SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

निलेश घायवळ बाबत मोठी अपडेट! कोर्टाकडून मोठा निर्णय, नेमकं काय झालं?

कुख्यात गुंड निलेश घायवळसह सर्व आरोपींबद्दल कोर्टाने मोठा निर्णय घेतला आहे. कोर्टात नेमकं काय झालं पाहा.

Written By Neha Chaudhari Edited By Neha Chaudhari
Published: Sep 29, 2026, 02:19 PM IST | Updated: Oct 01, 2026, 08:21 PM IST
Image Credit: निलेश घायवळ बाबत मोठी अपडेट
Join

फरार झालेला कुख्यात गुंड निलेश घायवळसह सर्व आरोपींना कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. एका खंडणीच्या प्रकरणात न्यायालयाने निलेश घायवळला न्यायालयाने निर्दोष मुक्त केलं आहे. पोलिसांनी सांगितलं आहे की, बनावट पासपोर्टच्या मदतीने लंडनमध्ये गेला असल्याचे समोर आलंय. निलेश घायवळ याने २०२० मध्ये जीपसाठी खंडणी मागितली होती असा गुन्हा दाखल झाला होता. पण आता या प्रकरणात निलेश घायवळला कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. 

कारागृहात असताना खंडणी मागितल्या प्रकरणी न्यायालयाने निलेश घायवळ सह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केल्यामुळे त्याला मोठा दिलासा मिळालाय असं म्हटलं जातंय. आरोपी निलेश घायवळ याच्या वतीने ज्येष्ठ वकील विपुल दुशिंग,आरोपी मुसा शेख याच्या वतीने ॲड. रितेश गदादे, आरोपी अक्षय गोगावले याच्या वतीने ॲड. अनिश पाडेकर, आरोपी कुणाल कंधारे याच्या वतीने ॲड बिलाल मणियार,आरोपी संतोष धुमाळ आणि विपुल माझीरे याच्यासाठी ॲड सलमान पठाण यांनी कोर्टात बाजू मांडली.

कोण आहे निलेश घायवळ?
पुण्यातील निलेश घायवळ याचा फोटा एकनाश शिंदे यांच्यासोबत समोर आला आणि तो अचानक चर्चेत आला.  निलेश घायवळ हा कुख्यात गुंड गजा मारणेच्या टोळीचा गुंड आहे. निलेश घायवळवर पुण्यामध्ये हत्या, हत्येचा प्रयत्न, बेकायदा शस्त्र बाळगणं, मारामारी करणं, परिसरात दहशत पसरवणं यासारख्या गुन्ह्यांची पोलीस स्टेशनमध्ये नोंद आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुण्यातील कोथरूड परिसरातील सुतारवाडीत निलेश घायवळची मोठी दहशत पाहिला मिळते. पण निलेश घायवळ प्रकर्षाने तेव्हा चर्चेत आला गजा मारणेशी त्याचा वाद झाला. या वादाचे रुपांतर गँगवारमध्ये झालं. यातून घायवळवर दोन वेळा हल्ला झाला. त्यानंतर घायवळ टोळीकडूनही मारणेवर हल्ला करण्यात आला. 

पुण्यातील दत्तवाडीत गुंड सचिन कुडलेची अगदी फिल्मी स्टाईल हत्या करण्यात आली. पिक्चर पाहिल्यानंतर सचिन कुडले जात असताना निलेश घायवळ आणि साथीदारांनी रस्त्यात पाठलाग केला आणि त्याच्या हल्ला करुन त्याची हत्या करण्यात आली. कुडलेच्या हत्येनंतर घायवळसह 26 जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली. त्यानंतर 2019 मध्ये निलेश घायवळ तुरुंगातून सुटला एवढंच नाहीतर बाकी गुन्ह्यातदेखील घायवळला जामीन मिळाल्यामुळे पुण्यात त्याची दहशत वाढली आणि तो 2023 मध्ये अखेर तुरुंगातून बाहेर आला.

खंडणी, टोळीयुद्ध आणि इतर हिंसक गुन्ह्यांसह अनेक गुन्हेगारीत घायवळचे नाव पुणे पोलिसांच्या कारवाईत समोर आलंय. घायवळ हा पुण्यातील टोळी युध्द, हत्या, हत्येचा प्रयत्न, बेकायदा शस्त्र बाळगणं, मारामारी करणं, परिसरात दहशत पसरवणं असे एक ना अनेक गुन्ह्यामध्ये त्याचे नाव आजही समोर येतात. निलेश घायवळ हा मूळचा सोनेगाव तालुक्यातील जामखेडमधील आहे. निलेश घायवळ विरोधात 23 ते 24 गुन्ह्यांची पुण्यातील पोलीस स्टेशनमध्ये दाखल असून निलेश घायवळ उच्चशिक्षित तर आहेच मास्टर इन कॉमर्सपर्यंत शिक्षण पूर्ण केलंय.
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी  त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात.  यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात.  ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.

ZEENEWS TRENDING STORIES