• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /पुणे
  • /पुण्यातील सुप्रसिद्ध वैशाली आणि रुपाली हॉटेलवर FDAची धाड; स्वच्छतागृहाच्या बाजूला डोसाचा तवा, अस्वच्छता अन्...

पुण्यातील सुप्रसिद्ध वैशाली आणि रुपाली हॉटेलवर FDAची धाड; स्वच्छतागृहाच्या बाजूला डोसाचा तवा, अस्वच्छता अन्...

पुणेकरांचा कट्टा म्हणून ओळख असलेल्या रुपाली आणि वैशाली या दोन्ही हॉटेलवर एफडीएने धाड टाकली आहे.

Written ByMansi KshirsagarEdited ByMansi Kshirsagar
Published: Nov 14, 2026, 11:34 AM IST|Updated: Nov 14, 2026, 11:36 AM IST
joinshare
पुण्यातील सुप्रसिद्ध वैशाली आणि रुपाली हॉटेलवर FDAची धाड; स्वच्छतागृहाच्या बाजूला डोसाचा तवा, अस्वच्छता अन्...
Image Credit: Pune Vaishali and Rupali restaurants licensee suspended FDA under Tukaram Mundhe

About the Author

Mansi Kshirsagar

Mansi Kshirsagar

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि जनरल बातम्यांमध्ये हातखंडा आहे. पायाभूत सुविधा म्हणजेच infrastructure, मुंबई लोकल संबंधित बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. महाराष्ट्र व मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्पाचे अपडेट वाचकापर्यंत पोहोचवतात.त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड आहे.  गुन्हेविषयक बातम्या आणि त्याचे विश्लेषणात्मक लेख आणि त्याचा अभ्यासपूर्ण मसुदा वाचकांना समजेल अशा भाषेत लिहिण्याची विशेष आवड आहे. त्याचबरोबर, लाइफस्टाईल आणि हवामानासंदर्भातील बातम्यांमध्येसुद्धा त्यांचा विशेष हातखंडा आहे.डिजिटल मीडियातील कारकीर्दमानसी यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात डिजीटल मीडियापासून केली. ग्रुम अँड ग्रो या अॅपसाठी कंटेट रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये रुजू झाल्या.  मनोजरंन बातम्यांपासून सुरुवात केल्यानंतर जनरल बातम्या, अर्थविषयक बातम्या, क्राइम आणि लाइफस्टाईल विषयाशी निगडीत विषयांवर लिहिण्यास सुरुवात केली. मानसी या आता झी 24 तासमध्ये राजकीय, सामाजिक आणि इन्फ्रासंदर्भातील बातम्या प्रामुख्याने करतात.शैक्षणिक पात्रतामानसी क्षीरसागर यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप? ऑपरेशन टायगर 3.0

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप? ऑपरेशन टायगर 3.0

2

पंढरपूरमध्ये NDRF ची टीम दाखल; 50 फूट खोल विहिरीत कामगार अडकले; एकाचा मृत्यू

3

भारताच्या हवामानात डेंजर बदल, 12 राज्यांना पावसाचा अलर्ट; 145 स्पीडने वारे वाहणार, मोठं वादळ धडकणार, महाराष्ट्रावर काय परिणाम होणार?

4

NVIDIA चे CEO जेन्सन हुआंग यांच्या चिनी गर्लफ्रेंडबाबत आजपर्यंतचा सर्वात मोठा खुलासा; 2025 मध्येच सिंगापूरच्या कंपनीतून...

5

ICC ची मोठी घोषणा; भारतामध्ये होणार 'या' जागतिक मोठ्या स्पर्धा! वेळापत्रक जाहीर

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

पुण्यातील प्रसिद्ध हॉटेल वैशाली आणि रूपालीला अन्न व औषध प्रशासनाने दणका दिला आहे. FDA ने दोन्ही हॉटेलचा परवाना निलंबित केला आहे. अन्न सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन केल्याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे.

