• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /पुणे
  • /पुण्यात विनापरवाना रॅपिडो बाईक टॅक्सी तातडीने बंद करण्याचे आदेश

पुण्यात विनापरवाना रॅपिडो बाईक टॅक्सी तातडीने बंद करण्याचे आदेश

पुण्यात विनापरवाना रॅपिडो बाईक टॅक्सी तातडीने बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी हे आदेश दिले आहेत.

Reported ByVanita Kamble
Published: Oct 15, 2026, 06:37 PM IST|Updated: Oct 15, 2026, 06:42 PM IST
joinshare
पुण्यात विनापरवाना रॅपिडो बाईक टॅक्सी तातडीने बंद करण्याचे आदेश

About the Author

Vanita Kamble

Vanita Kamble

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

2

भूगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

3

₹100 च्या नोटांचे बंडल, आधी 'लंच ब्रेक'चं कारण अन् नंतर...; SBI मध्ये ग्राहकाने शूट केलेला धक्कादायक Video पहिला का?

4

'...तर तुम्ही ठाण्यातून परत जाणार नाही'; आदित्य ठाकरेंच्या उद्याच्या दौऱ्याआधीच शिंदेंच्या शिवसेनेचा विरोधकांना इशारा

5

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

पुणे न्यूज :  पुण्यात विनापरवाना सुरू असलेल्या रॅपिडो बाईक टॅक्सी सेवा बंद करण्याचे आदेश आज तातडीने देण्यात आले आहेत. टॅक्सी आणि रिक्षाचालकांच्या तक्रारीनंतर हा निर्णय घेण्यात आला. विविध कंपन्यांकडून चालकांना प्रवासभाड्याची योग्य रक्कम मिळत नसल्याच्या तक्रारीही करण्यात आल्या होत्या. त्यामुळे चालकांना प्रवासभाड्याच्या किमान 80 टक्के रक्कम देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पुणे जिल्हाधिकारी यांच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे.  

पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्या उपस्थितीत एक बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय जाहीर करण्यात आले.  पुण्यात  विनापरवाना रॅपिडो बाईक टॅक्सी सुरू होती. या विरोधात रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी तक्रार केली होती.  

टॅक्सी रिक्षा चालकांच्या तक्रारीनंतर आज तातडीने बाईक टॅक्सी बंद करण्याचे आदेश दिले आहेत.  विविध कंपन्यांकडून रिक्षाने टॅक्सी चालकांना योग्य मोबदला दिला जात नसल्याच्या तक्रारी होत्या.   किमान 80 टक्के भाड्याची रक्कम चालकांना देण्यात यावी असे निर्देश देण्यात आले आहेत.

पुण्यात 10 तालुक्यात दुष्काळ घोषीत

सध्या पुण्यामध्ये 10 तालुक्यात दुष्काळ घोषित केला आहे.   शेतकरी पीक नुकसान, पंचनामे, महसूल, कृषी आणि जिल्हा प्रशासनाकडून सुरू आहे .  रविवारी पंचनामे सुरू आहेत.   दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत दिली जाईल. 

अल निनो डिसेंबर पासून कठीण होणार आहे पुढील वर्षी मान्सून लांबणार आहे.  31 ऑगस्ट 2027 पर्यंत पाणी नियोजन बैठक झाली.  जल सिंचन महापालिका आणि जिल्हा प्रश्नांची बैठक झाली. 100 टक्के पाणी धरणात नाही त्यामुळे 31 ऑगस्ट पर्यंत पाणी वापरायचे आहे.  खडकवासला वापरण्यायोग्य पाणी साठा बाष्पीभवन आणि मृत साठा विचारात घेतला आहे.  त्यानुसार 20 टक्के पाणी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.  

पिण्याच्या पाण्याच्या नियोजनासाठी पाणी वाचविण्यासाठी नियोजन करणे गरजचे आहे.  पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेत कपात निर्णय लागू होईल.  पिण्याच्या पाण्यासाठी पाणी अन्य वापर केला जातो त्यावर लक्ष ठेवण्यासाठी भरारी पथके नेमून, महावितरण च्या मदतीने विद्युत पुरवठा खंडित करणे. रब्बी हंगामात पाणी देण्यासाठी पशुधन चार, भाजीपाला आणि बारमाही नियोजन केले जाईल. 
भारतीय हवामान विभागाच्या सूचनेनुसार शेतीसाठी पाणी कपात केली होती. पशु संवर्धन विभागाला चारा उपलब्धतेसाठी उत्पादन आणि सध्या जिल्ह्याबाहेर वाहतुकीवर बंदी घातली आहे.  
 

टँकरचे नियोजन केले आहे.  येत्या उन्हाळ्याचे नियोजन करावे लागणार आहे.   भविष्यात गरज पडल्यास जलतरण तलाव, वॉटर पार्क आणि वॉटर बाटलिंग प्लांट बंद ठेवावे लागेल.  शेतीसाठी पाणी आवर्तन सुरू करण्यासाठी महसूल पोलिस जलसिंचन आणि पाटबंधारे विभागाच्या समन्वयातून काम केले जाईल.  सरसकट पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत. जर तक्रार असेल त्या ठिकाणी पुन्हा पंचनामे करून योग्य मोबदला दिला जाईल. 20 ऑक्टोबर पर्यंत पंचनामे करून राज्य सरकारकडे अहवाल पाठवणार आहोत. उद्योगांचे पाणी 20 कपातीचा निर्णय लागू राहणार आहे अशी माहिती पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिली. 
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Pune
Pune News