अजित पवार आपल्यामध्ये नाहीत हे आजही खरं वाटत नाही. एका क्षणी त्या विमान अपघातात अजित पवार आपल्या आयुष्यातून गेलं. त्यांच्या जाण्यामुळे पवार कुटुंबासोबत अख्खा महाराष्ट्र पोरका झाला. अजित पवारांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. अजित पवार देवगिरी बंगल्यापासून विमानतळाच्या गेट नंबर आठ पर्यंतचा एक तासांचा प्रवास होता. या एक तासांच्या प्रवासात अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादी कृषी पदवीधर संघटनेचे अध्यक्ष सुधीर राऊत होते. त्या एका तासात अजित पवार यांनी काय गप्पा मारल्या त्याबद्दल सुधीर राऊत यांनी सांगितलं आहे.
त्या अखेरच्या प्रवासात अजित पवार यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार यावर काही भाष्य केलं आहे. सुधीर राऊत यांनी सांगितलं की, अजित पवारांनी मला सकाळी ७ वाजता देवगिरीला बोलवलं. त्यांना बारामतीला लवकर जायचं होतं. म्हणून दादांनी विमानतळापर्यंत मला सोबत यायला सांगितले. त्यावेळी त्यांनी मला सांगितलं की, प्रवासात मला त्यांनी १२ तारखेला आपण दोन्ही राष्ट्रवादी एकत्र करत आहोत. साहेब आपल्यासाठी विठ्ठल असून त्यामुळे आपण त्यांची माफी मागायची हे. झालं गेलं सोडून द्यायच आणि त्यांच्या नेतृत्वात ते सांगतील तसं काम करायचं, असं त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं.
ते पुढे म्हणाले की, मी एयरपोर्टला गेट नंबर ८ पर्यंत सोबत गेलो होतो. त्यानंतर मी तिथून शरद पवारांना भेटायला पुन्हा माघारी सिल्वर ओकला परतलो होतो. सिल्वर ओक जवळ थांबलो असताना अजित पवारांच्या अपघाताची बातमी समजली. त्यावेळी मला विश्वासच बसला नाही. ज्या माणसासोबत १ तासापूर्वी होतो, तो आता हयात नाही यावर विश्वास बसत नव्हता.
अजित पवार यांचा अपघातात 28 जानेवारीला निधन झालं होतं. ते जिल्हा परिषद निवडणुकांच्या प्रचारासाठी बारामतीत जात होते तेव्हा हा अपघात झाला. बारामती विमानतळानजीक असलेल्या गोजुबावी गावाच्या हद्दीत अजित पवारांचे चार्टर्ड विमान धावपट्टीवर कोसळलं आणि एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं.