• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /पुणे
  • /सांगली मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत नवा ट्वीस्ट, मित्रांमध्येच जुंपली; मोठ्या घडामोडींना सुरुवात!

सांगली मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत नवा ट्वीस्ट, मित्रांमध्येच जुंपली; मोठ्या घडामोडींना सुरुवात!

सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीत कोण ठरणार किंग? आज होणार निर्णय!

Reported ByPravin Dabholkar
Published: Nov 18, 2026, 12:47 IST|Updated: Nov 18, 2026, 12:59 IST
joinshare
सांगली मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत नवा ट्वीस्ट, मित्रांमध्येच जुंपली; मोठ्या घडामोडींना सुरुवात!
Image Credit: सांगली जिल्हा बँकेच्या निवडणूक

About the Author

Pravin Dabholkar

Pravin Dabholkar

प्रविण दाभोळकर हे झी 24 तास डिजिटलमध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत असून मीडिया क्षेत्रातील 16 वर्षांहून अधिक अनुभव असलेले पत्रकार आहेत. शिक्षण, करिअर, रोजगार, सरकारी योजना, गुंतवणूक, अर्थकारण, सार्वजनिक धोरणे आणि राजकीय घडामोडी यांसारख्या विषयांवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. वाचक-केंद्रित पत्रकारिता, तथ्याधारित माहिती आणि सोप्या, स्पष्ट भाषेत गुंतागुंतीचे विषय समजावून सांगणे हे त्यांच्या लेखनाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.करियरची सुरुवातवयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी वृत्तसंकलन, रिपोर्टिंग आणि लेखन यामध्ये महत्त्वाचा अनुभव मिळवला. त्यानंतर प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया या तिन्ही माध्यमांमध्ये विविध जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी पत्रकारितेचा व्यापक अनुभव संपादन केला. बदलत्या मीडिया विश्वाशी जुळवून घेत त्यांनी डिजिटल पत्रकारितेमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशैक्षणिकदृष्ट्या त्यांनी मुंबईतील एम.डी. महाविद्यालयातून पदवी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर मुंबई विद्यापीठातून समाजशास्त्र (Masters in Sociology) विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. पुढे साठ्ये महाविद्यालयातून मराठी पत्रकारितेमध्ये मास्टर्स ऑफ कम्युनिकेशन अँड जर्नालिझम ही पदवी संपादन केली. या शैक्षणिक पार्श्वभूमीमुळे सामाजिक प्रश्नांची सखोल समज, वस्तुनिष्ठ विश्लेषण आणि जबाबदार पत्रकारिता यांचा मजबूत पाया त्यांना लाभला आहे.लेखन शैली आणि दृष्टीकोनसंशोधनात्मक लेखन, सखोल विश्लेषण आणि फीचर स्टोरीज याकडे त्यांचा विशेष कल आहे. सामान्य वाचकांपर्यंत महत्त्वाच्या पण दुर्लक्षित राहिलेल्या कथा पोहोचवणे, गुंतागुंतीच्या विषयांचे सोप्या भाषेत विश्लेषण करणे आणि अचूक माहिती सादर करणे यासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या लेखनात तथ्यांची पडताळणी, संदर्भांची अचूकता आणि वाचकांसाठी उपयुक्त माहिती यांना नेहमीच प्राधान्य दिले जाते.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी ते फिटनेस, सरकारी योजना, तसेच इतर महत्वाच्या बातम्यांसाठी व्हिडीओ बनवतात. यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.विशेष ज्ञानाची क्षेत्रेह्यूमन इंटरेस्ट स्टोरीज, शिक्षण, करिअर मार्गदर्शन, रोजगार, सरकारी योजना, सामाजिक प्रश्न, गुंतवणूक आणि सार्वजनिक हिताच्या विषयांवरील लेखन हे त्यांचे विशेष अभ्यासाचे क्षेत्र आहे. वाचकांना केवळ बातमी नव्हे, तर त्या बातमीचा परिणाम, पार्श्वभूमी आणि उपयोग समजून देण्यावर त्यांचा भर असतो.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
पुणे, मुंबई नाही तर महाराष्ट्रातील या जिल्ह्यातील लोक अव्वल!  फॅन्सी नंबरसाठी तब्बल 19 कोटी 84 लाख रुपये मोजले

पुणे, मुंबई नाही तर महाराष्ट्रातील या जिल्ह्यातील लोक अव्वल! फॅन्सी नंबरसाठी तब्बल 19 कोटी 84 लाख रुपये मोजले

2

नवी मुंबईतील तरुणाने एकाचवेळी खरेदी केल्या 3 महागड्या कार; एवढ्या पैशात 1 कोटीचे 50 फ्लॅट विकत घेता येतील