एफडीएच्या तपासणीत हॉटेल वैशालीला 98 पैकी केवळ 58 गुण मिळाले आहेत. यापूर्वी एफडीएने नोटीस देऊनही त्रुटी कायम असल्याने वैशालीवर कारवाई करण्यात आली आहे. तसंच, रूपाली रेस्टॉरंटमध्येही अस्वच्छता, अयोग्य अन्नसाठवणूक आणि आवश्यक कागदपत्रांचा अभाव असल्याचे एफडीएच्या निरीक्षणात आढळले.

दोन्ही हॉटेल्सचे अन्न व्यवसाय परवाने तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आहेत. तसंच, परवाने पूर्ववत होईपर्यंत विक्री, पार्सल आणि होम डिलिव्हरीलाही बंदी घालण्यात आली आहे. पुण्यातील एफ.सी. रोडवर असलेल्या या दोन प्रसिद्ध हॉटेल्सवर एफडीएने दणका दिल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

वैशाली हॉटेलचा परवाना निलंबन करण्याची प्रमुख कारणे

- अत्यंत अपुरी जागा व स्वच्छतागृहांजवळ अन्नप्रक्रिया: स्वयंपाकघरातील अपुऱ्या जागेमुळे कच्चा माल साठवण्याचे फ्रीजर महिलांच्या स्वच्छतागृहाच्या अगदी लगत, तर डोसा व उत्तप्पा तयार करण्याचा तवा पुरुषांच्या स्वच्छतागृहाच्या लगत ठेवण्यात आला होता. तसेच धुतलेली भांडी स्वच्छतागृहासमोरील टेबलावर ठेवलेली आढळली..

- उघड्या जागेत अन्न साठवणूक व तयारी

उकडलेले बटाटे, शिजवलेला भात व इतर तयार अन्नपदार्थ उघड्या कॉरिडॉरमध्ये ठेवलेले होते. तसेच इडली व डोसा बॅटर तयार करण्याची प्रक्रिया उघड्या व असुरक्षित जागेत सुरू होती.
* क्रॉस-कंटॅमिनेशनचा धोका: कच्च्या कापलेल्या भाज्या थेट तयार अन्नपदार्थांच्या वर ठेवण्यात आल्या होत्या.
* इतर त्रुटी: स्वयंपाकघराला कीटकप्रतिबंधक दरवाजे नसणे, तापमान नोंदी व पिण्याच्या पाण्याचा अद्ययावत चाचणी अहवाल नसणे, तसेच तपासणीवेळी वैध FoSTaC प्रशिक्षित पर्यवेक्षक उपस्थित नसणे या बाबी आढळून आल्या.

* वारंवार उल्लंघन: यापूर्वी जून 2026 मध्ये तपासणी करून सुधारणा नोटीस दिल्यानंतरही पुन्हा गंभीर त्रुटी आढळल्याने सहायक आयुक्त (अन्न) श्री. सय्यद इम्रान हाश्मी यांनी परवानातात्काळ निलंबित करण्याचे आदेश दिले.

रूपाली हॉटेलचा परवाना निलंबन करण्याची प्रमुख कारणे

* असुरक्षित स्वयंपाकघर: स्वयंपाकघर उघडे व असुरक्षित असल्याने धूळ, घाण व कीटकांचा प्रवेश होण्याचा धोका निर्माण झाला होता.
* अस्वच्छता व कचरा व्यवस्थापन: परिसरात पाणी साचणे, अपुरी साफसफाई आणि कचऱ्याचे अयोग्य व्यवस्थापन आढळून आले.
* अन्न साठवणुकीतील त्रुटी: कच्चा माल, अर्धप्रक्रियायुक्त व तयार अन्नपदार्थ योग्य प्रकारे न झाकता तसेच लेबलिंग व 'Use By' तारखेशिवाय साठवलेले होते.
* दस्तऐवज व प्रशिक्षणाचा अभाव: कच्चे व तयार अन्न वेगळे न ठेवणे, तापमान नियंत्रणाच्या नोंदी नसणे, तसेच FSMS प्लॅन, SOPs आणि FoSTaC प्रशिक्षण नोंदींचा अभाव असल्याचे दिसून आले.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Pune
Tukaram Mundhe
FDA