गोकुळचे 4 सरकार नियुक्त संचालक 4 महिन्यानंतर राहणार नाहीत; निकालानंतर सतेज पाटील यांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट; पहिली जाहीर प्रतिक्रिया
गोकुळचे 4 सरकार नियुक्त संचालक 4 महिन्यानंतर राहणार नाहीत असा पहिला मोठा गौप्यस्फोट सतेज पाटील यांनी केला आहे. निकालानंतर सतेज पाटील यांनी पहिली जाहीर प्रतिक्रिया दिली.
Gokul Election : फडणवीसांनी डोळे वटारले तरी तुमचं साम्राज्य संपेल असं म्हणत मंत्री चंद्रकात पाटील यांनी सतेज पाटलांना थेट इशारा दिला. तर सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून मला धमकी देऊ नका मी देखील पाटीलच असं म्हणत सतेज पाटलांनी ठणकावल आहे. यावेळी एक मोठा गौप्यस्फोट देखील त्यांनी केला.
सत्ता मिळवण्यासाठी 4 लोकांना मतांचा अधिकार दिला. शासन नियुक्त संचालक यांच्या सहा महिन्याचे अनुभव पत्र तयार केली. चेअरमन निवडी पुरती या 4 लोकांची नियुक्ती होती. चार महिन्यानंतर हे चार संचालक राहणार नाहीत ही आतली बातमी आहे असा गौप्यस्फोट सतेज पाटील यांनी केला.
आमचे 13 उमेदवार निवडून आले आहेत आमची कोर्टात बाजू मांडू. 'सत्तेचा गैरवापर कसा होतो? हे 'गोकुळ'मध्ये दिसलं' न्यायालयीन लढाईमध्ये आम्हाला यश मिळणार असा विश्वास सतेज पाटील यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मिटवून घ्या म्हणणं आणि धनंजय महाडिक यांनी तसं काय होणार नाही म्हणणं, हे आम्हाला गाफील ठेवायचं होत. या नियुक्तीला कोरम लागत नाही. केवळ गोकुळची सत्ता मिळावी म्हणून 4 नागरिकांना संचालक केले. चार मत वेगळी ठेवण्यात आली आहेत. कालचा मोर्चा महायुतीच्या नेत्यांना जिव्हारी लागला. काही नेते म्हणत होते मोर्चाला येणार नाही म्हणत होते त्यांना चपराक बसली. तमाम लोक अन्याय होतो म्हणून मोर्चाला आले असं सतेज पाटील म्हणाले.
स्वर्गीय डॉ. डी वाय पाटील यांच्यावर बोलून काय मिळवलं
आज महायुतीच्या नेत्यांचे चेहरे कसे होते हे पाहिलं आहे. चंद्रकांत दादा मोठे होत असताना त्यांची वैचारिक पातळी खालावत आहे. मी आणि चंद्रकांत दादा 10 वर्षे एकमेकांविरोधात लढत आहोत. पण स्वर्गीय डॉ. डी वाय पाटील यांच्यावर बोलून काय मिळवलं. मी देखील पाटील आहे. 2029 मध्ये एकमेकांच्या विरोधात उभा राहूया. पण सत्तेची भीती खालून धमकी द्यायची नाही. हे कोल्हापूरकर आणि महाराष्ट्र खपवून घेणार नाही असा इशारा सतेज पाटील यांनी दिला.
2014 साली उमेश आपटे यांची मदत झाली नसती तर काय झालं असतं हे हसन मुश्रीफ यांनी लक्षात ठेवावं. आता बोलताना हसन मुश्रीफ यांनी समविचारी संचालकांना इशारा दिला आहे. शासनाची व्यवस्था कशी वापरू शकतो हे हसन मुश्रीफ यांनी दाखवून दिलं. लवटहुकूम काढून कोणत्याही संस्थेची सत्ता काबीज करू शकतात. म्हणून आम्ही विरोध करत होतो.
धनंजय महाडिक यांनी आधी आपल्या भीमा साखर कारखाना सुरुळीत चालवावा. तिथल्या कामगारांना पगार दिला जात नाही. त्या कारखान्यावर जप्ती आली ते आधी बघा. मी बंटी पाटील राहणं पसंद करेन. मला साहेब न होता महाराष्ट्राच्या मनात मी बंटी पाटीलच योग्य आहे. चंद्रकांत दादा पाटील यांनी मला संपूर्ण महाराष्ट्रात पोहचवले असं म्हणत सतेज पाटील यांनी चंद्रकांतदादा पाटील यांना टोला लगावला.