3

टायफॉइड झाल्यावर शरीरात कोणते बदल होतात? जाणून घ्या महत्त्वाची लक्षणे

4

इमर्जिंग आशिया कप 2026 पहिल्या सामन्यात वैभव सूर्यवंशीला संधी मिळणार? कशी असेल भारताची Playing 11

5

NBCC ने सुधारली आपली चूक, 49 फ्लॅट्सबाबत कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याचं केलं मान्य; आपल्या जोखमीवर लिलावात सहभागी होण्याचं आवाहन

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीच्या निमित्ताने जिल्ह्यातील वर्चस्वाच्या लढाईत कोण बाजी मारणार? याचा निर्णय आज होणार आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक अनेक अर्थानी गाजली. त्यामुळे सर्वपक्षीय सत्ता असली तरी अध्यक्ष पदाच्या निवडीमध्ये जयंत पाटील की विश्वजीत कदम गटाचा अध्यक्ष होणार ? जिल्हा बँकेचा अध्यक्ष कोण आणि कोणच्या गटाचं होणार,याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिले. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 21 जागांसाठी निवडणूक पार पडली.जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक पार पडताना, अनेक घडामोडी व राजकीय कुरघोडी पाहायला मिळाली.जिल्हा बँकेची निवडणूक पार पडताना महायुती विरुद्ध महाविकास आघाडी,अशा लढतीचे चित्र निर्माण झालं होतं. मात्र पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक बिनविरोध करण्याचा आवाहन करण्यात आले. सर्वच पक्षांना केल्यानंतर अर्ज माघारीच्या दिवशी भाजपा, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस,शिंदे सेना आणि काँग्रेस सर्वांनी एकत्रित येत,जयंत पाटलांच्या नेतृत्वाखाली जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला,ज्यामधून 15 जागा या बिनविरोध झाल्या,मात्र 6 जागांसाठी निवडणूक पार पडली

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सहा जागांसाठी पार पडलेल्या निवडणुकांमध्ये सगळ्यात गाजलेली निवडणूक म्हणजे भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांची जत सोसायटी गटातील माजी खासदार संजय काका पाटील विरुद्ध सुमनताई पाटील यांच्या तासगाव सोसायटी गट आणि कवठेमंकाळ गटातील माजी मंत्री अजितराव घोरपडे यांची निवडणूक आमदार गोपीचंद पडळकर विरुद्ध जयंत पाटील अशा संघर्षाची किनार जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये पाहायला मिळाली

जयंत पाटलांच्या नेतृत्वाखाली जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध होताना गोपीचंद पडळकर यांना सोयीस्करपणे बाहेर ठेवण्यात आल्या त्या दुष्काळाच्या मुद्द्यावर बिनविरोधात निवडणुकीची मोट बांधली गेली त्यामध्ये दुष्काळी जत तालुक्यातलीच गोपीचंद पडळकर यांच्या जत सोसायटी गटाची निवडणूक झाली. जयंत पाटलांनी हे निवडणूक सर्वपक्षीय लढवताना महाविकास आघाडीच्या उमेदवारांना माघार घ्यायला लावली मात्र विनोद पवार यांना महाविकास आघाडीचे बळ देऊन गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात मैदानात उतरवल्या अत्यंत अटीतटीची ही निवडणूक झाली यामध्ये गोपीचंद पडळकर 54 मते घेऊन निवडून आले गटातून संजय काका पाटील यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या माजी आमदार सुमनताई पाटील यांचा अवघ्या दोन मतांनी पराभव केला कवठेमंकाळ सोसायटी गटातून माजी मंत्री अजितराव घोरपडे हे विजय झाले त्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने जयंत पाटलांच्या वर्चस्वाला यामुळे हादरा बसला होता

या सर्व घडामोडी होत असताना जिल्हा बँकेमध्ये एक पाऊल मागे घेतल्यानंतर पाटलांनी चार जागा केल्या होत्या आणि एक जागा निवडून आल्यानंतर पाच जागांवर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे संचालक हे निवडून आले मात्र जिल्हा बँकेच्या संचालक पदांच्या संख्याबळात काँग्रेस आमदार विश्वजीत कदम यांच्या खेळीने काँग्रेसचे सहा संचालक निवडून आले चार जागा विश्वजीत कदम यांनी आपल्या पदरात बिनविरोध करून पाडून घेतल्या होत्या आणि दोन जागांवर काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले होते

तो दुसऱ्या बाजूला चंद्रकांत पाटील माजी आमदार पृथ्वीराज देशमुख आणि सम्राट यांच्या नेतृत्वाखाली भाजपाला चार जागा बिनविरोध निवडून आणल्या होत्या आणि गोपीचंद पडळकर यांच्या रूपाने जिल्हा बँकेत भाजपाचे संख्याबळ हे पाचं झाले

शिवसेना शिंदे पक्षाने देखील या ठिकाणी तीन जागा आपल्या पदरात बिनविरोध करून आधीच पाडून घेतल्या होत्या. 21 जागा असणारया जिल्हा बँकेतील पक्षीय बलाबल.राष्ट्रवादी कॉग्रेस शरद पवार - 4,काँग्रेस-6,भाजपा - 5,शिवसेना शिंदे पक्ष - 3,राष्ट्रवादी अजित पवार - 2, अपक्ष - 1 असे गणित आहे.

