पुण्यात IT इंजिनिअरने उचलले टोकाचे पाऊल, मृत्यूनंतर वडिलांना धमकीचा फोन अन्...काय आहे नेमकं प्रकरण?
पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तोतया पोलिसांच्या धमकीमुळे एका IT इंजिनिअरने टोकाचे पाऊल उचलले आहेत.
पुण्यातील खराडी परिसरात 22 वर्षीय आयटी इंजिनिअर तरुणाने आयुष्य संपवलं आहे. त्याच्या आत्महत्येमागील कारण धक्कादायक आहे. डेटिंग ॲपच्या माध्यमातून झालेली ओळख या तरुणाच्या जीवावर बेतली आहे. या तरुणाला ड्रग्जच्या खोट्या प्रकरणात अडकवण्याची आणि बदनामी करण्याची धमकी देण्यात येत होती. याच त्रासाला कंटाळून या तरुणाने आपलं आयुष्य संपवलं आहे. याप्रकरणात पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्ह्याची नोंद केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिखर कुमार गौरव सक्सेना असून तो उत्तराखंडमधील रहिवासी होता. तो तरुण पुण्यातील प्रसिद्ध आयटी कंपनीत काम करत होता. तर खराडीमधील रिव्हरडेल सुइट्स सोसायटीमध्ये राहत असताना या इमारतीच्या 27 मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे. ड्रग्जच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची सततच्या धमकीमुळे तो मानसिक तणावात होता. धक्कादायक म्हणजे मुलाच्या मृत्यूनंतर कुटुंब दु:खात असताना शिखरच्या वडिलांना एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला ज्यामुळे त्यांच्या पायाखालची जमीन सरकली.
धक्कादायक असा झाला या प्रकरणात खुलासा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिखर हा 30 सप्टेंबरला लॅपटॉप, मोबाईल आणि बाकी सगळे इलेक्ट्रिक गॅजेट्स पीजीवर ठेवून अचानक गायब झाला होता. महत्त्वाचे म्हणजे शेखरने गायब होण्यापूर्वी आपला मोबाईल नंबर आईच्या मोबाईलवर ट्रान्सफर केला होता. त्यामुळे शेखर गायब झाल्यामुळे त्याच्या मोबाईलवरील सगळे फोन आईच्या फोनवर येत होते. त्यामुळे आई आणि वडिलांना संशय आला. त्यानंतर 1 ऑक्टोबरला त्याच्या मृत्यूच्या बातमीने कुटुंबावर दु:खाचे डोंगर कोसळलं.
शिखरच्या जाण्यामुळे कुटुंब धक्कात असताना त्या एका फोनमुळे कुटुंब हादरले. आईच्या फोनवर एक अज्ञात व्यक्तीचा कॉल आला. त्या व्यक्तीने सांगितलं की, तुमचा मुलगा ड्रग्स विकतो. तसंच मुलींसोबतही त्याचे वाईट वर्तणूक आहे. शेखरचे आई - वडील घाबरले. पण त्यांनी पोलिसांना यासंदर्भात तक्रार केली. आता पोलीस या प्रकरणात अधिक तपास करत आहेत.