• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /पुणे
  • /पुणे पोलीस भरतीत घोटाळा! 19 जणांवर होणार कारवाई; काय आहे नेमकं प्रकरण?

पुणे पोलीस भरतीत घोटाळा! 19 जणांवर होणार कारवाई; काय आहे नेमकं प्रकरण?

पुणे शहर पोलीस दलात भरतीत घोटाळा समोर आला आहे. या प्रकरणात 19 जणांवर कारवाई होणार आहे, तर पोलिसांनी चौघांना बेड्या ठोकल्या आहेत.

Written ByNeha ChaudhariEdited ByNeha Chaudhari
Published: Oct 16, 2026, 07:18 PM IST|Updated: Oct 16, 2026, 07:20 PM IST
joinshare
पुणे पोलीस भरतीत घोटाळा! 19 जणांवर होणार कारवाई; काय आहे नेमकं प्रकरण?
Image Credit: Pune police

About the Author

Neha Chaudhari

Neha Chaudhari

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी  त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात.  यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात.  ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

2

भूगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

3

₹100 च्या नोटांचे बंडल, आधी 'लंच ब्रेक'चं कारण अन् नंतर...; SBI मध्ये ग्राहकाने शूट केलेला धक्कादायक Video पहिला का?

4

'...तर तुम्ही ठाण्यातून परत जाणार नाही'; आदित्य ठाकरेंच्या उद्याच्या दौऱ्याआधीच शिंदेंच्या शिवसेनेचा विरोधकांना इशारा

5

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

पोलीस भरतीमध्ये राज्य सरकारकडून खेळाडूंना 5 टक्के आरक्षण देण्यात येतं. याच 5 टक्के आरक्षणाचा गैरफायदा घेत पुणे पोलीस भरतीत मोठा घोटाळा समोर आला आहे. 'कुराश' या खेळाची बनावट प्रमाणपत्रे करत 19 जणांना नोकरी मिळाली आहे. आता या 19 जणांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत.  पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी सांगितलं की, या 19 जणांना पोलीस दलातून बडतर्फ करण्यात येणार आहे.


अमितेशकुमार यांनी पुढे सांगितलं की, या 19 पैकी 10 जण पोलीस दलात रूजू झाले नव्हते तर उर्वरित 9 जण विविध पोलीस प्रशिक्षण केंद्रांमध्ये प्रशिक्षण घेत होते. ज्यावेळी हे बोगस प्रमाणपत्र समोर आल्यानंतर त्या 9 जणांना तातडीने परत बोलवण्यात आले. या धक्कादायक प्रकरणामुळे पोलीस भरती प्रक्रियेतील क्रीडा प्रमाणपत्रांच्या पडताळणीचा मुद्दा पु्न्हा एकदा प्रकाशझोतात आला आहे.

हे प्रकरण कसं समोर आलं?

पुणे पोलीस भरतीमध्ये घोटाळा झाल्याचे एका सजग नागरिकामुळे समोर आलं आहे. या सजग नागरिकाने पोलिसांना झालेल्या प्रकाराबद्दल सांगितलं. त्या व्यक्तीने सांगितलं की पुणे शहर पोलीस दलाच्या 2024-26 मधील भरती प्रक्रियेदरम्यान बनावट क्रीडा प्रमाणपत्रांचा वापर करण्यात आल आहे. या व्यक्तीच्या माहितीनंतर पोलिसांनी तपास सुरु केल्यानंतर हा घोटाळा समोर आला आहे.

पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. यात असं समोर आलं की, 2016 ते 2026 या दहा वर्षांच्या कालावधीत कुराश खेळाच्या प्रत्यक्ष स्पर्धा आयोजित झाल्या नसतानाही त्या काळातील प्रमाणपत्र देण्यात आले होते. या बनावट कागदापत्राच्या आधारे पोलीस भरतीत क्रीडा आरक्षणाचा या 19 जणांनी लाभ घेतल्याचे धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आता या प्रकरणात गुन्हे शाखेकडून सखोल चौकशी करण्यात येत आहे.

या प्रकरणात पोलिसांनी महाराष्ट्र राज्य कुराश असोसिएशनचे अध्यक्ष अंकुश नागर आणि सचिव शिवाजी साळुंखे यांच्यासह चार जणांना अटक केली आहे. त्यासोबत या घोटाळ्यामध्ये क्रीडा प्रशिक्षण केंद्र चालवणाऱ्या व्यक्तींचाही समावेश असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आलंय. आता या तपासातून अजून काय धक्कादायक माहिती समोर येते, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. 
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Pune
crime
Maharashtra News