काँग्रेस आमदार विश्वजीत कदम यांचा करिष्मा पाहायला मिळाला, सहा जागांवर काँग्रेसचे संचालक विजय झाले आहेत काँग्रेसचा पहिला हक्क मानला जात होता, मात्र सर्वपक्षीय सत्तेच्या समीकरणांमध्ये जयंत पाटील यांच्या गटाचा अध्यक्ष होणार अशी चर्चा सुरुवातीपासूनच होती अगदी गोपीचंद पडळकर यांनी देखील विजय झाल्यानंतर देवराज पाटील जयंत पाटील गटाचे संचालक अध्यक्ष होतील असं सूचक विधान देखील केलं होतं

गेल्या दहा वर्षांपासून सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेवर जयंत पाटलांची एक हाती सत्ता राहिली आहे सर्वच पक्षीय सत्तेचा गणित दहा वर्षात जयंत पाटलांनी मांडलं मात्र हे होत असताना अध्यक्षपद हे आपल्याकडेच ठेवण्यात जयंत पाटलांची केली हे नेहमीच यशस्वी ठरले त्यामुळे यंदा देखील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत सर्वाधिक कमी जागा असल्यास तरी जयंत पाटील हे अध्यक्ष पद आपल्या पदरात पाडून घेतील अशी दाट शक्यता व्यक्त केली जात होती.

अध्यक्षाच्या निवडीबाबत भाजपाने मात्र निवडणुकीनंतर संयमाची भूमिका घेतल्याचे पाहायला मिळालं,पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी अध्यक्ष सर्वपक्षीय सत्तेतला असेल, पण तो भाजपाच्या निर्णयावर ठरेल,असं विधान केलं होतं.

या सर्वच पार्श्वभूमीवर जिल्हा बँकेच्या अध्यक्ष निवडीत जयंत पाटील विरुद्ध विश्वजीत कदम,असा सुप्त संघर्ष देखील पाहायला मिळाला,विश्वजीत कदम यांनी काँग्रेसचे संचालक महेंद्र लाड यांच्या अध्यक्षपदासाठी केलेली रचना पथ्यावर पडेल,असे अंदाज बांधले जात आहेत.


जिल्हा बँकेच्या सत्तेमध्ये सर्वपक्षीय सत्ता असणार आहे.त्यामुळे या ठिकाणी काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस ,शिंदे सेना आणि भाजप हे सर्वच तुल्यबळ आहेत.त्यामुळे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यासाठी रस्सीखेच राहणार आहे यावर तोडगा म्हणून अध्यक्ष उपाध्यक्ष पदाचा फॉर्म्युला देखील महायुती आणि महाविकास आघाडी कडून ठरवला जाणार आहे,त्यानंतरच जिल्हा बँकेच्या कारभारात सर्वपक्षीय सत्तेचे मुहूर्तमेढ रोवला जाणार आहे.


सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक पार पडली असून अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडीचा आज फैसला होणार आहे. या निवडणुकीमध्ये सर्वपक्षीय सत्ता असली, तरी या ठिकाणी आता अध्यक्ष कोणाचा होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिला आहे,अध्यक्ष पदाच्या निवडीमध्ये आमदार जयंत पाटील यांच्या गटाचे देवराज पाटील आणि काँग्रेस आमदार विश्वजीत कदम यांच्या गटाचे महेंद्र लाड यांच्यामध्ये चुरस आहे,जिल्हा मध्यवर्ती बँकेत विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वाखाली सर्वाधिक सहा जागा निवडून आल्या आहेत.त्यामुळे काँग्रेसचे महेंद्र लाड यांच्या नावावर शिक्कामूर्तब होईल अशी शक्यता आहे.दुपारी तीन वाजता जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये संचालक मंडळाची बैठक होऊन निवड होणार आहे,तत्पूर्वी महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही गटाच्या स्वतंत्र बैठक फोन अध्यक्ष उपाध्यक्ष पदाचा फॉर्मुला ठरणार आहे आणि अध्यक्ष व उपाध्यक्ष कोणाला करायचं,यावर अंतिम निर्णय होणार आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Maharashtra Politics