चाकणकरांचं लक्ष लागलंय.

चाकणमधील वाहतूक कोंडीबद्दल सुनेत्रा पवार काय म्हणाल्या?

चाकणमधील वाहतूक कोंडी आणि नागरी सुविधांबद्दल बोलताना सुनेत्रा पवारांनी, "⁠चाकण परिसरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पुणे-नाशिक महामार्गावर नाशिक फाटा ते चाकण असा उन्नत मार्ग मार्गी लावण्याचा प्रयत्न आहे. ⁠चाकणपर्यंत मेट्रो धावणार यासाठी काम सुरु आहे.  ⁠रस्ते विकासाला प्राधान्य देत आहोत. ⁠चाकण परिसरावर बारकाईने माझं लक्ष आहे अजित पवारांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण करणार," असा शब्द स्थानिकांना जाहीर भाषणात दिला. तसेच, "⁠लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांनी एकत्र काम करण्याची गरज आहे," असंही सुनेत्रा पवार म्हणाल्या. 

चाकण महापालिका करण्यासंदर्भात काय म्हणाल्या?

चाकणला महापालिका करण्याच्या मागणीला सुनेत्रा पवारांनी होकार दिला आहे. चाकण महापालिका करण्यासंदर्भात बोलताना, "लवकरच जाहीर करणार", असं सूचक विधान सुनेत्रा पवारांनी केलं. "चाकणला महानगरपालिका व्हावी हे दादांचे स्वप्न होते. यासाठी सर्वांचे सहकार्य रहावं," अशी अपेक्षा सुनेत्रा पवारांनी व्यक्त केली. 

महापालिका झाल्यास काय फायदा?

कोणतेही शहर महानगरपालिका घोषित झाल्यास त्या शहराच्या विकासासाठी अधिक निधी मिळतो. तसेच शहरामध्ये उत्तम पायाभूत सुविधा निर्माण होण्याच्या संधी वाढतात आणि स्वतंत्र स्थानिक प्रशासनाचे अधिकार वाढण्यासारखे मोठे फायदे मिळतात. 

पुण्यात सध्या किती महानगरपालिका?

पुण्यात सध्या पुणे महानगरपालिका (PMC) आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका (PCMC) अशा दोन महानगरपालिका असून लवकरच चाकण, हिंजवडी परिसराचा समावेश असलेली महानगरपालिका जाहीर करण्यासंदर्भातील निर्णयाची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. पुण्यातील तिसरी महानगरपालिका ही महाराष्ट्रातील 30 वी महानगरपालिका ठरेल.

अजित पवारांनी प्रमाणापेक्षा जास्त निधी दिला

बुधवारी सुनेत्रा पवारांनी खेड तालुक्यातील चाकण, कडूस, राजगुरुनगर परिसराच्या विविध महत्त्वपूर्ण विकासकामांचं उद्घाटन व लोकार्पण केलं. यामध्ये, राजगुरुनगर सहकारी बँक लि. च्या चाकण येथील 20 व्या नवीन शाखेचं उद्घाटन करण्यात आलं. या ठिकाणी भाषणादरम्यान सुनेत्रा पवारांनी, "खेड तालुक्यातील सोलर ग्रीन एनर्जी प्रकल्प आणि पोलीस चौकी उद्घाटन झालं. ⁠खेड तालुक्यातील विकासासाठी अजित पवारांनी प्रमाणापेक्षा जास्त निधी दिला," अशी आठवण सांगितली. तसेच पुढे बोलताना, "आज माझ्या हस्ते बँकेचे उद्घाटन होत असले तरी अप्रत्यक्ष अजित दादांच्या हस्ते उद्घाटन होत असल्यासारखं वाटतंय," असं सुनेत्रा पवार म्हणाल्या. यापूर्वी चार शाखांचे उद्घाटन अजित पवारांच्या हस्ते झाले होते, त्याचसंदर्भातून सुनेत्रा पवारांनी हे विधान केलं. "⁠राजगुरुनगर सहकारी बँकेचा नावलौकिक चांगला आहे. बँकेचा विस्तार करताना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवा बँकेला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा," असंही सुनेत्रा पवार म्हणाल्या.

