• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /पुणे
  • /पुण्यात खळबळ! भरदिवसा बड्या उद्योगपतीवर हल्ला

पुण्यात खळबळ! भरदिवसा बड्या उद्योगपतीवर हल्ला

पुण्यात भरदिवसा बड्या उद्योगपतीवर हल्ला झाला आहे. यामुळे खळबळ माजली आहे.

Reported ByVanita Kamble
Published: Oct 18, 2026, 11:48 PM IST|Updated: Oct 18, 2026, 11:54 PM IST
joinshare
पुण्यात खळबळ! भरदिवसा बड्या उद्योगपतीवर हल्ला

About the Author

Vanita Kamble

Vanita Kamble

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

2

भूगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

3

₹100 च्या नोटांचे बंडल, आधी 'लंच ब्रेक'चं कारण अन् नंतर...; SBI मध्ये ग्राहकाने शूट केलेला धक्कादायक Video पहिला का?

4

'...तर तुम्ही ठाण्यातून परत जाणार नाही'; आदित्य ठाकरेंच्या उद्याच्या दौऱ्याआधीच शिंदेंच्या शिवसेनेचा विरोधकांना इशारा

5

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

Pune Crime News :  बारामती मध्ये राणा शिपिंग कंपनीचे मालक राणा दिलीप सूर्यवंशी यांच्यावरती हल्ला झाला आहे. बारामती विमानतळाजवळ हा हल्ला झाल्याची माहिती असून सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास हा हल्ला झाल्याची माहिती आहे. यात राणा सूर्यवंशी जखमी झाले असून त्यांच्यावर बारामतीच्या खाजगी रुग्णालयात प्राथमिक उपचार करून राणा यांना आता पुण्याला उपचारासाठी हलवण्यात आल आहे. या हल्ल्यामुळे खळबळ उडाली असून कायदा आणि सुव्यस्थेबाबात प्रश्नचिन्ङ उपस्थित झाले आहे. 

राणा दिलीप सूर्यवंशी यांच्यावर हल्ला कोणी केला?

राणा दिलीप सूर्यवंशी यांच्यावर हा हल्ला कोणी केला याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. सुरुवातीला राणा यांना बारामती मध्ये खाजगी रुग्णालय उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी पुण्याला हलवण्यात आला आहे. पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील या ठिकाणी सज्ज करण्यात आला. राणा दिलीप सूर्यवंशी हे राणा शिपिंग कार्पोरेशनचे मालक आहेत. यापूर्वी देखिल राणा सूर्यवंशी यांच्यावर हल्ला झाला होता.

उद्योगपती राणा सूर्यवंशी यांच्यावर कोयत्याने हल्ला झाला आहे. सूर्यवंशी यांच्या खांद्यावर कोयत्याने वार झाला असून पाच ते सहा इंच खोल जखम झाली आहे.  उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांनी ही माहिती दिली. बारामती तालुका पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेकडून आरोपींचा शोध सुरू आहे.  राणा सूर्यवंशी यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली. स्कुटी वरून आलेल्या दोघांनी फोटो काढायचाय म्हणत हल्ला केल्याचे प्राथमिक माहिती समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले.

या घटनेनंतर बारामती तालुका पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असून स्थानिक गुन्हे शाखेसह फॉरेन्सिक टीम देखील घटनास्थळी दाखल झाली आहे. या हल्ल्याचा सर्व बाजूने तपास केला जात आहे.

फुलांचा बुके देत असताना कोयत्याने हल्ला

स्कुटी वरून आलेल्या दोघांनी चेहऱ्याला मास्क बांधलं होतं आणि आम्ही तुमचे फॅन आहोत आम्हाला तुमच्या सोबत फोटो काढायचा आहे असं राणा सूर्यवंशी यांना सांगितलं आणि याच वेळी फुलांचा बुके देत असताना कोयत्याने राणा सूर्यवंशी यांच्या हातावर वार केल्याचे पोलिसांनी सांगितलं आहे.

सुप्रिया सुळे यांची गृहखात्यावर टीका

राणा शिपींग कंपनीचे मालक राणा सूर्यवंशी यांच्यावर बारामती एअरपोर्टच्या परिसरात गोळीबार करण्यात आल्याचे वृत्त अतिशय धक्कादायक आहे. सुदैवाने ते यातून बचावले असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत.

राज्यातील कायदा सुव्यवस्थेची कशी दुर्दशा झाली आहे हे दर्शविणारे हे वृत्त आहे. गुन्हेगार सहजासहजी गोळीबार करुन निघून जातात आणि गृहखात्याची यंत्रणा काहीच करु शकत नाही. लोक दहशतीखाली असून गुन्हेगारांना मोकळे रान मिळाले आहे का अशी स्थिती आहे. गृहखात्याने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन हल्लेखोरांना अटक करावी  आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना करावी.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Pune
crime
Pune News