पुणे तळेगाव MIDC : पुण्याच्या तळेगाव MIDC मध्ये 11,000 कोटींचा नवा प्रकल्प सुरु होणार आहे. ह्युंदाई कंपनी तळेगाव MIDC मध्ये नवा प्लांट उभारणार आहे. कंपनीने 11 हजार कोटींची गुंतणूक केली आहे. या नव्या प्रकल्पामुळे 18,000 रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे.
मावळच्या तळेगाव एमआयडीसीमध्ये ह्युंदाईच्या नव्या उत्पादन प्रकल्पाचं उद्घाटन करण्यात आले. या प्रकल्पासाठी 11 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. सुमारे 18 हजार रोजगारांच्या संधी निर्माण होणार आहेत. या प्लांटमध्ये दरवर्षी 3 लाख 20 हजार मोटारींचं उत्पादन करण्याचं उद्दिष्ट आहे.
जनरल मोटर्सकडून प्रकल्प हस्तांतरित करताना अनेक अडचणी आल्या. मात्र, आता हा प्रकल्प पूर्ण क्षमतेनं उभा राहत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. या प्रकल्पामुळे मावळच्या औद्योगिक विकासाला चालना मिळण्यासोबतच स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत.
तळेगावातील EIM (ENERGY IN MOTION) च्या इलेक्ट्रिक ट्रक आणि बॅटरी उत्पादन प्रकल्पामुळे राज्यातील ईव्ही उद्योगाला चालना मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. MOU मधूनच Energy in Motion सारखे प्रकल्प साकार होतात, असं सांगत त्यांनी विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर दिलं. इलेक्ट्रिक वाहनांमुळे प्रदूषण आणि इंधनावरील परकीय चलनाचा खर्च कमी होईल. तसंच, चार मिनिटांत बॅटरी बदलण्याचं तंत्रज्ञान आणि चार्जिंग स्टेशनच्या विस्तारासाठी राज्य सरकार सहकार्य करेल, अशी ग्वाहीही मुख्यमंत्र्यांनी दिली. यावेळी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार एकाच मंचावर उपस्थित होते.