अजितदादांची अपूर्ण स्वप्नं पूर्ण करण्यासाठी मी उभी

"⁠अजितदादांची अपूर्ण स्वप्नं पूर्ण करण्यासाठी मी उभी आहे. चाकणमधील विकास कामांच्या उद्घाटन झाल्यानंतर लोकांनी भावना मांडल्या. दादांनी सुरू केलेली कामं आज पूर्ण होताना पाहून समाधान मिळत आहे. चाकण परिसराची पहाणी अजित पवारांनी यापूर्वी केली त्यावर उपाययोजना कामं सुरू आहे," असंही सुनेत्रा पवार म्हणाल्या.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मोजक्या शब्दांमध्ये...स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.पत्रकारितेचा श्रीगणेशास्वप्निल यांनी पत्रकारितेच्या दुसऱ्या वर्षापासूनच 'ठाणे वैभव' या ठाण्यातील स्थानिक वृत्तपत्रामध्ये शिकाऊ पत्रकार म्हणून कामाला सुरुवात केली. सांस्कृतिक आणि गुन्हेगारी यासंदर्भातील वृत्तांकन यांनी या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये केलं. बीएमएमच्या तृतीय वर्षाला ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालयातील 'ऋत' या पत्रकारिता विभागाच्या महाविद्यालयीन वृत्तपत्रासाठी स्वप्निल यांनी उपसंपादक म्हणून काम पाहिले.डिजिटलमध्ये एन्ट्री'महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉम'च्या माध्यमातून पहिल्यांदा डिजिटल क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या स्वप्निल यांनी सुरुवातीला सोशल मिडिया व्यवस्थापक म्हणून काम पाहिले. त्यानंतर हळूहळू ते डिजिटल वृत्तांकनाकडे वळले. त्यांनी 'महाराष्ट्र टाइम्स' वृत्तपत्रामध्येही माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लेखन केलं. मुख्य पुरवणीसोबतच अनेकदा रविवार विशेष अंकांमध्येही त्यांचे लेख छापून आले आहेत. 'मुंबई टाइम्स' या पुरवणीअंतर्गत विद्यार्थ्यांच्या विश्वातील अनेक विषय त्यांनी कॉलेज क्लब रिपोर्ट्सच्या माध्यमातून हाताळले. कॉलेज क्लब रिपोर्टर्ससोबतच्या कामासोबतच त्यांनी 'मटा सन्मान', 'मटा श्रावण क्विन' यासारख्या कार्यक्रमांसाठी डिजिटल आणि प्रिंटदरम्यान संयोजक म्हणून काम पाहिलं. जवळपास पाच वर्ष ते मटामध्ये कार्यरत होते.प्रगल्भतेची आसमहाराष्ट्र टाइम्सनंतर तितक्याच तोलामोलाच्या 'लोकसत्ता'मध्ये स्वप्निल यांनी काम केलं. या ठिकाणीही ते पाच वर्ष कार्यरत होते. 'मटा'पासून सुरु झालेल्या प्रवासाला 'लोकसत्ता'मध्ये प्रगल्भता लाभली. राजकीय बातम्या, ताज्या घडामोडी, ट्रेडींग बातम्या याबरोबरच त्यांनी डिजिटल आणि प्रिंटमधील समन्वयाचं (इंटीग्रेशन) कामही त्यांनी लोकसत्तामध्ये केलं. 'लोकसत्ता'मधील 'व्हिवा' या पुरवणीमध्ये तरुणाईसंदर्भातील विषयांवर त्यांनी लेखन केलं. तसेच 'लोकप्रभा'च्या माध्यमातून त्यांनी माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लिखाण केलं. लोकसत्ता डॉट कॉममध्ये स्वप्निल यांनी चार ते पाच सेक्शनसची जबाबदारी पार पाडली.तो सध्या काय करतो?'लोकसत्ता'नंतर स्वप्निल यांनी पहिल्यांदाच टीव्हीशी संलग्न वेबसाईटसाठी म्हणजेच 'झी 24 तास'च्या वेबसाईटसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी ते ताज्या घडामोडींबरोबरच, राजकीय बातम्या, ब्रेकिंग बातम्या, ट्रेडिंग बातम्या हाताळतात. बातमीमधील अचूक माहिती, व्याकरण, उत्तम मथळे यासारख्या गोष्टींकडे त्यांचं कटाक्षाने लक्ष असतं. लिखाणबरोबरच मॅरेथॉन पळणं, वेगवेगळ्या ठिकाणी खादडीसाठी जाणं, पुस्तकांसोबतच अवांतर वाचन यासारख्या गोष्टींना ते प्राधान्य देतात.

ZEENEWS TRENDING STORIES