• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /पुणे
  • /भोसरीतील अत्यंत धक्कादायक प्रकार, 2024 च्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवाराने दिलेला पुरावा पाहून निवडणूक आयोगही हादरले

भोसरीतील अत्यंत धक्कादायक प्रकार, 2024 च्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवाराने दिलेला पुरावा पाहून निवडणूक आयोगही हादरले

भोसरीतील अत्यंत धक्कादाक प्रकार समोर आला आहे. 2024 च्या विधानसभा निवडणूक पराभव झालेल्या शरद पवारांच्या उमेदवाराने धक्कादायक दावा केला आहे.

Reported ByVanita Kamble
Published: Nov 14, 2026, 07:10 PM IST|Updated: Nov 14, 2026, 07:19 PM IST
joinshare
भोसरीतील अत्यंत धक्कादायक प्रकार, 2024 च्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवाराने दिलेला पुरावा पाहून निवडणूक आयोगही हादरले

About the Author

Vanita Kamble

Vanita Kamble

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप? ऑपरेशन टायगर 3.0

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप? ऑपरेशन टायगर 3.0

2

पंढरपूरमध्ये NDRF ची टीम दाखल; 50 फूट खोल विहिरीत कामगार अडकले; एकाचा मृत्यू

3

भारताच्या हवामानात डेंजर बदल, 12 राज्यांना पावसाचा अलर्ट; 145 स्पीडने वारे वाहणार, मोठं वादळ धडकणार, महाराष्ट्रावर काय परिणाम होणार?

4

NVIDIA चे CEO जेन्सन हुआंग यांच्या चिनी गर्लफ्रेंडबाबत आजपर्यंतचा सर्वात मोठा खुलासा; 2025 मध्येच सिंगापूरच्या कंपनीतून...

5

ICC ची मोठी घोषणा; भारतामध्ये होणार 'या' जागतिक मोठ्या स्पर्धा! वेळापत्रक जाहीर

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

भोसरी : नोव्हेंबर 2024 मध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकी दरम्यान पिंपरी चिंचवड शहरातील मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर घोळ झाल्याची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तत्कालीन उमेदवार अजित गव्हाणे यांनी केली होती, ज्याची आता मुख्य निवडणूक आयोगाकडून दखल घेण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. भोसरीतील अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यामुळेच  2024 च्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्याचा दावा अजित गव्हाणे यांनी केला आहे. 

निवडणुकीच्या ऐनवेळी हजारो मतदारांचे पत्ते त्यांच्या अनुमतीशिवाय परस्पर बदलल्याने ते मतदानापासून वंचित राहिले आणि त्याचा फटका आपल्याला पराभवाच्या रूपाने बसला, असा आरोप करत गव्हाणे यांनी परस्पर स्थलांतरित केलेल्या मतदारांच्या यादीच्या पुराव्यासह आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. 

या प्रकरणी यापूर्वीच निगडी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यात चार वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकांचा वापर करून सुमारे 40 मतदारांचे परस्पर स्थलांतर केल्याचे नमूद करण्यात आले होते, तसेच या गैरप्रकाराबाबत आपण तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही अवगत केले होते आणि त्यांनी चौकशीच्या सूचना दिल्या होत्या, असा दावाही अजित गव्हाणे यांनी केला आहे.

2024 मध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत पिंपरी चिंचवड शहरातील भोसरी मतदारसंघातील हजारो मतदारांची नावे अचानक मतदार यादीतून वगळण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, स्थानिक मतदारांची ही नावे भोसरीतून गायब होऊन थेट छत्रपती संभाजीनगर, ठाणे आणि अंबरनाथ यांसारख्या इतर शहरांतील मतदार याद्यांमध्ये समाविष्ट करण्यात आल्याचा आरोप मतदारांनी केला आहे.

एका बाजूला निवडणुकांकडे लोकशाहीचा उत्सव म्हणून पाहिले जात असताना, दुसऱ्या बाजूला अशा प्रकारे मतदानाच्या हक्कावर गदा आणून मतदारांची फसवणूक होत असेल, तर दाद आणि न्याय कोणाकडे मागायचा, असा संतप्त सवाल बाधित नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. 
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Maharashtra Politics
Political News
Pune